Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

भूत आला- करमाळा येथील ही सुमारे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी ही घटना

मुस्ताक अली शायर 09 Jan 2024 कहानियाँ अन्य #कहानी #कथा #story #horror story 9474 0 Marathi :: मराठी

भूत आला...


सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील ही सुमारे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी ही घटना....
करमाळा येथे सलीम पठाण नामक एक इसम राहत होता...
उंच धिप्पाड च्या धिप्पाड शरीरयष्टी त्याची होती...
त्याला बघताच क्षणी थरकाप उडावा
अशी शरीर रचना नियतीने त्याला दिली होती...

अशा धिप्पाड शरीरामुळे सरकारने त्याला पोलीस खात्यात नियुक्त केले..
सलीम आता पोलीस झाला होता एक दमदार पोलीस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली...

हळूहळू संपूर्ण करमाळ्यात त्याचा दरारा निर्माण झाला...
करमाळा सोलापूर पंढरपूर मंगळवेढा येथे त्याने सेवा दिली....
प्रत्येक ठिकाणी त्याचा रुबाब होता...
जो तो त्याला भिऊन होता...
त्याच्या वाट्याला जायची कुणाची हिम्मत नव्हती....

पण त्याला एक वाईट सवय होती
दारू प्यायची...
सलीम भयानक दारू प्यायचा...
त्याच्या या सवयीमुळे मित्रमंडळी , नातेवाईक , सगेसोयरे चार हात लांब राहत...

सलीम ला तीन भाऊ तीन बहिणी होत्या...
सुलेमान , जाबर , शेर मोहम्मद आणि
नजमा , सलमा , फरीदा अशी त्यांची नावे होती...
सर्वजण सोलापूरचे रहिवासी होते...
फक्त नजमा सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद मध्ये राहत होती...

नजमाला तीन मुले आणि दोन मुली होत्या...
शाबाद , रफिक , इमरान आणि
सायरा , समिना अशी त्यांची नावे होती...
यातील शाबाद सगळ्यात मोठा मुलगा सलीम आणि नजमा बहिण-भावाचा संबंध खूप चांगला होता....
सलीम चं या बहिणीकडे सारखं येणं-जाणं होतं...

शाबाद आणि  मामा सलीम यांची  खूप जवळीक होती....
मामा भाच्या पेक्षा मैत्रीचे नाते खूप चांगले होते....
दोघांची घट्ट मैत्री होती....
सलीम ची दारू पिण्याची सवय कमी व्हावी यासाठी नजमाने सलीमला आपल्या जवळ राहायला ठेवून घेतले....

दोन तीन महिन्याचा कालावधी निघून गेला...
सर्व काही ठीक चाललं होतं...
अचानक परिस्थिती बदलत गेली...
प्रेमाची जागा शत्रुत्वाने घेतली...
मैत्री आता बदल्याच्या भावनेने बदललेली होती....
यांच्या आनंदाला कोणाची तरी नजर लागली होती...

असं काय घडलं ?
का यांच्यातलं प्रेम नाहीस झालं ?
का बहिण भावाच्या नात्यांमध्ये तेढ निर्माण झाला ?
का सलीम आपल्या भाच्याला शत्रूच्या नजरेने बघायला लागला ?
का प्रेमाचा बगीचा उध्वस्त होऊन वैरी चा वाळवंट का निर्माण झाला ?
का एकमेकाच्या मनात तिरस्कार निर्माण झाला ?

 सलीम नजमा कडे राहायला असताना...
तिथे त्याला काही मित्रांची संगत लागली...
त्याला भेटलेले सर्व मित्र दारूला आहारी गेलेले होते....
त्यांच्या संगतीत सलीम पुन्हा दारू प्यायला लागला......

आपल्या मामा सलीमला दारू पिताना शाबाद ने पाहिले....
आणि याची खबर त्यांनी आपली आई नजमाला दिली....
रागाने नजमा चा पारा चढला...
राग अनावर होऊन त्यांनी सलीमला खूप शिवी श्राप दिली....
आणि रागाच्या भरात सलीमला करमाळ्याला नेऊन सोडले....

सलीम ने ओळखले आपल्याला दारू पिताना शाबाद ने पाहिले होते...
त्यांनी त्याची खबर न जन्माला दिली ...
जाता-जाता सलीम शाबाद ला रागा रागाने म्हणाला
तुला मी सोडणार नाही
तुला बघून घेईल
माझ्या अपमानाचा बदला मी नक्कीच घेणार...

शाबाद एक व्यापारी होता तो गावोगावी फिरून कपडे विकत होता...
कसाबसा तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता..

तिकडे सलीम पूर्णपणे दारूच्या अधीन झाला होता...
तो दिवस रात्र दारू प्यायला लागला...
या सवयीमुळे त्याची पोलीस मधील नोकरी गेली...
त्याच्या बायकोने ही त्यांची साथ सोडली..
ती आपल्या मुलांना घेऊन कायमची माहेरी निघून गेली....

अचानक घडलेल्या अशा मोठ्या संकटामुळे सलीम पूर्णपणे खचून गेला...
त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसला...
त्याच्या डोक्यावर परिणाम झाला..
सलीम चे मानसिक संतुलन सुटल्यामुळे तो वेडा झाला....

तो वेड्यागत गावातून दारू पिऊन फिरू लागला...
एक वेळ अशी आली की तो अनवाणी कुठेही फिरायला लागला.. एके काळचा रुबाबदार सलीम वर अशी वेळ आली होती...
त्याला असा वेडयागत  गावातून फिरताना पाहून काही उनाड पोरं त्याला दगड मारू लागले..
त्याची मस्करी करू लागले...

सलीम आपल्यावर आलेल्या या परिस्थितीचा दोषी
शाबाद ला मानत होता...
शाबाद बद्दल त्याच्या मनात 
सूडाची भावना निर्माण झाली होती.....
सलीम च्या डोक्यात सतत शाबाद बरोबर बदला घेण्याचा विचार चालत होता...

शाबाद ला दोन मुली होत्या
मुस्कान आणि नाज अशी त्यांची नावे....
1990 साली शाबाद ला मुलगा झाला.....
शाबाद च्या मुलाच्या बारशाचे कार्यक्रम ठेवण्यात आली...
सगळी सगेसोयरे , पाहुणे , नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आले....
सलीम देखील आपल्या सोलापूरच्या नातेवाईकांच्या 
त्याला कार्यक्रम ला नेण्यासाठी मागं लागला..

परंतु सलीम च्या वेड्या पणामुळे
त्याला कार्यक्रमाला नेण्यास कोणीही तयार होईना...
सलीम खूपच मागे लागला म्हणून त्याच्या नातेवाईकांनी त्याला एका खोलीत बंद करून कार्यक्रमाला निघून गेले......

इकडे सलीम खोलीचा दरवाजा तोडून बाहेर निघून जातो....
सलीम चे पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडते...
आपण काय करतो याचे भान देखील त्याला राहत नाही...

सलीम चुलीतली राख तोंडावर फासून
त्याच अवस्थेत तो गावातच फिरू लागतो..
गावातील उनाड पोरं त्याला वेडा वेडा म्हणून चिडवू लागतात....
त्याला दगड मारू लागतात.....

सलीम पळत-पळत एका निर्जन ठिकाणी जातो...
उनाड पोरं त्याचा पिच्छा काही सोडत नाही..
त्याला दगड मारत तिथपर्यंत पोहोचतात...
स्वतःचा बचाव करण्यासाठी सलीम तिथे एका विहिरी लगत असलेल्या झाडावर चढून बसतो.....

