दिवाळी – माधव मुळे

दिवाळी – माधव मुळे

दिवाळी ला न्यायला
मामा तुम्ही याना
लवकर आजारातून
बरे तुम्ही व्हाना

मम्मी माझी नंतर येईल
पुढं मला न्याना
बाजारात आमच्यासाठी
भरपूर फटाके घ्याना

भाऊबीजीला मम्मी येईल
तोवर चिवडा लाडू खाऊ
रिकामे डब्बे सगळे मम्मी
आल्यावर दावू

वाटेकडे पाहीन मामा
याना मला नेयाला
आली दिवाळी जवळ
मी लागलो वाट पाहयाला

पोरसोर गेली समदी
तुम्ही केव्हा येसाल
मामा तुमच्या गावाला
कधी मला नेसाल

जीव गेला थकून मामा
वाट तुमची पाहून
याना मुक्कामाला तुम्ही
जाऊ आपण जेवुन

Madhav Muleमाधव मुळे

1+
comments
  • Heart Touching Lines

    0

  • Leave a Reply

    Create Account    Log In Your Account