– अकस्मात मृत्यूची नोंद – विशाल मुळे

– अकस्मात मृत्यूची नोंद – विशाल मुळे

कोरडया भावना तुझ्या
तू मनातच ठेवल्या
पाणावले डोळे तरी
पापण्या मात्र कोरड्या ठेवल्या

वर्षनुवर्षे तू
आशेवरच जगला
आशा तर बाजूलाच
तू गरजेवरच खपला ॥

चेहरे बघून मुलांचे
तू जगत राहिलास
त्यांच्या गरजांसाठी
अहोरात्र खपलास ॥

नाही भागल्या गरजा
कर्जबाजारी तू झालास
पिकत नाही म्हणून
आत्महत्येस परावृत्त झालास ॥

भाव नाही पिकाला म्हणून
तू केली आत्महत्या
आत्महत्या नसून ती
होती ती नियोजित हत्या ॥

काळ्या मातीत तुझी
स्वप्ने तू रंगविली
अश्रू लपवून शेवटी
जीवनयात्रा संपविली ॥

मातीतील जन्म तुझा
मातीतच गेला
सोन्यासारखा संसार
मात्र ओसाड पडला ॥

आयुष्याच्या पानावर तू
केली आत्महत्येची नोंद
पत्रकार लिहितात तुझी
अकस्मात मृत्यूची नोंद ॥

vishal muleyविशाल मुळे

0
comments
  • Khupppo channnnn

    0

  • Leave a Reply

    Create Account    Log In Your Account