आठवतात बाबा अजूनही – विशाल परशुराम मुळे

आठवतात बाबा अजूनही – विशाल परशुराम मुळे

मनाची दारे उघडता
बालपणातील कोवळ्या आठवणी ।
आठवतात ते पहिले बाबा
शिकविता मला वाणी ॥

आठवतात बाबा अजूनही
सायकल माझी लोटताना ।
पांयडल मारणे मला
हळूहळू शिकविताना ॥

आठवतात बाबा अजूनही
तुम्ही चालणे शिकविताना ।
पडताना दिसलोच मी
हळूच पटकन उचलताना ॥

आठवतात बाबा अजूनही
तुम्ही शाळेत सोडताना ।
विसरलीच घरी लेखणी
शिक्षकांकडून घेताना ॥

आठवतात बाबा अजूनही
सांजवेळी खाऊ आणताना ।
नाही आवडला तर
माझी समजूत काढताना ॥

आठवतात बाबा अजूनही
दिवाळीची बंदूक घेताना ।
खटक्यात बोट चेपले तेव्हा
हळूच मलम लावताना ॥

आठवतात बाबा अजूनही
आई मला मारताना ।
तुम्हाला सांगितल्यावर
आईला मग दाटताना ॥

आठवतात बाबा अजूनही
फोटो माझा काढताना ।
फोटो छान येण्यासाठी
Smile मला म्हणताना ।।

vishal muleविशाल परशुराम मुळे

Ravi Kumar

मैं रवि कुमार गुरुग्राम हरियाणा का निवासी हूँ | मैं श्रंगार रस का कवि हूँ | मैं साहित्य लाइव में संपादक के रूप में कार्य कर रहा हूँ |

Visit My Website
View All Articles

I agree to Privacy Policy of Sahity Live & Request to add my profile on Sahity Live.

0

Leave a Reply

Create AccountLog In Your Account