सलीमचा तोल जाऊन तो त्या  विहिरी मध्ये पडतो....
त्या ठिकाणी माणसाचा जास्त वावर नसतो त्यामुळे सलीमला वाचण्यासाठी कोणतीही मदत मिळत नाही....
जीव वाचवण्यासाठी सलीम खूप झटापट करतो...
त्याचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरतात
आणि काही वेळातच सलीमची प्राणज्योत मावळते......

बारशाचा कार्यक्रम आवरून सोलापूरचे सर्व पाहुणे माघारी येतात....
येऊन बघतात तर सलीम त्या खोलीमध्ये नसतो...
तो दरवाजा तोडून पळून गेली याचे सर्वांच्या लक्षात येते....

सर्वजण त्याची शोधाशोध करू लागतात...
सलीम ची कोणालाही गरज नसल्यामुळे त्याच्या शोधमोहिमेला कोणीही जास्त रस घेत नाही...
एक-दोन दिवस शोधाशोध करून सर्वजण शोध मोहीम थांबवतात...
सर्व जण आपापल्या कामात व्यस्त होतात...

असा एक महिन्याचा कालावधी निघून जातो...
सलीम कुठे गेला ?
त्याचे काय झाले हे कोणालाही याचा पत्ता लागत नाही...
आणि काही दिवसानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते....
ज्या विहिरीत सलीम ची प्राणज्योत मावळली ती विहीर देखील रस्ता रुंदीकरणात मध्ये जाणार होती.....

रस्त्याचे कामगार जेव्हा त्या विहिरीपाशी जाऊन विहिरीची पाहणी करतात
तेव्हा त्यांना विहिरीमध्ये सडलेला मृतदेह आढळून येतो....
याची खबर ते लगेच पोलीस स्टेशनला देतात...
बघता बघता याची खबर सर्व गावभर पसरते....
विहिरी पाशी बघ्यांची गर्दी होते.....

           घटनास्थळी पोलिस येतात...
विहिरीत सलीमचा मृतदेह तरंगत होता...
तो मृतदेह कोणाचा याची चर्चा रंगते पण कोणालाही तो मृतदेह सलीमचा आहे याची कल्पना नसते....

विहिरीत मृतदेह आहे याची खबर सलीम ची बहिण फरीदा पर्यंत पोहोचते...
फरिदा गल्लीतील बायका बरोबर मृतदेह बघण्यासाठी जाते...
विहिरी पाशी जाऊन जेव्हा ती आत डोकावून पाहते त्या मृतदेहाच्या हातात सोन्याच्या अंगठ्या दिसतात...
त्यावरून ती ओळखते तो मृतदेह दुसरा कोणाचा नसून सलीम चा आहे....

आपला भाऊ सलीमची अशी अवस्था पाहून फरीदा हंबरडा फोडते...
तो मृतदेह सलीमचा आहे याची खबर
बघता बघता साऱ्या गावभर पसरते...
पण सलीमच्या घरातून कोणीही येत नाही....
फरीदा चा मोठा मुलगा इरफान येतो...

मृतदेहाला बाहेर काढण्यात येते...
मृतदेह इतका सडलेला असतो की हात लावले तर त्याचे तुकडे पडत होते..
पोलीस पंचनामा करून मृतदेह इरफान च्या ताब्यात देतात....

इरफान मृतदेहाचा तसाच कपड्यांमध्ये गाठोडा करून
कब्रस्तान मध्ये नेऊन दफन करतो....
अंत्यसंस्कार कोणतीही धार्मिक विधी करण्यात येत नाही....

दोन तीन महिन्याचा कालावधी निघून जातो...
सर्वजण आता पूर्णपणे सलीमला विसरून गेलेले असतात...
सर्व जण आपापल्या जीवनात मस्त होतात...

सलीमचा ज्या विहिरीपाशी मृत्यू झाला तेथे रस्त्याचे काम पूर्ण होते...
रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येतो...
सलीमचा जिथे मृत्यू झाला
त्या ठिकाणी अपघात होऊ लागतात...
तिथे अपघात झालेल्या व्यक्तीचा मृत्यु होने पक्क होतं...

रोज रात्री तिथे अपघात घडू लागतात...
लोकांच्या मनात याची दहशत निर्माण होते..
रात्रीच्या वेळी तिथून प्रवास करण्याची कुणाची हिंमत होत नसे...
भुताटकिची जागा म्हणून ती जागा प्रसिद्ध होते....

सुमारे तीस वर्षाचा कालावधी निघून जातो...
या तीस वर्षांत बरंच काही बदललं होतं... शाबाद ला दोन मुलं दोन मुली झाल्या होत्या..
मुस्कान , नाज ,  फिरोज आणि उस्मान
अशी त्यांची नावे...
चारीही मुलांची लग्ने झाली होते....

सर्वजण आप आपल्या संसारात आप आपल्या जीवनात व्यस्त झाले होते...
सलीमला आता सर्व जण पूर्णपणे विसरून गेले होते....

परंतु सलीमने यांना विसरले का हा प्रश्न निर्माण होतो...
सलीम च्या मनातील सूडाची भावना त्याच्या मृत्यू बरोबर मयत झाली का हा प्रश्न होता...

शाबाद च्या आयुष्यात असं काही होणार होतं ज्याची कल्पना त्याने स्वप्नात देखील केली नव्हती....
एक असं वादळ निर्माण होणार होतं...
ज्यात त्याचं सुख समाधान सगळे उद्ध्वस्त होणार होतं....
सूडाची ठिणगी आता वणव्याचे रूप धारण करणार होती....

शाबाद ची सासरवाडी सोलापूरची...
लॉक डाऊन च्या दरम्यान शाबाद च्या सासू  चे निधन होते...
सर्व काही लॉग डाऊन मुळे बंद होते...
पण सासूच्या मयतीला जाणेही गरजेचे होते..

शाबाद ने परवानगी काढून आपला मुलगा फिरोज आणि बायकोला सासूच्या मयतीला पाठवतो...
मोटर सायकल वरून दोघेजण कवठेएकंद मधून सोलापूरला रवाना होतात...
संध्याकाळी ते दोघे सोलापूरला पोहोचतात...

धार्मिक रितीरिवाजानुसार शाबाद च्या सासूचे अंत्यसंस्कार होतात...
सर्वजण अंत्यविधीचा कार्यक्रम उरकून आप-आपल्या परततात...
परंतु  फिरोज मागे राहतो...

हातपाय धुऊन कब्रस्तान मधून परत येताना फिरोज ला एक इसम भेटतो...
तो इसम फिरोज ला म्हणतो
माझ्या आईचे निधन झाले आहे
मला आजान देता येत नाही
तू माझ्या आईच्या कबरीवर आजान हे म्हणजे माझ्या आईला पुण्य लाभेल...

फिरोज कोणताही विचार न करता
त्याने दाखवलेल्या कबरीवर जाऊन आजान देतो...
त्याला ही गोष्ट माहीतच नसते ज्या कबरीवर त्याने आजान दिली ती कबर सलीमची आहे..
ज्या इसम ने त्याला आजान घ्यायला सांगीतले होते
तो थोड्या अंतरावर जाऊन अदृश्य होतो...

हे दृश्य पाहून फिरोज खूप भयभीत होतो..
तो कसाबसा आपल्या मामाच्या घरी परततो...
घडलेला हा प्रकार फिरोज कोणालाही सांगत नाही...
चार दिवसानंतर फिरोज आपल्या आईला घेऊन आपल्या गावी परततो....

घरी आल्यावर फिरोज ची अचानक तब्येत बिघडते...
फिरोज ला दवाखान्यात नेतात...
त्याचा इलाज करून परत घरात आणतात..
इलाज करून देखील फिरोज च्या तब्येतीत काही सुधारणा होत नाही...
उलट तिची तब्येत आणखी बिघडत जाते..

