Notification

पूर्ण फिल्म परीक्षण: जमीन पर सितारे-विकास सोनावने

चित्रपट परिक्षण -तारे जमीन पर

   तारे जमीन पर हया चित्रपटाचा मुख्य नायक आमीर खान आहे.अणि हया चित्रपटाचा निर्माता व दिग्दर्शकही आमीर खानच आहे.
    तारे जमीन पर हा चित्रपट विशेषकरुन पालकांसाठी बनविण्यात आला आहे.तसे चित्रपटात असे काही सांगण्यात आलेले नाहीये की हा चित्रपट पालक वर्गासाठी बनविण्यात आला आहे.पण माझ्या वैयक्तिक निरीक्षणातुन माझ्या हे लक्षात आले आहे की हया चित्रपटाच्या कथेची जी मांडणी लेखकाने केली आहे त्यातुन पालकांना एक खुप मोठा संदेश देण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.
       चित्रपटाच्या शीर्षकातुनच लेखकाने खुप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे जसे की जन्माला आलेला प्रत्येक मुलगा,मुलगी हा एक जमिनीवर अवतरलेला एक ताराच आहे.फक्त त्या तार्यावर तुम्ही तुमच्या अपेक्षांचे ओझे लादु नका त्याला जसे हवे तसे चमकु द्या हे सांगण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या शीर्षकातुनच लेखकाने केला आहे.
     अणि ही खरीच गोष्ट आहे आताचे पालक आपल्या मुलांवर किती अपेक्षा लादतात.माझा मुलगा पहिलाच आला पाहिजे.तो इंजिनिअर किंवा डाँक्टरच झाला पाहिजे.जसे काही इंजिनिअरींग हे जगातील एकमेव क्षेत्र उरले आहे त्यांना करिअर करण्यासाठी.ते तर सोडा आमच्या मुलाचे लग्न हे आमच्या आवडीच्या मुलीशीच झाले पाहिजे.ती जातीच्या,धर्माच्या मधलीच असली पाहिजे.अणि नसली तर मग लग्नाला विरोध.
    अणि मग त्यांचा सैराट केला जातो.पण पालकांना हे कळतच नाही की त्या निवडलेल्या एका विशिष्ट क्षेत्रात आयुष्यभर करिअर आपल्या मुलांना करायचे आहे,लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर तिच्यासोबत आयुष्यभर त्याला राहायचे आहे.त्यांना निवडलेल्या क्षेत्रात संपुर्ण आयुष्यभर कष्ट करायचे आहे,त्यांना लग्न केलेल्या जोडीदारासोबत संपुर्ण आयुष्य घालवायचे आहे.मग त्यांना निवडु दया ना त्यांना आयुष्यात काय करायचे आहे? त्यांना काय बनायच आहे?त्यांना कोणासोबत आयुष्यभराच्या बंधनात अडकायचे आहे.?तुम्ही त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादुन का त्यांना दाबुन टाकता.
    अणि समजा तुमच्या पाल्याने तुम्ही सांगितलेल्या क्षेत्रात करिअर जरी केलेही किंवा तुम्ही सुचवलेल्या मुलीसोबत लग्नाच्या बंधनात तो अडकलाही अणि तो त्या निवडलेल्या क्षेत्रात खुप पैसा कमावेलही,तुम्ही सांगितलेल्या मुलीसोबत आयुष्यभराच्या बंधनात तो बांधला गेलाही जाईल पण त्याला आत्मिक सुख हे कधीच मिळणार नाही.तो आयुष्यभर मन मारून आपले आयुष्य व्यतीत करेल.आपल्या मनाविरूदध निवडलेल्या क्षेत्रात करिअर करण्याची खंत त्याला आयुष्यभर खलत राहिल,आपल्या मनाविरुदध लग्न झाल्याच्या खंतमुळे,दुखामुळे तो जिच्याशी विवाहबदध झालेला असेल तिलाही कधीच सुखी ठेवु शकणार नाही.मग सांगा झाले का नाही दोघांचे आयुष्य बर्बाद.झाले का नाही त्याचे करिअरही खराब.ते ही निवडलेल्या एका मनाविरुदधच्या क्षेत्रामुळे,मनाविरुदध जोडल्या गेलेल्या एका नात्यामुळे.अणि ते ही आईवडिलांना आपल्या मुलांकडुन असलेल्या अवाजवी अपेक्षांमुळे.अणि हयाच एका कारणामुळे कमी वयात लग्न झालेल्या मुलामुलींचे काही महिन्यातच,वर्षातच घटस्फोट होताना दिसुन येतात.कारण त्यांच्या जाती,धर्म तर जुळून जातात पण त्यांची मनेच एकमेकांच्या मनाशी जुळती नाही.
