बालपण – माधव दादाराव मुळे

बालपण – माधव दादाराव मुळे

खरच बालपण किती
सुंदर ते असत
तेव्हा कुठलंच टेंन्शन
माणसाच्या मांघ नसत

खेळण्या बागडण्याचं
वय ते असत
खान्यापिण्याचं देखील
भान मानसाला नसत

बालपणातील आठवणी काही
खूप मोठ्या असतात
कायम स्वरूपी त्या मनात
खोल रुजून बसतात

जेव्हापन आठवणी त्या
काठावरी येतात
अलगदपणे डोळ्यांमध्ये
आसवे आणून जातात

विसरताही विसरू नाही
शकत कुणी कालपण
कारण त्यामध्ये असत
ज्याचं त्याच बालपण

माधव दादाराव मुळे

4+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account