हवामान खाते-माधव मुले

हवामान खाते-माधव मुले

हवामान खात्यावर केस
करण्याची वेळ आता आली
त्यांच्यामुळेच तर
फजिती शेतकरयाची झाली

कपन्यांसोबत डील करून
शेतकऱ्याला त्यांनी लुटलं
का कुणास ठाऊक त्यांना
अस कोणत सुख भेटलं

फसवे गिरीचे खेळ फक्त
देशात या घडत आहे
श्रीमंत मात्र आनंदात
गरीब रोज रडत आहे

हवामान खात्याचा अंदाज
दरवेळी कसा चुकतो
शेतकऱ्यांन खतबियान
भरल्यावर पाऊस कुठे लपतो

विश्वास आता हवामान खात्यावर
कसा शेतकरी ठेवणार
अशान कसा भारत देश
विकासाच्या मार्गानं धावणार

 

Madhav Mule

 

माधव मुले

0

Leave a Reply

Create AccountLog In Your Account