फिरोज ची तब्येत इतकी बिघडते ती त्याला जागच्याजागी हलता येत नाही...
घरच्या लोकांना काहीच कळत नाही काय होता आहे..
फिरोज चा खूप इलाज केला जातो परंतु सर्व काही निष्फळ ठरते...
शेवटी फिरोज ला दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल केले जाते...
तरीदेखील फिरोज च्या तब्येत मध्ये काहीच सुधार होत नाही...

फिरोज चा लहान भाऊ उस्मान ला अध्यात्मिक क्षेत्राची खूप आवड होती...
भूत प्रेतांवर त्याचा चांगलाच अभ्यास होता...
उस्मान च्या मनात शंका येते आपल्या भावाला बाहेरील बाधा झाली आहे...

उस्मान दवाखान्यात गेल्यावर फिरोज च्या डोक्यावर हात ठेवून कुरान मधील काही मंत्र म्हणतो...
सर्वजण आश्चर्यचकित होतात...
फिरोज काही वेळातच बिलकुल ठीक होतो...
उस्मान ला पक्का विश्वास होतो आपल्या भावाला कोणत्यातरी प्रेत आत्म्याने ताब्यामध्ये ठेवले आहे....

दोन दिवसानंतर फिरोज ला घरी आणतात..
या दोन दिवसात फिरोज ला कोणताही त्रास होत नाही...
सर्व काही ठीक होते...
घरी परतल्यावर फिरोज ला रात्री बाराला पुन्हा त्रास होऊ लागतो...

फिरोज मोठमोठ्याने ओरडू लागतो रडू लागतो...
सोड मला
मी काय केले आहे ?
का मला त्रास देत आहे ?
मी काय वाईट केले आहे तुझे ?
जा मला सोडून...

असं बडबडू लागतो....
खूप घामाघूम होतो...
दाताखाली ओठ चावू लागतो..
डोळे पूर्णपणे विस्तारलेले
लालभडक रक्त उतरला आहे...
विचित्र भयानक चेहरा दिसत होता...

बघून असं वाटत होतं तो फिरोज नाही
कोणता तरी भयानक राक्षस आहे...
घरातील सर्वांचा भीतीने थरकाप उडतो...
पण उस्मान ला थोडीदेखील भीती वाटत नाही...
त्याची देवावर खूप श्रद्धा होती...
आणि अशा गोष्टीचे ज्ञान ही त्यामुळे या गोष्टीचा त्याला काहीही नवल वाटले नाही...

फिरोज खूप दंगा करू लागला...
घरातील सर्वजण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण फिरोज काही केले शांत होईना...
असं वाटत होतं जणू त्याच्या अंगात शंभर हत्तीच बळ आलं होतं...

उस्मान फिरोज ला मागून कवळा घालून पकडतो...
फिरोज काही शांत होईना उलट त्याचा दंगा वाढतच चालला...
उस्मान ची ही पकड आता ढिली होत चालली होती....
उस्मान ला असं वाटू लागलं आपले हात दंडातून उपसून निघतात की काय...

तरीदेखील उस्मान ने हिंमत सोडली नाही..
त्याने अल्लाह चे नाव घेतले..
आणि फिरोज क्या कानात आजान द्यायला सुरुवात केली...
आजान चे बोल कानावर पडतात फिरोज खूप दंगा करू पाय आपटू लागला...
परंतु उस्मान ने त्याला सोडले नाही...
पूर्ण आजान त्याच्या कानात दिली...

फिरोज बेशुद्ध होऊन पडला..
घरातील सर्वजण त्याला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करु लागले..
पण फिरोज शुद्धीवर येत नव्हता...

    फिरोज काही केले शुद्धीवर येत नव्हता...
घरातील सर्वजण भयभीत होतात...
फिरोज का शुद्धीवर येत नाही ?
काय झालं असेल त्याला ?
काही अशुभ घडलं का ?
हेच प्रश्न प्रत्येकाला सतावत होते....

उस्मान या गोष्टीचा चांगलाच अभ्यास होता..
घरातील सगळ्यांना वाटले आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे उस्मान कडे आहेत...
सर्वजण विश्वासाने उस्मान कडे पाहू लागले...
परंतु उस्मान ला एवढा खोलवरचा अभ्यास नव्हता...
पण एवढा विश्वास होता की आपल्या भावाला काहीच झालेले नाही....
त्याने घरातील सर्वांची समजूत काढली...

उस्मान नाही हे कळून चुकले होते...
त्या प्रेत  आत्म्याची खूप मोठी ताकत आहे...
मुळीच आपण त्याचा सामना करू शकणार नाही ....
आपल्याकडे इतके ज्ञान नाही की आपण आपल्या भावाला या महा संकटातून बाहेर काढू शकू....

तरीही उस्मान ने हिंमत हारली नाही....
त्याचा अल्लाह वर खूप श्रद्धा होती....
त्याचा अल्लाह त्याच्या भावाला काहीच होऊ देणार नाही
तो नक्कीच आपल्याला मदत करेल 
कोणाला तरी मसीहा करून नक्कीच मदत पाठवेल
याचा पूर्ण विश्वास होता....

उस्मान फिरोज ला उचलून बेड वर झोपवतो...
फिरोज शुद्धीवर यायचं नावच घेत नाही...
उस्मान ला आता चिंता होऊ लागते...
काय करावे त्याला काहीच सुचत नाही...
फिरोज च्या उशाशी बसून उस्मान कुराण मधील मंत्राचे पठण करू लागतो...
मंत्राचे उच्चारण करून फिरोज च्या अंगावर फुकतो.....

तासाभरानंतर फिरोज शुद्धीवर येतो...
पण त्या दुष्ट आत्म्याने फिरोज ला पूर्णपणे आपल्या ताब्यात केलेले असते...
त्याची खूप बिकट अवस्था होते...
त्याला कशाचेही भान राहत नाही...
तो स्वतःतच गुंग राहतो...

दिवसा मागे दिवस जातात...
फिरोज ची तब्येत कशी बिघडत चाललेली असते...
फिरोज च्या घरच्या लोकांनी त्याला मौलवी महाराजा कडे सुद्धा नेतात पण त्याचा काहीच फायदा होत नाही...
उस्मान दिवस-रात्र पार्थना करत असतो...

शाबाद च्या नातेवाईकात एक मौलवी असतात...
त्यांचे नाव मुबारक मौलाना होते....
फिरोज च्या तब्येतीची खबर त्यांना लागते...
मुबारक मौलाना उस्मान ला फोन करून फिरोज च्या तब्येतीची विचारपूस करतात...
उस्मान घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगतो..
त्यांना मदत करण्यासाठी घरी येण्यासाठी विनंती करतो....
मुबारक मोलाना घरी येण्यास तयार होतात...

दुसऱ्या दिवशी मुबारक मौलाना शाबाद च्या घरी येतात...
त्यांनी घरी पाऊल ठेवतात सर्व वातावरण बदलते...
फिरोज ची नजर मुबारक मौलाना वर पडताच तो मोठमोठ्याने ओरडू लागतो
दंगा करू लागतो.....

पण त्याच्या ओरडण्यात दंगा करण्यात आता भीती दिसत होती...
मुबारक मौलाना ला बघून त्याचा थरकाप उडतो...
तो त्यांना भिऊन बेड खाली जाऊन लपून बसतो......

मुबारक मौलाना घरात जाऊन एका खोलीमध्ये बसतात 
आणि उस्मान ला सांगतात फिरोज ला समोर आणून बसव...
उस्मान फिरोज ला धरून आणून
मुबारक मौलाना च्या समोर बसवतो....

