गरीबाची लेक – विशाल मूळे

गरीबाची लेक – विशाल मूळे

सावळी असली तरी
चेहरा मात्र गोड असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

मनमिळाऊ अशी ती
समजूतदार असेल
तिच्या कर्तव्याची तिला
नेहमी जाण असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

कोवळ्या मनात तिच्या
सुंदर कोवळे विचार असेल
कलागुणांची तिला
वेगळी एक आवड असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

वेड्या स्वप्नांना माझ्या
बळ देणारी ती असेल
चुकल्यावर सुद्धा मी
माझ्यासोबत ती असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

आईबाबांची माझ्या ती
काळजी घेणारी असेल
जेवायला माझ्यासाठी
वाट बघणारी असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

आईबाबांच्या माझ्या ती
भावना समजणारी असेल
आईबाबांच्या माझ्या ती
नेहमी काळजीत असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

आईबाबांना माझ्या ती
समाधान देणारी असेल
आईबाबांसाठी तर ती
प्रणाहूनही प्रिय असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

माझ्या कामात ती
मला मदत करेल
हृदयाची माझ्या ती
हृदयस्वामिनी असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

माझ्या आईबाबांची ती
प्राणप्रिय लेक असेल
आईबाबांसोबत माझ्या ती
माहेर विसरणारी असेल
खरंच खूप सुंदर ती
गरीबाचीच लेक असेल

vishal muleविशाल मूळे

0

Leave a Reply

Create AccountLog In Your Account