मी वाट बघतोय – विशाल परशुराम मुळे

मी वाट बघतोय – विशाल परशुराम मुळे

आयुष्याच्या एका वळणावरती
मी तुझी वाट बघतोय
फक्त एकदा ये मी वाट बघतोय ॥

अपेक्षा तुझ्याकडून मला एकच असणार
तू असावी शांत, निरागस,
नसेल राजकुमारी, असावी मनाने सुंदर ॥

नसेल माझ्याकडे सर्व काही तरी
सुंदर,नाजूक,कोमल विचार नक्कीच आहे,
कर्तृत्वाने भरलेलं मन नक्कीच आहे ॥

नसेल माझ्याकडे सर्व काही तरी
भावना समजून घेणारं मन नक्कीच आहे,
भरभरून प्रेम देणारं हृदय नक्कीच आहे ॥

नसेल माझ्याकडे सर्व काही तरी
एक नवा उत्साह नक्कीच आहे ,
एक नवी संवेदना नक्कीच आहे ॥

नसेल माझ्याकडे सर्व काही तरी
आयुष्यभर सुखी ठेवेन,एवढं नक्कीच आहे,
उदास तू होणार नाही,एवढं नक्कीच आहे ॥

नसेल माझ्याकडे सर्व काही तरी
सर्व काही देण्याचं सामर्थ्य,नक्कीच आहे,
तुझी स्वप्ने पूर्ण करण्याची,जिद्द नक्कीच आहे ॥

अपेक्षा तुझ्याकडून मला एकच असणार
तू मुलगी असावी गरिबांची,
जिद्द हवी आयुष्य सुंदर करण्याची ॥

vishal muleविशाल परशुराम मुळे

0

Leave a Reply

Create AccountLog In Your Account