देवा-महाडू मुले

देवा-महाडू मुले

शेतकरी बापांच देवा
काय चुकलं ते सांग
असा हात धरून तू
का त्यांच्या लागलास मांग

पेरलं शेतात बियाणं
नाही आभाळाचा वाण
छाती धडकी खाती रं
दुबार पेरणीच्या भीतीनं

सावकाराच देण त्यांना
जगू नाही देत
व्याज वाढत रे रोज
नाही कमी कधी होत

सांग स्वप्न त्यांचे देवा
कधी पुरे हे होईल
गाडी धान्यान भरून
त्यांच्या दाराशी येईल

केव्हा लगीन थाटात
ते आपल्या मुलींच करेल
पैसा सावकारांचा फेकून
शेतकरी तोंडावर मारेल

 

Mahadu mule

माधव दादाराव मुळे

 

1+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account