प्रार्थना जिजाऊची-माधव दादाराव मुले

प्रार्थना जिजाऊची-माधव दादाराव मुले

हात जोडुनी विनवितो
तुजला येणा तू आई
तुझ्या लेकींना बघ ना
इथे गं सौरक्षण नाही

बाळ तुझा तो शिवबा आम्हाला
देना गं आई
जनतेचे तू कल्याण करण्या
येणा तू आई

जाधव घराणी जन्म पुंन्हा तू
घेणा गं आई
हात जोडुनी विनवितो तुजला
येणा तू आई

बघण्या तुला हे डोळ माझं
करतय खूप घाई
हात जोडुनी विनवितो तुजला
येणा तू आई

दिवसेंदिवस हि नराधमांच्या
संख्येमध्ये वाढ गं होई
दावन्या त्यांना मरणाची वाट
येणा तू आई

जोवर तू गं येणार नाही
माघार बघ मी घेणार नाही
रोज जीव वाट तुझी पाही
हात जोडुनी विनवितो तुजला
येणा तू आई

 

Madhav Mule

 

माधव दादाराव मुले

2+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account