फिरोज खूप दंगा करू लागतो
खूप आरडा-ओरडा करू लागतो...
पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो
उस्मान त्याला मागून कवळा घालून धरून बसवतो...

मुबारका मौलाना सर्वप्रथम फिरोज च्या कानात आजान देतात...
आजान ऐकून फिरोज एकदम शांत होतो...
मग मुबारक मौलाना कुरान मधील काही मंत्र उच्चारून पाण्यावर अभिमंत्रित करतात...
आणि ते पाणी फिरोज च्या चेहऱ्यावर मारू लागतात...
तसा फिरोज तळमळू लागतो....

मुबारक मौलानांना गयावया करू लागतो
मला सोडा
मला त्रास देऊ नका
मी फिरोज ला काहीही करणार नाही
सोडा मला....

मुबारक मौलाना म्हणतात
कोण आहेस तू ?
इथे का आलास ?
मानवी शरीरातील यायची तू ला परवानगी आहे का ?
आत्ताच्या आत्ता लगेच हे शरीर सोडून निघून जा
नाहीतर मी तुला भयंकर त्रास देईल
याद राख तुझी गाठ माझ्याशी आहे.....

फिरोज च्या शरीरातील प्रेतात्मा मुबारक मौलाना ना म्हणतो
मी नाही इथून जाणार
मी याचं शरीर नाही सोडणार...

मुबारक मौलाना म्हणतात तू असा नाही ऐकणार
मुबारक मौलाना आपल्या दोन्ही हाताच्या शहादत बोटांवर अत्तर लावून
उस्मान च्या कानात घालतात....
कुरान मधील मंत्राचे पठण करू लागतात...

तसा फिरोज मोठमोठ्याने रडू लागतो तळमळू लागतो...
त्रास सहन न होऊन तो प्रेतात्मा मुबारक मौलाना ला म्हणतो मी हे शरीर सोडून जातो मला त्रास देऊ नका...

मुबारक मौलाना म्हणतात आत्ताच्या आत्ता हे शरीर सोडून जा नाहीतर मी तुला सोडणार नाही....
फिरोज च्या शरीरातील प्रेत आत्मा म्हणतो जातो जातो दार उघडा
उस्मान दार उघडतो

तो प्रेतात्मा मुबारक मौलाना ला म्हणतो
मला या शरीरातून निघता येईना मी कसा इथून जाऊ...
मला शरीरातून बाहेर जायला वाट मिळेल नाही.....

मुबारक मौलाना म्हणतात तोंडातून निघून जा आणि परत इथे येऊ नकोस
परत आलास तर मी तुला सोडणार नाही...
काही क्षणातच तळमळ करून तो प्रेतात्मा फिरोज च्या शरीरातून निघून जातो....

नंतर मुबारक मौलाना फिरोज च्या कानात हेडफोन लावून
कुरान मधील मंत्र ऐकवतात....
तासभर ऐकून झाल्यानंतर फिरोज एकदम ठीक होतो...
मुबारक मौलाना एक ताईत आणि काही फलिते जाळण्यासाठी देतात....

काही वेळ थांबून मुबारक मौलाना तिथून निघून जातात....
दुसरा दिवस उजाडतो
फिरोज आता पूर्णपणे ठीक झालेला असतो...
तो चहा पाणी घेऊन आपल्या दुकान वर जातो...

तो दिवस सर्वांसाठी खूप चिंतेचा होता
सर्वांना भीती असते परत काही होईल का ?
पण सर्व काही ठीक असते
तो दिवस खूप चांगला जातो...
सर्वांची चिंता कमी होते....

दिवसामागून दिवस जात असतात
फिरोज ला कसलाही त्रास होत नाही....
तीन महिन्याचा कालावधी निघून जातो...
सर्व जण त्या दुष्ट आत्म्याला विसरून जातात
पण त्या दृष्ट आत्म्याने सर्व काही विसरले आहे का ?
एखाद्या नवीन षड्यंत्र च्या तयारी तर नाही ना ?

दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतो...
दिवाळीच्या मालाच्या खरेदीसाठी
मोटर सायकल वरुन
फिरोज आणि शाबाद सोलापूरला जातात...
दिवाळीच्या मालाची खरेदी करून....
दोन दिवस नातेवाईकाकडे मुक्काम करतात..
तिसऱ्या दिवशी मोटर सायकल वरून आपल्या गावाकडे रवाना होतात...

पुढे कोणते तरी महासंकट त्यांचे वाट बघत आहे याची त्यांना कसलाही भान त्यांना नसतो....
फिरोज मोटर सायकल चालवत असतो...
मंगळवेढा मध्ये आल्यावर मोटरसायकल अचानक बंद पडते...
शाबाद च्या अंगावर काटा येतो..
मोटर सायकल अचानक कशी काय बंद पडली ?
हा प्रश्न त्याच्या मनात येतो....

शाबाद ला कळून चुकतं
काहीतरी मोठं संकट येणार आहे...
शाबाद फिरोज ला विचारतो
काय झालं ?
गाडी अचानक कशी काय बंद पडली ?

फिरोज म्हणतो काय झालं काहीच कळत नाही...
माझं अंग खूप दुखायला लागला आहे...
खांद्यावर कोणीतरी बसला आहे असं वाटत आहे....
शाबाद भिऊन गार होतो...
त्याला पक्का विश्वास होतो त्या दृष्ट आत्म्याने परत फिरोज ला पकडलं...

फिरोज गाडीवरून उतरतो
आणि शाबाद ला म्हणतो
पप्पा मला कसंतरी होत आहे..
झोपाव असं वाटतं
मी इथेच झोपतो
तुम्ही जावा इथून परत
मी काय आता इथून येणार नाही....

शाबाद च्या पायाखालची जमीन सरकते
आता काय करावं त्याला काहीच कळत नाही...
फिरोज तिथेच गवतावर झोपी जातो...
तासभर विचार करून शाबाद
हिम्मत करून फिरोज ला उठवतो आणि म्हणतो चल जाऊया आपण परत आपल्या गावी....

फिरोज जायला काय तयार होत नाही
शाबाद कसाबसा जबरदस्तीने फिरोज ला गाडीवर बसवतो..
गाडी चालवत परत आपल्या गावाच्या दिशेने निघतो...
फिरोज शाबाद च्या खांद्यावर डोके ठेवून झोपी जातो...

थांबून थांबून शाबाद फिरोज ला घेऊन आपल्या गावी परततो....
घरात आल्यावर त्याच्या जीवात जीव येतो...
उस्मान आपल्या दुकान वर असतो
शाबाद फोन करून त्याला घरी बोलावतो.. घरी आल्यावर शाबाद त्याला घडलेला सर्व प्रकार सांगतो....

उस्मान धीर देत म्हणतो 
पप्पा तुम्ही काहीही काळजी करू नका
काहीही होणार नाही
सर्व काही ठीक होईल.....
फिरोज शांतपणे झोपलेला असतो...
पण ही शांतता थरकाप उडवणारी असते...
अंत्यंत भीतीदायक असते....

उस्मान फिरोज च्या जवळ जाऊन
त्याच्या कानात आजान देतो...
तसा फिरोज रागाने उठतो...
त्याच्या डोळ्यात क्रूरता दिसत होती...
तोंडावर शैतानी हाव-भाव होते...

अशी अवस्था पाहून उस्मानच्या मनात ही थोडीशी भीती निर्माण झाली...
तरीही हिम्मत करून उस्मान फिरोज ला
शांत करतो.....

   फिरोज शांतपणे झोपी जातो....
परंतु संकटाची टांगती तलवार अजून डोक्यावर होती....
कोणते तरी मोठे संकट येणार याचा संकेत सारखा येत होता....
उस्मान ला ही कळालं होतं...
आपल्याला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.....

