पैसा हवाय की नातं – विशाल परशुराम मुळे

पैसा हवाय की नातं – विशाल परशुराम मुळे

आयुष्यात माझ्या येताना
आधीच ठरवून ये ।
पैसा हवाय की नातं
आधीच सांगून दे ॥

निरीक्षण करता जगाचे
सर्वजण पैशाला मानतात ।
लाखो हुंडा देऊनही इथे
मुली माहेराला नांदतात ॥

पैशासाठी कधीच मी
सर्वकाही करणार नाही ।
नात्यासाठी माझ्या मात्र
केल्याबिगर राहणार नाही ॥

पैसा नसला तरी
गरजेपुरतं खूप आहे ।
नातं तुझं जपण्याची
पूर्वतयारीही खूप आहे ॥

तुला पैसा हवा असेल तर
आयुष्यात माझ्या येऊच नको ।
प्रेमळ माणसं हवी असेल तर
आल्याबिगर राहू नको ॥

Vishal Muleविशाल परशुराम मुळे

0

Leave a Reply

Create AccountLog In Your Account