Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

होत तुझ्या वर प्रेम-सटरबॉयसवाप्निल-बकचोदी

होतं तुझ्यावर प्रेम I अव्यक्त प्रेम

होतं तुझ्यावर प्रेम
मी नाही सांगु शकले
पण आजवर तुला
नाही विसरू शकले

मनातले ते बोल
ओठांवर होते आले
पण ओठांवरचे शब्द
ओठांवरच रेंगाळले
नाही कळले मला
शब्द कसे रूसले
मुक्या त्या भावनांत
प्रेम नाही फुलले
हुदयातले भाव प्रेमाचे
कंठातच घुटमळले
होतं तुझ्यावर प्रेम
मी नाही सांगु शकले

तुला बघुन माझे
ह्रुदय होते धडकले
मनात माझ्या प्रितीचे
फुल होते उमलले
प्रेमाचे ते सुंदर फुल
माझ्या मनातच सुकले
मनी बांधलेले घरटे
नाही तुला दिसले
अल्लड मनाचं हास्य
माझ्यावर कायमचे रूसले
होतं तुझ्यावर प्रेम
मी नाही सांगु शकले

तू दूर गेलास आणि
मन माझे फरफटले
धडकणाऱ्या ह्रुदयाचे
संगीत जणु हरपले
सुंदर ते स्वप्न माझे
असे कसे विस्कटले
वाटलं जणु जीवनाचे
जहाज ते भरकटले
जुन्या त्या आठवणींनी
मन आज पुन्हा हुरहुरले
होतं तुझ्यावर प्रेम
मी नाही सांगु शकले
पण आजवर तुला
नाही विसरू शकले

Written by swapnil (star boy ) aher- (nashik)

Leave a Reply

Join Us on WhatsApp