कोण तो – माधव मुळे

कोण तो – माधव मुळे

कपाळावर कुंकू तू
कोरलं कुणाच्या नावाचं
सांग ना नशीबवान ते
आहे तरी कुण्या गावाचं

माझ्यात व त्याच्यात
तू काय पाहिलाय फरक
तो म्हणजे स्वर्ग तर
मी म्हणजे नरक

माझ्यात ग प्रिये
काय कमी होत
मंग त्याच्यासोबत का
जोडलस सात जन्माचं नात

मनोमन माझं काळीज
तेव्हा बघ चेतलं
त्याच्या हाताने जेव्हा तू
मंगळसूत्र घातलं

तू फेरे घेतांना त्याच्या
सोबत पाणी डोळ्यात आलं
अन त्याच ग वेळी माझ्या
प्रेमाच मातेर झाल

इवल्याशा रागामुळे
खूप दूर गेलीस
माझ्यासाठी सात जन्म
परकी तू झालीस

सात जन्म तुझा wait
नाही सखे होणार
मीच आता तुझ्यामांगे
आयुष्य संपुन घेणार

तुला अडचण नसेल
तर सांग मी येउका
हे आयुष्य संपुन पुन्हा
दुसरा जन्म घेउका

Mahadu muleमाधव मुळे

3+
comments
  • Heart Touching Lines Bhai….!

    0

  • Leave a Reply

    Create Account    Log In Your Account