Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

जे मनाने गुणगुणले, ते आहे गीत

ज्योती महादुले 23 May 2023 गीत अन्य 🏵️ 5325 0 Marathi :: मराठी

जे मनाने गुणगुणले, ते आहे गीत
जे मनाने रचले, ते आहे गीत
ज्यावर प्रेम जडले ,ते आहे गीत
जिथे मन रमले, ते आहे गीत 
जे मनाने गुणगुणले...........
सा रे ग, ग म प,म प ध, ध नि सा
सरगम होठात, सरस्वती गळ्यात
मी गाऊ विसरून सर्व देहभान -२
गीत एक नगमा, सुरांचा राग
मी गीत दिवानी, मज नाही भान
सत्य शिव सुंदर,ते आहे गीत
ज्यावर प्रेम करु ते आहे गीत
ज्याची पूजा करु, ते आहे गीत 
सुर ताल धरु ,ते आहे गीत
जे मनाने गुणगुणले........
हो...हो...हो....हो...
सारी उदासी हठवी, गीत ती आस्था 
मी नित्य करु , गीत साधना
अजरामर असावे गीत भावनांचे
मी नित्य करु,ही आराधना
माझे आराध्य जे बनले, ते आहे गीत
हृदयातून उमले,ते आहे गीत
ओठात जे सजले, ते आहे गीत
नयनात जे रंगले,ते आहे गीत
जे मनाने गुणगुणले,ते आहे गीत.....

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

ये खुदा बता तूने क्या सितम कर दिया मेरे दिल को तूने किसी के बस मैं कर दिया वो रहा तो नहीं एक पल भी आकर टुकडें- टुकड़ें कर दिये ना विश्वा read more >>
Join Us: