राजकुमारी तू माझी – विशाल मुळे

राजकुमारी तू माझी – विशाल मुळे

राजकुमारी तू माझी
साथ तू देशील का?
सुंदर माझ्या स्वप्नांची
दुनिया तू होशील का?

राजकुमारी तू माझी
हातात हात घेशील का?
भेदरलो कधी मी
मिठीत तुझ्या घेशील का?

राजकुमारी तू माझी
माझे सुख तू होशील का?
सुंदर आयुष्यातील तुझ्या
दुःख मला देशील का?

राजकुमारी तू माझी
माझ्यात हरवशील का?
काळजीने कधी माझी
काळजी तू घेशील का?

राजकुमारी तू माझी
आनंद मला देशील का?
आयुष्यातील सप्तसुरांचे
जिवनगाणे तू होशील का?

राजकुमारी तू माझी
मनात नेहमी राहशील का?
पाऊलवाटा जीवनाच्या
सोबत घेऊन चालशील का?

राजकुमारी तू माझी
स्वप्ने नव्याने बगशील का?
जीवन आपले जगताना
स्वप्नांची जाणीव मला देशील का?

राजकुमारी तू माझी
आयुष्य सुंदर करशील का?
आयुष्याचा गोडवा आपल्या
हळूहळू वाढवशील का?

vishal muleyविशाल मुळे

1+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account