उस्मान मुबारक मौलाना फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगतो....
मुबारक मौलाना म्हणतात तुम्ही भिऊ नका अल्लाह वर विश्वास ठेवा
तो सर्व काही ठीक करेल...
मी उद्या येतो मग पुढे काय करायचं ठरवू...

दुसरा दिवस उजाडतो
मुबारक मौलाना शाबाद च्या घरी येतात...
फिरोज शांतपणे झोपलेला असतो....
मुबारक मौलाना यांनी घरात पाऊल ठेवताच फिरोज जागा होतो.....

फिरोज खंबीरपणे मुबारक मौलाना च्या समोर उभा राहिला....
त्याच्या डोळ्यात आता भीती दिसत नव्हती...
मुबारक मौलानांना पाहून फिरोज च्या चेहऱ्यावर शैतानी हास्य येतं....

मुबारक मौलाना फिरोज ला आपल्यासमोर बसवतात....
मुबारक मौलाना फिरोज ला विचारतात
कोण आहेस तू ?
परत का आलास इकडे ?
बोल लवकर कोण आहेस तू ?

फिरोज या शरीरातील प्रेतात्मा काहीच बोलत नाही....
फक्त गुरगुरत राहतो....

मुबारक मौलाना म्हणतात तू असा नाही ऐकणार...
बोल लवकर कोण आहेस तू ?
काय दुष्मनी आहे याच्याशी ?
बोल लवकर नाहीतर बाटलीत बंद करीन...

मुबारक मौलाना कुरान च्या मंत्राचे पठण करून त्याला खूप त्रास द्यायला सुरुवात केली...
त्याला त्रास असह्य होऊ लागला...
तो खूप तळमळू लागतो....
शेवटी त्रास सहन न होऊन ते दुष्ट आत्मा फिरोज च्या शरीरातून निघून जाते....

काही वेळानंतर फिरोज बरा होतो....
तो रडायला लागतो....
मुबारक मौलाना त्याला विचारतात का रडायला लागला आहे....
ते दुष्ट आत्मा कोण आहे माहित आहे का तुला ?
त्याने तुला स्वतः बद्दल काही सांगितलं आहे का ?

फिरोज स्वतःला सावरत मुबारक मौलाना ना म्हणतो
ती दुष्ट आत्मा फार वाईट आहे...
ती आत्मा एका माणसाची आहे....
खूप त्रास देतो तो मला....

त्याने सांगितले आहे तो मला कधीही सोडणार नाही....
परत परत माझ्या शरीरात येत राहणार...
जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुझ्या शरीरात राहणार....
माझी इच्छा पूर्ण झाल्यावर तुला माझ्या संग घेऊन जाणार....
तुला मी जिवंत सोडणार नाही.....
एवढे बोलून फिरोज मोठ मोठ्याने रडू लागला.....

फिरोज मुबारक मौलानांना म्हणतो
तो मला जिवंत सोडणार नाहीस
मला वाचवा 
मला खूप भीती वाटत आहे
तो खूप भयानक आहे वाचवा मला...
इतकें बोलून फिरोज परत रडू लागला....

मुबारक मोलाना फिरोज ची समजूत काढत म्हणतात...
अजिबात भिऊ नकोस...
तो काहीही करणार नाही तुला...
मी आहे ना मी तुला काही होऊ देणार नाही...
तू फक्त अल्लाह वर विश्वास ठेव
तो सर्व काही ठीक करेल...
आणि त्या दुष्ट आत्म्याला शिक्षाही देईल....
तू धीर सोडू नकोस.....

फिरोज म्हणतो तो परत येणार आहे...
त्याने मला सांगितले आहे मी परत आणि येणार आहे...
मुबारक मौलाना बोलतो त्यांनी स्वतःचे नाव सांगितलं आहे का ?
तो कोण आहे कशाला आला आहे काही सांगितले आहे का ?

फिरोज म्हणतो त्याने स्वतःबद्दल काही सांगितलेले नाही....
मुबारक मौलाना म्हणतात तो कसा दिसतो माहित आहे का तुला ?
कशा पद्धतीने तुझ्यासमोर येतो काय काय करतो सांग मला.....

फिरोज म्हणतो तो माझ्या शेजारी येऊन झोपतो....
माझ्या डोक्यावरून पायाकडे जातो....
खूप भयानक दिसतो तो...
चेहरा पूर्ण सडलेला आहे....
डोक्यावर पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधला आहे....
त्याचा चेहरा पाहून असं वाटतंय की माशांनी त्याचा चेहरा खाऊन टाकला आहे...

एवढं ऐकताच शाबाद अचानक उठून उभा राहतो
हा तर माझा मामा सलीम आहे...
तीस वर्षापूर्वी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली होती....
त्याच्या मनात माझ्याबद्दल वैरी निर्माण झाली होती....
तो सुडाच्या भावनेने परत आला आहे...
माझ्याबरोबर ची दुश्मनी तू माझ्या पोरग्या बरोबर काढणार....
माझ्या पोराला वाचवा....
शाबाद ला दुःख अनावर होतं
तो रडू लागतो....

मुबारक मौलाना म्हणतात भीऊ नका काही होणार नाही....
मी फिरोज ला काही होऊ देणार नाही...
तुम्ही काळजी करू नका...
तुम्ही आधी शांत व्हा आणि मला एक सांगा
हा सलीम कोण आहे ?
तुमच्यात आणि त्याच्यात का वैर निर्माण झाले ?

शाबाद म्हणतो
सलीम पठाण हा माझा सख्खा मामा
त्याचं आणि माझं चांगलं जमत होतं...
मामा भाच्या पेक्षा मैत्री चे नाते घट्ट होते...
त्‍याला दारू पिण्याची सवय होती...
या वाईट सवयी मुळे आमच्या मध्ये दुरावा निर्माण झाला.....

मैत्री कधी दुश्मनी बदलली कळलच नाही..
त्यांनी कट्टर माझ्याशी वैर धरलं होतं
आणि मला सांगितलं ही होतं की तो बदला घेणार...
आता तो बदला घेण्यासाठी आला आहे.....

मुबारक मौलाना थोडावेळ विचार करतात आणि म्हणतात...
भीतीचं काहीच कारण नाही...
तो फिरोज ला काहीच करू शकणार नाही...
याची हमी मी देतो....

अल्लाह वर विश्वास ठेवा...
तो खूप मोठा आहे...
गफूरु रहीम आहे...
त्याच्यापुढे अशा दुष्ट आत्म्याचं काहीही चालत नाही..
अल्लाह सर्व काही ठीक करेल...
त्याच्यावर विश्वास ठेवा....

मुबारक मौलानांच बोलणे ऐकून
सगळ्यांच्या जीवात जीव येतो...
मुबारक मौलाना म्हणतात...
हा प्रेतात्मा एक उद्दिष्ट धरून येथे आला आहे...
त्याचा मनसुबा काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हजरी लागणे गरजेचे आहे....

त्याची हजेरी लागली तर आपण त्याचा कायमचा बंदोबस्त करू....
परत फिरोज ला काहीही त्रास देऊ शकणार नाही.....
तोपर्यंत तुम्ही फिरोज ची काळजी घ्या...
सर्व काही ठीक होईल....
मी येतो आता....
इतकं बोलुन मुबारक मोलाना निघून जातात...

फिरोज अजूनही झोपलेला असतो...
रात्री नऊ वाजता फिरोज उठतो...
आणि जेवायला मागतो....
ज्या ज्या वस्तू सलीमला आवडतात त्या वस्तू फिरोज जेवण्यात मागतो...
जेवण करून तो शांत झोपी जातो....