     मला सांगायचे एवढेच आहे की आपल्या मुलांच्या क्षमता,कौशल्य ओळखा अणि त्यानुसार त्यांना योग्य ते क्षेत्र निवडण्यास मार्गदर्शन करा.प्राधान्य द्या.त्यांच्या मनाविरूदध त्यांना कुठल्याही क्षेत्रात बळजबरी ढकलु नका.त्यांच्या क्षमता,त्यांची कौशल्ये,त्यांच्या आवडीनिवडी ओळखा त्यांच्या मनाविरुदध त्यांना कुठल्याही लग्नाच्या बंधनात अडकवायचा प्रयत्न करू नका.कारण याच्याने नुकसान हे एकाचे नाही तर दोघांचे होईल.दोघांचेही आयुष्य बर्बाद होईल.कारण मनाविरूदध निवडलेल्या क्षेत्रात करिअर करावे लागल्यामुळे त्याला आयुष्यभर मन मारुन जगावा लागेल.अणि मनाविरूदध जोडलेल्या गेलेल्या वैवाहिक बंधनात अडकल्यामुळे तो आयुष्यभर नेहमी मन मारुन जगेल.अणि आपल्या जोडीदारालाही तो सुखी ठेवु शकणार नाही.म्हणुन कोणत्याही क्षेत्रात आपल्या मुलांना टाकताना त्यांना त्याची मनापासुन आवड आहे का? त्यांना त्यात खरच रुची आहे का?ज्या नात्यात तुम्ही त्याला अडकवता आहे. त्या नात्याला त्याची मनापासुन सहमती आहे का?हे पाहणे गरजेचे आहे.नाती जोडतांना जाती नव्हे तर त्या दोघांची मने,विचार जुळता आहे का नाही? हे बघणे फार गरजेचे आहे.कारण एक नात आयुष्यभर जपण्यासाठी,ते निभावण्याठी हेच खरे महत्वाचे आहे.
       असो आपल्या लेखाच्या मुळ विषयाकडे आपण वळुया.तारे जमीन पर हया चित्रपटातील ईशान हा अभ्यासात गती नसलेला,नेहमी शाळेतील शिक्षकांच्या तक्रारी त्याच्याविषयी पालकांकडे येत असतात.त्याचा मोठा भाऊ अभ्यासात खुप हुशार असतो.अणि ईशान अभ्यासात सुरुवातीला अत्यंत मठठ दाखवला आहे त्यामुळे त्याचे पालक,शिक्षक सर्वच त्याला कंटाळलेले असतात.कारण तो अभ्यासात खुपच ढ असतो.शाळेतील प्राचार्य त्याच्या पालकांना सांगतात की त्याला काहीतरी समस्या आहे.शक्यतो तो मंद बुदधी आहे.पण त्याचे पालक ऐकुन घ्यायलाच तयार नसतात.ते उलट शिक्षकांनाच दोष देतात.की त्यांना त्यांच्या मुलाला नीट शिकवता येत नाही म्हणुन ते काहीपण कारणे देता आहे.
    हया प्रसंगातुन लेखकाने हे सांगण्याचा,हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे की आताचे पालक आपल्या मुलांना समजुन घेण्यात कुठेतरी कमी पडता आहे का? ते त्यांच्या यशाची जबाबदारी,हामी तर घेतात पण त्याच्या अपयशाची हामी घ्यायलाच तयार होत नाही.सरळ आपल्या मुलाला किंवा त्याला शिकवणार्या शिक्षकांना त्याच्या अपयशासाठी दोष देऊन मोकळे होतात.जसे काही त्यांची स्वताची काहीच जबाबदारी,कर्तव्य नाहीयेत.आपल्या मुलाला काय समस्या आहे?तो का इतरांपेक्षा मागे पडतो आहे? हे जाणुन घेण्याचा ते प्रयत्नच करत नाही.आत्ताचे पालक आपल्या मुलांना समजुन घ्यायला कुठेतरी कमी पडु राहिले ही शोकांतिका लेखकाने हया प्रसंगातुन आपल्यासमोर मांडली आहे.
