Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

आयुष्याचा कॅनव्हास-संजय बाड़गे

एकदा वाटले आयुष्याच्या कॅनव्हासवर
जिवनाचे चित्र रंगवावे.
एक ब्रश अश्रुत बुडवला,
दु:खाचा रंग तयार झाला.
एक ब्रश हास्यात बुडवला,
सुखाचा रंग तयार झाला.
एक ब्रश काळोखात बुडवला,
संकटाचा रंग तयार झाला.
एक ब्रश प्रकाशात बुडवला,
उज्जवल भविष्याचा रंग तयार झाला.
वाटले आता चित्र पुर्ण झाले,
पण पाहिले तर कॅनव्हास कोराच होता.

Leave a Reply

Join Us on WhatsApp