कशीबशी सकाळ होते...
सकाळी उठून फिरोज घरातून फिरू लागतो...
घरच्या लोकांबरोबर बोलू लागतो....
परंतु त्याचं बोलणं वागणं सर्वकाही हुबहू सलीम सारखं दिसत होतं....
तीस वर्षाचा सलीम साठ वर्षाचा वयोवृद्ध वाटत होता....

सर्व पाहून शाबाद मला पक्की खात्री होती..
त्याच्या मुलाच्या शरीरात दुसरा कोणी नसून त्याचा मामा सलीम आहे....
दिवसभर फिरोज घरातून वावरतो...
खातो-पितो जास्त कोणा बरोबर बोलत नाही
स्वतःमध्येच गुंग राहतो....

संध्याकाळी होतच
फिरोज चा मूड बदलतो
तो दंगा करू लागतो...
कोणाचेही ऐकत नाही....

शाबाद उस्मान ला फोन करून दुकान वरून घरी बोलावतो...
उस्मान घरी येतो आणि फिरोज ची हालत बघतो...
फिरोज अजूनही शांत झालेला नसतो...
उस्मान फिरोज ला मागून कवळा घालतो आणि त्याच्या कानामध्ये आजान देतो....

तसा फिरोज जास्तच उग्र होतो...
तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो....
परंतु उस्मान आपली पकड घट्ट करू त्याला जाण्यापासून रोखतो.....

उस्मान फिरोज च्या कानात वारंवार आजान चे पठण करतो....
थोडावेळ दंगा करून तळमळून फिरोज एकदम शांत होतो....
उस्मान फिरोज ला पिण्यासाठी पाणी देतो...

पाणी पिल्यानंतर उस्मान फिरोज ला
विचारतो...
कोण आहेस तू ?
काय नाव आहे तुझं सांग ?
फिरोज काहीच बोलत नाही....
बराच वेळ उस्मान विचारत राहतो.....
पण फिरोज काहीही बोलायला तयार नसतो...
       
अचानक शाबाद फिरोज ला म्हणतो..
तू माझा मामा सलीम आहेस ना ?
का माझ्या मुलाला छळत आहे ?
का  त्याला त्रास देत आहे ?
त्याने काय वाईट केला आहे तुझं ?
तुझी दुश्मनी माझ्याशी आहे तू मला त्रास दे माझ्या मुलाला सोडून दे....

एवढं ऐकताच फिरोज मोठमोठ्याने रडू लागतो...
शाबाद ला म्हणतो शाबाद तुने ओळखलं मला ती मी तुझा मामा सलीम आहे..

फिरोज चे म्हणजे त्याच्या शरीरात असणाऱ्या सलीम चे रडणे चालूच असते..
शाबाद देखील रडू लागतो...
शाबाद ला रडताना पाहून
सलील म्हणतो
रडू नकोस मी तुझ्या पोराला काहीही करणार नाही....

तुझ्या बद्दल माझ्या मनात कोणतीही वैर नाही तू भिऊ नकोस....
इथे मी माझ्या बहिणीला भेटायला आलो आहे...
इतके दिवस मी इथे आहे सर्वजण मला भेटायला आले पण तुझी आई चाली नाही...
ती का आली नाही ?
कुठे आहे ती ?
तिची तब्येत ठीक आहे ना ?

शाबाद ला काय बोलावे काहीच कळत नाही...
कारण एक वर्षापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते...
आता खरं सांगितलं तर रागाच्या भरा मध्ये सलीम फिरोज ला काहीतरी करेल
ही भीती शाबाद च्या मनात होती...

शाबाद सलीमला म्हणतो
ती जुन्या घरांमध्ये आहे...
त्याचे मणक्याचे ऑपरेशन झाली आहे...
तिला चालता फिरता येत नाही म्हणून ती इथे आली नाही.....

सलीम म्हणतो तिला सांग मी तिला भेटायला आलो आहे....
खूप वर्ष मी तिला भेटायची वाट पाहिली
आता तिला भेटल्या शिवाय मी इथून जाणार नाही....

शाबाद म्हणतो तू इथे आला कसा ?
तुला कसं कळलं फिरोज माझा मुलगा आहे ?
सलीम म्हणतो मि फिरोज ला
तुझ्याबरोबर बऱ्याच वेळा पाहिलं होतं
तेव्हा मला अंदाज आला की हा तुझा मुलगा आहे...
आणि माझा अंदाज खरा ठरला.....

जिथे माझा जीव गेला होता...
तिथे फिरोज आला होता...
आणि त्या ठिकाणी लघवी केली....
मला संधी मिळाली त्याला धरण्याची...
आणि मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला
दोन दिवस गपचूप त्याच्या शरीरामध्ये राहिलो.....

कोणालाही कोणतीही शंका आली नाही...
इथे येण्यासाठी तो सोलापूर होऊन निघाला..
मी त्याच्या शरीरातच होतो...
मी त्याच्या खांद्यावर बसलो होतो...
मंगलवेळा येताच अचानक काय घडलं
काही कळलच नाही.....

माझी पकड सैल झाली
आणि बघता बघता तो माझ्या तावडीतून सुटून गेला...
मी बघतच राहिलो...

तीन महिने मे मंगलवेळा मध्येच राहिलो...
मला पूर्ण विश्वास होता तो परत येणार...
रोज दिवस रात्र मी त्याची वाट पाहत होतो...
एक दिवस तू मला मोटर सायकल वरून येताना दिसला....

मला परत संधी मिळाली होती...
ही संधी आता मला माझ्या हातून जाऊ द्यायची नव्हती....
काहीही करून त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा होता.....

फिरोज जवळ येतात मी त्याच्या मानगुटीवर बसलो...
माझी पकड आता मी घट्ट केली होती....
त्याच्या बरोबर मी सोलापूरला गेलो
त्याच्या बरोबर तिथे आठ दिवस राहिलो...

फिरोज नाही कोणतीही शंका येऊ दिली नाही की मी त्याच्या शरीरात आहे....
त्याला कोणताही त्रास दिला नाही....
गपचूप त्याच्या शरीरामध्ये राहिलो....

त्याच्याबरोबरच मी इथे आलो...
माझ्या बहिणीला भेटायला...
शाबाद सलीमला म्हणतो
मामा तुझा इथून निघून
माझ्या पोराला सोडून दे....
त्रास देऊ नकोस माझ्या पोराला....

आणि तू मेला कसा ?
का आत्महत्या केलीस तू ?
सलीम म्हणतो मी आत्महत्या केली नाही..
काही उनाड पोरांच्या चुकीमुळे मला माझा जीव गमवावा लागला....

मरायचं नव्हतं मला
नशिबाने घात केला
शाबाद आश्चर्यचकित होऊन सलीमला म्हणतो....
तू आत्महत्या केली नाही तर मेला कसा ?
कोणी खून केला का तुझा ?

सलीम उत्तर देतो..
कुणी माझा खून केला नाही...
दुसऱ्याच्या चुकीमुळे मी मेलो..
फिरोज चे जेव्हा बारसं होतं
त्या दिवशी सर्वांनी मला एका खोलीमध्ये कोंडून ठेवले....

मला बारशाला यायचं होतं
कोणीही मला आपल्या संग घेऊन गेले नाही
या गोष्टीचा मला खूप राग आला..
काय करावे काहीही सुचत नव्हतं मला...
खूप आरडाओरडा केली
कोणीही माझ्या मदतीला आले नाही...


शेवटी माझं मानसिक संतुलन बिघडते...
मी खोलीची कडी तोडून चुलीतील राख तोंडावर फासून 
बाहेर फिरू लागतो.......

