मृत्यू – माधव दादाराव मुळे

मृत्यू – माधव दादाराव मुळे

रडत होते जवळ सगळे
मि गप्प पडून होतो
गोळा झालते सोयरे समदे
भीतीशी मी दडून होतो

जो येईल तो मला
बघायला आत यायचा
डोळे भरायचे अश्रूंनी
तरी एकटक पाह्यचा

लेकर सोन्यासारखी माझी
पप्पा जोरात म्हणत होती
एकत्र येऊन भावकी माझी
लाकडं गोळा करून आणत होती

सरण रचून स्मशाणात
तयार पूर्ण झालत
अंघोळीला घ्या बाहेर
कुणीतरी बोलवायला आलत

खांदेकरी चौघेजण
लगेच तिथे आले
उचलून मला सरणावर
जाळण्यासाठी नेले

तेव्हा वैऱ्यांचेही डोळे
आसवांनी वाहिले
आत्मा गेली सोडून
खाली शरीर फक्त राहिले

अग्नी मध्ये शरीर माझ
चटके खाऊन जळत होत
मृत्यू झाला हे तेव्हा
मला कळत होत

madhav mulleमाधव दादाराव मुळे

2+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account