प्रेमात पडायचं राहूनच गेलं – विशाल परशुराम मुळे

प्रेमात पडायचं राहूनच गेलं – विशाल परशुराम मुळे

बालपण खेळण्यात गेलं
तारुण्य जबाबदारीनं हेरलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

वेडावलेल्या या मनाला
कलागुणांनी घेरलं ।
कलागुण प्राप्तीसाठी
अहोरात्र खपलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

कलाप्रेमीच्या या आयुष्यात
मैत्रिणीही खूप भेटल्या ।
सरळ मनाच्या या वेड्यानं
सर्वांनाच ताई बनविलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

कलाधुंदीत या मनानं
नजरेनं नाही बघितलं ।
निर्मळ मनानं मात्र
सरळ सरळ वागलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

सर्वांशी गोड मैत्री केली
सर्वांचा आदरच केला ।
मैत्री ,आदर, त्यानं
सारं सारं जपलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

ध्येयवेडं झालेलं मन
कामातच गुंतत राहिलं ।
काम करता करता
थकलं तेव्हा कळलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

निरागस या मनाचं
सारं काही झालं ।
आत्तापर्यंत त्यानं मात्र
कलेवरच प्रेम केलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

कलेनं त्याचं आयुष्य
सुंदर खूप बनविलं ।
त्या सुंदरतेला त्यानं
कलाप्रेमी नाव दिलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

आज या मनाला
प्रेमात पडावंस वाटलं ।
परत डोक्यात विचार आला
नको आयुष्यात काही तसलं ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं ॥

पडलंच प्रेमात मन
नवीन कलेच्याच पडेल ।
माझ्या आयुष्याला ते
नवीन आकार घडवेल ।
संस्कार जपलेल्या मनाचं
प्रेमात पडायचं राहूनच गेलं

Vishal Muleविशाल परशुराम मुळे

Ravi Kumar

मैं रवि कुमार गुरुग्राम हरियाणा का निवासी हूँ | मैं श्रंगार रस का कवि हूँ | मैं साहित्य लाइव में संपादक के रूप में कार्य कर रहा हूँ |

Visit My Website
View All Articles

I agree to Privacy Policy of Sahity Live & Request to add my profile on Sahity Live.

0

Leave a Reply

Create Account



Log In Your Account