मला अशा अवस्थेत बघून
गावातील लोक मला वेडा वेडा बनवून चिडवू लागतात..
माझ्यावर हसू लागतात....
मला दगड मारू लागतात...
माझ्या मागे धावू लागतात...

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी पळू लागतो...
पळता-पळता त्या विहिरीपाशी येतो...
तरीही काही लोक माझा पिच्छा सोडत नाही...

त्या विहिरी लगतच वडाचं मोठं झाड होतं..
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी त्या झाडावर चढून बसलो...
काही वेळानंतर ते लोक तिथून निघून गेले...
मी खाली उतरत असताना माझा तोल जातो आणि मी विहिरीत जाऊन पडतो...

        पोहता येत नव्हतं...
खूप प्रयत्न केला स्वतःचा जीव वाचवण्याचा
परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले...
शेवटी तडफडत तडफडत माझा जीव गेला...

त्यानंतर तुमची मी खूप वाट पाहिली...
तुमच्यापैकी कोणीही मला भेटायला आला नाही...
सर्वजण मला विसरून गेले...
गेली तीस वर्ष मी भटकत होतो...
माझ्या आत्म्याला मुक्ती नाही मिळाली...
माझ्या आत्म्याला खूप त्रास झाला....

माझ्या बहिणीला भेटायची माझी शेवटची इच्छा आहे
ती पुर्ण झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही...
हा माझा शेवटचा निर्णय आहे.....

सलीम चे हे बोलणे ऐकून शाबाद ला धक्काच बसतो....
कारण सलीम ची बहिण म्हणजे शाबाद ची आई आता हयातीत नसते...

ही गोष्ट सगळी त्याला सांगितलं तर तो आपल्यावर विश्वास ठेवणार नाही असं शाबाद ला वाटलं...
त्याला वाटेल आपण त्याची फसवणूक करत आहोत ....
मुद्दाम त्याला तिच्या बहिणीला भेटू देत नाही..

सलीमचा स्वभाव शंकेखोर  ,रागीट , तापट होता...
त्यामुळे सलीमला सत्य सांगण्याची हिम्मत शाबाद ला नाही झाली....
काय करावे शाबाद ला काहीच कळत नव्हते...

शाबाद उस्मान बरोबर चर्चा करून
मुबारक मौलानांना फोन करतो...
घडलेली सर्व घटना सांगतो....
मुबारक मौलाना म्हणतात...
काही काळजी करू नका 
मी उद्या येतो काहीतरी मार्ग काढू....

सारी रात विचारतच जाते...
सर्वजण आपापली कामे आवरून मुबारक मौलाना ची वाट पाहत बसतात....
चार वाजण्याच्या दरम्यान मुबारक मौलाना शाबाद च्या घरी येतात....

फिरोज ला समोर बसवून विचारतात...
कोण आहेस तू ?
इथे का आला आहेस ?
जा इथून निघून ?

फिरोज च्या शरीरातून सलीम बोलतो
मी नाही जाणार इथून
जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही....
मला माझ्या बहिणीला भेटायचे आहे...
तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी तिला भेटल्या शिवाय मी इथून जाणार नाही....

                  
मुबारक मौलाना म्हणतात 
तुझी बहीण आता या जगात नाही.....
मागच्या वर्षी तिचं निधन झालं आहे...
आता तुझी आणि तिची भेट होणे शक्य नाही....
तू आता इथून कायमचा निघून जा.....

हे ऐकून सलीम जोरजोरात रडू लागतो...
आरडा-ओरडा करू लागतो
तासाभरानंतर तो भानावर येतो....
आणि मुबारक मौलानांना म्हणतो...

माझ्या बहिणीला काहीही झालेलं नाही
ती बिलकुल ठीक आहे....
तुम्ही खोटं बोलत आहात माझ्याशी....
मला तिला भेटायचं आहे...
मी नाही सोडणार आता याला....

मुबारक मौलाना म्हणतात...
खूप नाटकं झाली आता तुझी
गपगुमान इथून निघून जा
नाहीतर आता तुझी काही खैर नाही.....

सलीम म्हणतो माझ्या बहिणीला भेटल्याशिवाय मी जाणार नाही...
तुम्ही कितीही त्रास द्या मला मी जाणार नाही...

मुबारक मौलाना पाण्यावर कुरान मधील मंत्राचे पठण करून ते पाणी सलीमच्या चेहर्‍यावर मारतात....
सलीम ला खूप त्रास होतो...
आता त्रास त्याला असह्य होतं...
तो फिरोज चे शरीर सोडून जाण्यास तयार होतो....

सलिम मुबारक मौलानांना म्हणतो...
मला आता त्रास देऊ नका...
मी जातो कायमचा याला सोडून
फक्त तुम्ही मला सोलापूरला नेऊन सोडा...
सोलापूरला गेल्यावर मी लगेचच शरीर मोकळे करून जातो....

मुबारक मौलाना म्हणतात ठीक आहे...
पण तिथे गेल्यावर बदलायचं नाही
नाही तर याद राख गाठ माझ्याशी आहे....
सलीम म्हणतो नाही बदलनार तुम्ही मला सोलापूरला न्या मी लगेच त्याच शरीर सोडतो....

मुबारक मौलाना शाबाद ला सांगून गाडी करून लगेच सोलापूरला रवाना होतात...
रात्री तीनच्या दरम्यान ते सोलापूरला जाऊन पोहोचतात....
ज्या जागी सगळ्यांचा जीव गेला होता त्या जागी फिरोज ला नेतात.....

काही वेळातच सलीम फिरोज च्या शरीरातून निघून जातो...
जाताजाता तो मुबारक मौलानांना म्हणतो...
तुम्ही मला खोटं बोलला...
माझी बहीण मेली नाही ती जिवंत आहे....
तिला भेटण्यासाठी मी परत येणार....

सोलापूर हुन सर्वजण परत कवठेएकंद येतात.....
मुबारक मौलाना फिरोज ला सोलापूर ला जाण्यास सक्त मनाई करतात....
आणि ते तिथून निघून जातात....
शाबाद घडलेला सर्व प्रकार घरी सांगतो...

सलीम परत येणार असे सांगून गेलेला आहे त्यामुळे सर्व जण चिंतेत पडतात....
असाच चार महिन्याचा कालावधी निघून जातो....
फिरोज ला कोणताही त्रास होत नाही....
सलीम काही सर्वांना आता विसर पडलेला असतो.....

काही दिवसानंतर फिरोज ची सासू आजारी पडते....
फिरोज ची ही सासरवाडी सोलापूरची असते...
मुबारक मौलानांनी त्याला जाण्यास सक्त मनाई केलेली असते...
त्यामुळे फिरोज ला सोलापूर ला जायची हिम्मत होत नाही.....

आणखी काही दिवसानंतर फिरोज च्या सासूचे निधन होते....
आता फिरोज ला आता जाणं भाग होतं...
शाबाद मुबारक मौलानांना विचारण्यासाठी फोन लावतो परंतु मुबारक मौलानांचा फोन लागत नाही......

थोडा वेळ विचार करून शाबाद निर्णय घेतो..
फिरोज ला तिच्या आईबरोबर सोलापूरला पाठवायचा.....
दोघेजण सोलापूरला रवाना होतात....

दफन विधी चा कार्यक्रम होतो...
तीन दिवस फिरोज आणि तिची आई सोलापूरला मुक्काम करतात.....
या तीन दिवसात फिरोज ला कोणताही त्रास होत नाही.....

सर्वजण आनंदी असतात
सलीमने फिरोज चा पिच्छा सोडला म्हणून...
पण खरोखरच सलीमने पिच्छा सोडला होता का ?