         अणि खरे पाहायला गेले तर ईशान हा काही मंदबुदधी नसतो.तो फार हुशार असतो.तो एक खुप चांगला रंगारी(पेंटर) असतो.फक्त त्याला अक्षरे ओळखायला त्रास होत असतो.त्याला अक्षरांची नीट ओळखच होत नसते.त्यामुळे त्याला प्रश्नच कळतच नसतो.त्यामुळे तो काहीही लिहुन ठेवत असतो.अक्षरे त्याच्या डोळयांसमोर नाचत असतात असे त्याला वाटत असते.त्यामुळे त्याला परिक्षेत नेहमी भोपळा मिळत असतो.अणि हया सम़्स्येला इंग्रजीत(mentally retired abnormal or dislexia) असे म्हणतात.
     पण त्याची ही समस्या त्याचे पालक समजुन घ्यायलाच तयार नसतात.अणि तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही.अभ्यासात त्याला गती नाही म्हणुन ते त्याला सरळ बोर्डिगमध्ये शिकायला पाठवतात.त्यांना वाटते की तो अभ्यास करायचा कंटाळा करतो.त्याला बोर्डिगमध्ये टाकले का तो आपोआप सुधारेल.पण खरे पाहायला गेले तर तसे काहीच नसते.त्याला अक्षरे ओळखु येत नसतात.म्हणुन त्याला प्रश्नच न समजत असल्यामुळे त्याला परिक्षेत नेहमी भोपळा मिळत असतो.हया प्रसंगातुन पालक आपल्या मुलांना समजुन घेण्यास कुठे कमी पडता आहे का ?हा प्रश्न लेखकाने चित्रपटातुन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
       अणि मग बोर्डिगमध्ये शिकायला गेल्यावर तिथे ईशानला शिकवायला एक नवीश शिक्षक येतात.रामशंकर निकुंभ. त्यांना त्याची समस्या लगेच लक्षात येते.मग ते त्याच्या सर्व वहया तपासतात अणि शोधण्याचा प्रयत्न करतात की मुळात त्याला समस्या काय आहे?अणि खुप संशोधन केल्यावर त्याच्या पालकांना भेटल्यावर त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांना कळते की ईशान एक खुप उत्कृष्ट पेंटर आहे.पण पालकांच्या अभ्यासाच्या दबावामुळे त्याने पेंटिंग करणेच बंद केले आहे. फक्त ईशानला अक्षरे ओळखण्याची समस्या आहे.त्याला अक्षरांची लवकर ओळख पटत नाही.म्हणुन त्याला प्रश्नच समजत नाही मग तो उत्तरपत्रिकेत काहीही लिहुन ठेवतो.मग ते शिक्षक ईशानशी मैत्री करतात.त्याचे सांत्वन करतात.त्याला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात.त्याच्या कलागुणांना वाव देतात.त्याला पेटिंग करण्यास प्रोत्साहन देतात.उत्तेजित करतात.
     याच्यातुन लेखकाने सांगितले आहे पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुले कशी दाबली जातात.व आपल्या पालकांच्या ईच्छा अपेक्षा पुर्ण करण्यात मुलांच्या स्वताच्या ईच्छा अपेक्षांचा,स्वप्रांचा कसा बळी जातो.हे लेखकाने हया प्रसंगातुन सांगितले आहे.
      त्याचबरोबर एक आदर्श शिक्षक कसा असावा हे सांगण्याचा पण प्रयत्न केला आहे.एका शिक्षकाला फक्त आपल्या विदयार्थ्यांना शिकवणेच नाही आले पाहिजे तर त्यांना त्याच्या समस्या काय आहे ?हे समजुन घेता आले पाहिजे.अणि त्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एका शिक्षकाला आपल्या विदयार्थ्यांना नुसते शिकवणेच नाही आले पाहिजे तर एका शिक्षकाला आपल्या विदयार्थ्याला वाचता आले पाहिजे.त्याला समजुन घेता आले पाहिजे.तो असे का वागतो आहे?त्यामागचे कारण, त्याची मानसिकता,त्याची मनस्थिती समजुन घेता आली पाहिजे.अणि त्याच्या पाठीशी त्यांना उभे राहता आले पाहिजे.त्यांना त्याच्याशी मित्रत्वाने संवाद साधता आला पाहिजे.त्याच्या कलागुणांना वाव देता आले पाहिजे.हे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने हया घटना प्रसंगातून केला आहे.
      मग एकेदिवशी ईशानच्या अभ्यासातील कमी गतीमुळे बोर्डिग शाळेतील प्राचार्य त्याला त्याही शाळेतुन काढुन टाकण्याचा निर्णय घेतात.तेव्हा त्याचे तेच शिक्षक राम शंकर निकुंभ त्यांना जाऊन भेटतात ज्यांना त्याची समस्या माहित असते की तो अभ्यासात कमी का पडतो आहे?अणि मग ते प्राचार्यांना समजावुन सांगतात की तो हुशारच आहे फक्त त्याला थोडी लिहिण्या,वाचण्याची समस्या आहे.अणि सगळया शिक्षकांनी सहकार्य केले तर होईल तो पण उत्तीर्ण.मग प्राचार्य म्हणतात तो पहिलेच अभ्यासात ढ आहे अणि सर्व शिक्षक त्याला शिकवण्यामागे लागले तर त्यांचे बाकीच्या विदयार्थ्यांकडे दुर्लक्ष होईल.मग त्याचे ते शिक्षक राम शंकर निकुंभ स्वता त्याला शिकवण्याची जबाबदारी घेतात.अणि जोपर्यत ते त्याला पुर्णपणे प्रशिक्षित करत नाही.तोपर्यत त्याची तोंडी परिक्षा घेतली जावी अशी विनंती ते प्राचार्याकडे करतात.अणि प्राचार्यही ती मान्य करतात.
     एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे जिवंत उदाहरण हया घटना प्रसंगातुन आपल्याला पाहायला मिळते.
     अणि मग हळुहळु ईशानही इतर मुलांप्रमाणे वाचायला,लिहायला लागतो.याच्यातुन एक गोष्ट शिकायला मिळते की एखादी गोष्ट करण्याची मनापासुन ईच्छा असेल तर ती करण्यासाठी मार्गही आपोआप मिळतो.जर राम शंकर निकुंभ यांनी बाकीच्या शिक्षकांप्रमाणे त्याला शिकवण्याचा कंटाळा केला असता अणि म्हटले असते की याला शिकवुन काही फायदा नाही तर हे सर्व झालेच नसते.
       अणि एकेदिवशी जेव्हा ईशानचे वडील त्याच्या शिक्षकांना राम शंकर निकुंभ यांना भेटायला बोर्डिगवर येतात तेव्हा त्याचे शिक्षक त्यांच्या चुकीची बोलण्या बोलण्यामध्ये त्यांना जाणीव करुन देतात.अणि लक्षात आणुन देतात की एक पालक म्हणुन आपल्या मुलाला समजुन घेण्यात,त्याला आधार देण्यात तुम्ही कुठे कमी पडले? हयावर ईशानच्या वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव होते व अक्षरश त्यांना रडुच कोसळते.
        अणि मग सगळयात शेवटी ईशानचे  शिक्षक राम शंकर निकुंभ सर्व विदयार्थ्याची एक चित्रकलेची स्पर्धा आयोजित करतात.अणि त्यात सर्व शिक्षक व प्राचार्य यांनाही सांगतात की तुम्हीही हयात मुलांसोबत सहभागी व्हा.पण त्यात एकाही शिक्षकाला चांगले चित्र काढता येत नाही.मग ईशानचे शिक्षक राम शंकर निकुंभ  त्या सर्व शिक्षकांना जाणीव करुन देतात.की तुम्ही ईशानला ढ म्हणत होते.पण खरे पाहायला गेले तर तुम्ही पण ढ च आहे.त्यावर सर्व शिक्षक म्हणतात की आम्हाला चित्रकलेत रुची नाही.मग आम्ही त्यात कसे प्रविण असणार?.मग हयावर त्याचे शिक्षक राम शंकर निकुंभ बाकीच्या शिक्षकांना म्हणतात की पाहिले का प्रत्येकाच्या अंगी एक कला असते.एक कौशल्य असते.जन्माला आलेला कोणताच मानवप्राणी ढ नसतो.त्याच्या अंगी काहीतरी कला असतेच.फक्त प्रत्येकाच्या अंगी वेगवेगळया कला असतात.सर्वजण सारखे नसतात.एवढाच फरक असतो.म्हणुन कधीच कोणाला ढ म्हणायचे नाही.
     असा आहे हा पुर्ण चित्रपट.हया चित्रपटातुन लेखकाने पालकांना हे सांगितले आहे की नुसते पालक बनुन काही फायदा नाही तर आपल्याला आपल्या पालकत्वाची जाणीवही असायला हवी.आपली जबाबदारी,आपले कर्तव्यही कळायला हवे.पालकांनी आपल्या मुलांना समजुन घ्यायला हवे.त्यांच्या आवडीनिवडी,त्यांच्या अडीअडचणी समजुन घ्यायला हव्यात.त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादत बसु नये.त़्यांनी आपल्या मुलाच्या यशाची अणि अपयशाचीही हामी,जबाबदारी घ्यायला हवी.
                 चित्रपट परिक्षक:
                   योगेश सोनवणे

Leave a Comment

Connect withJoin Us on WhatsApp