जय जय गणराया,गणपती,
शेवक करतील सेवा..
दास आरती,तुझी राया
भक्त करतील पुजा
दुर्वा वाहती,जय जय,गणराया..धृ
कंठी शोभे गळा,फुलमाळा
गुलाल माथी टीपा,शोभे लडिवाळा
दिप ज्योती,मोदक लाडू हाती.
जय जय गणराया गणपती
शेवक करतील सेवा,दास आरती….
पार्वतीच्या लेका,विनायका
थाट तुझा गजमुखा,आहे त्रिलोका
माता पार्वती,पिता कैलासपती
जय जय गणराया गणपती
सेवक करतील सेवा, दास आरती…
भक्ती करून विधी,रिद्धी,सिद्दीला
झाली तुझी प्रसिद्धी,प्रकाशल्या बुद्धी
महारथी बसला मुशका वरती.
जय जय गणराया गणपती
शेवक करतील सेवा दास आरती
तुझी राया भक्त करतील पुजा
दुर्वा वाहती जय जय गणराया.
.