नियतीला काही वेगळेच मान्य होतं....
सर्व कार्यक्रमावरून फिरोज आपल्या बहिणीच्या घरी जातो....
खूप थकलेला असतो म्हणून आराम करू लागतो....

दहा-पंधरा मिनिटांनंतर फिरोज गुरगुरू लागतो...
अचानक फिरोज ला काय झालं कोणालाही काही कळत नाही....
हळूहळू सर्व वातावरण बदलू लागतं
आनंदाची जागा आता भीतीने घेतलेली असते.....

फिरोज खूप दंगा करू लागतो इकडे तिकडे पळू लागतो अंगावर जाऊ लागतो....
या गोष्टीची खबर लागताच फिरोजचा मामा एका मौलवीला घेऊन येतात  ....
       
मौलवी खूप प्रयत्न करतात सलीमला शरीरातून बाहेर काढण्याचा...
त्याला खूप त्रास देतात.....
पण त्यांना यश येत नाही....

फिरोज खूप आक्रमक होतो....
सर्वजण भयभीत होऊन रडू लागतात....
फिरोज म्हणजे सलीम मौलवीला म्हणतो...
एक लिंबू घेऊन तु मला या शरीरातून बाहेर काढणार आहेस का...
तू माझं काहीही करु शकत नाही...
हा माझा इलाका आहे....

आता मी बघतो कसं वाचवताय याला माझ्या तावडीतून....
आता मी यांना ठार मारून माझ्या संग घेऊन जाणार आहे....
तू मला अडवण्याचा प्रयत्न केल्यास तर तुलाही मारून टाकेल
जीव वाचवायचा असेल तर जा इथून.....

     इतकं बोलून सलीम मोठमोठ्याने हसू लागतो....
सलीम आता खूप शक्तिशाली झालेला असतो ....
त्याच्यापुढे त्या मौलवी च काहीही चालत नाही...
शेवटी हतबल होऊन मौलवी तेथून निघून जातात....

सर्वांच्या मनात आता भीती निर्माण होते...
सर्वांना वाटतं सलीम फिरोज ला
ठार मारून टाकणार....
फिरोज ची आई त्याला म्हणते आपण परत आपल्या गावी जाऊ....

लगेच रागारागात सलीम म्हणतो मी याला कुठेही जाऊ देणार नाही...
हिम्मत असेल तर याला नेऊन दाखवा....
तुम्ही आता माझ्या इलाक्यात आला आहे...
इथे माझ्याशिवाय कोणाचेही काही चालत नाही.....

फिरोज ची बहिण उस्मान ला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगते...
उस्मान म्हणतो घाबरण्याचं काहीही कारण नाही....
तो दुष्ट आत्मा काहीही करू शकणार नाही...
तुम्ही काहीही चिंता करू नका मी उद्या येतो...

कसा तो फिरोज ला नेऊ देत नाही बघूया...
सलीम आता पूर्णपणे आक्रमक झालेला असतो
उस्मान आपल्या बहिणीला फोन स्पीकरवर लावायला सांगतो.....
आणि मोठमोठ्याने आजान देतो.... तसा सलीम एकदम शांत होतो झोपी जातो...

दुसऱ्या दिवशी उस्मान गाडी करून सोलापूरला जातो
सकाळी अकराच्या दरम्यान उस्मान सोलापूरला पोहोचतो...

उस्मान आपल्या बहिणीच्या घरी जातो..
तिथे फिरोज शांत झोपलेला असतो...
उस्मान फिरोज त्या जवळ जाऊन त्याच्या कानामध्ये आजान देतो...
फिरोज जागा  होतो..

उस्मान ला म्हणतो तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत...
तू याला इथून घेऊन जाऊ शकणार नाही...
हा माझा इलाका आहे...

उस्मान शांतपणे फिरोज ला म्हणजे सलीम ला म्हणतो....
तू काहीही करू शकत नाहीस
मी फिरोज ला येथून घेऊन जाणार
हिम्मत असेल तर मला रोखून दाखव...

तुला जर मुक्ती हवी असेल
तर शांतपणे माझ्याबरोबर चल....
मी तुला वचन देतो तुला मुक्ती मिळवून देईन...

सलीम थोडा वेळ विचार करतो आणि म्हणतो..
ठीक आहे मला जर मुक्तीच मिळणार असेल तर मी तुझ्या बरोबर येतो....
दोनच्या दरम्यान उस्मान त्याच्या आईला आणि फिरोज ला घेऊन कवठे एकंद ला रवाना होतो....

सहाच्या दरम्यान ते कवठेएकंद पोहोचतात...
तिथे गेल्यावर उस्मान मुबारक मौलानांना बोलवून घेतो....
आठच्या दरम्यान मुबारक मोलाना शाबाद च्या घरी येतात....

तिथे आल्यावर सलीम ला विचारतात...
तुला मी मुक्ती मिळवून देतो...
तुझी शेवटची इच्छा काय आहे ते सांग...
परत तुझ्यावर दया केली जाणार नाही...
हा शेवटचा मौका आहे तुझ्याकडे....
बोल बोल लवकर.....

सलीम म्हणतो माझ्या बहिणीला भेटायची माझी इच्छा आहे...
मुबारक मौलाना म्हणतात ती मेलेली आहे...
सलीम म्हणतो ठीक आहे मला तिच्या कबर वर घेऊन चला....

सलीम ला तिच्या बहिणीच्या कबरीवर नेण्यात येते...
कबरीवर पडून सलीम मोठमोठ्याने रडू लागतो...
आपल्या बहिणीची माफी मागू लागतो...

नंतर मुबारक मौलानांना म्हणतो माझ्या बहिणीच्या कबरीवर ची तीन मुठ माती घ्या..
आणि जिथे मी मेलो आहे त्या जागे वरची तीन मूठमाती घ्या आणि माझ्या कबर मध्ये दफन करा...
पूर्ण अंत्यविधी करा मी मुक्त होऊन कायमचा निघून जाईल....

मुबारक मौलानांना हे माहीत असतं हे सर्व करून देखील सलीमला मुक्ती मिळू शकणार नाही...
कारण अल्लाह आत्महत्या करणाऱ्या लोकांना कधीही मुक्ती देत नाही....

तरीही मुबारक मौलाना सलीम मी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी विधीपूर्वक करतात.....
तरीदेखील सलीमला मुक्ती मिळत नाही...

त्यानंतर सलीम दोन-तीन वेळा फिरोज च्या शरीरात येतो...
मुबारक मौलाना प्रत्येक वेळी त्याला शरिरातुन बाहेर काढतात...

आज या गोष्टीला दोन वर्षे पूर्ण झाली फीरोज आता व्यवस्थित आहे
या दोन वर्षात त्याला कोणताही त्रास होत नाही...
या दोन वर्षात सलीम त्याच्या शरीरात येत नाही...

सर्वजण आता या घटनेला विसरून गेले आहेत...
मुबारक मौलानांना देखील आता खात्री झालेली आहे की सलीम आता परत त्रास देणार नाही...

या घटनेनंतर सलीम कुठे गेला त्याच काय होणार नाही याची कल्पना नाही....
सलीम ची भीती अजून देखील प्रत्येकाच्या मनात आहे....
फिरोज बरोबर परत अशा घटना होऊ नये याच्यासाठी मुबारक मौलाना उपाययोजना करत आहे....

   मुस्ताक अली शायर
तासगांव सांगली महाराष्ट्र       
7887481053

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

लड़का: शुक्र है भगवान का इस दिन का तो मे कब से इंतजार कर रहा था। लड़की : तो अब मे जाऊ? लड़का : नही बिल्कुल नही। लड़की : क्या तुम मुझस read more >>
Join Us: