Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

काही गोष्टी आयुष्याच्या-एका छोट्याश्या शब्दाने

Raju Devaji Barat 09 Jun 2023 कहानियाँ अन्य आई , दुःख , आयुष्य 5628 0 Marathi :: मराठी

काही गोष्टी आयुष्याच्या..
                 आयुष्य! आयुष्य या एका छोट्याश्या शब्दाने माझे भान हरवून ठेवले . अगदी लहान वयात खूप काही शिकवून गेलं . 
                 एका छोट्याश्या गावात एक छोटासा परिवार राहत होता . दोन पाल्य असलेल्या तिसरा मुलगा झाला तो मी ! 6 जून 2004 रोजी माझा जन्म झाला . अगदी गरीब घराण्यात . माझी एक मोठी बहीण आणि भाऊ होता . अगदी चिमुकल्या व कोवळ्या मनाला घरात काय चालू आहे काहीच कळेना . क्षण सुखाचे असो वा दुःखाचे असो माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचे . लहानपणी मातीत खेळायचो . मोठ्या बहीण - भावाला कसा त्रास द्यायचो माझे मलाच माहित . कधी कधी चिडून मारायचे सुद्धा पण रडलो की अश्रू पण त्यांनीच पुसले . आई कामाला जायची त्याच्यामुळे आख्खा दिवस राहायचो . लहानपणी मला सर्वात जास्त आवडायची ती म्हणजे माझी आजी . तिच्यासोबत वेड्यावाणी मस्ती करत कधी शाळेचा वय झाला समजलच नाही . 
               तुम्हा आम्हाला माहितच आहे शाळेचे पहले दहा - पंधरा दिवस म्हणजे आयुष्यातले सर्वात वाईट दिवस . तो कंटाळवाणा अभ्यास , रोज शाळेत जाऊन आख्खा दिवस एकाच जागी बसून राहण्याची ती क्षमता ; मला काहीच जमत नव्हते . कधी कधी पळून पण जायचो . पण भावाच्याच शाळेत प्रवेश करून घेतल्यामुळे जास्त काळ हे टिकले नाही . हळूहळू शिक्षक सुध्दा माझ्याशी चांगल्या वागायला लागल्या . त्यांच्या म्हणण्यानुसार चांगला अभ्यास करू लागलो . माझ्या या गरीब घरात टीव्ही मोबाईल काहीच नव्हते . त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवस शाळेत , खेळ आणि पुस्तकांच्या धूंदितच जायचा . बहीण - भाऊ  शिकलेले असल्यामुळे मला कसा अभ्यास करावा लागेल यासाठी खूपशी मदत मिळाली . रात्री अभ्यासाच्या नावाने पुस्तकात असल्याल्या काल्पनिक माणसांना दाढी मिशा व चश्मा लावण्याची मजाच काही वेगळी होती . अशा या मस्तीखोर दिवसांत सुध्दा परीक्षेत चांगल्या गुणाने पास झाल्याने शिक्षकांचा सुध्दा मी लाडका होत चालला होतो . 
                 आख्खा दिवस शाळेत मस्ती - धिंगाणा करून रात्री थकून आलेल्या आईच्या कुशीत झोपण्याची मजाच काही वेगळी होती . आईच्या कुशीत झोपणे म्हणजे शिंपल्यांच्या मध्ये चमकणाऱ्या हिऱ्यासारखेच वाटत होते . अशा या सुखाशिल जीवनात कधी वादळ येऊन घर कोसळले कुणास ठाऊक . रस्त्याच्या अपघातात झालेल्या जखमा - वेदना आता आईला सहन होत नव्हत्या . जवळ - जवळ एक - दोन  महिने आई दवाखान्यात होती . आईच्या कुशीत झोपण्याची सवय निघून गेली होती . जणू माझ्या डोक्यावरची सावली निघुनच गेली होती . आई जरी दवाखान्यातून बरी होऊन आली असली तरी त्रास काही कमी झाला नव्हता . अपघातात आलेल्या जखामांमुळे आई नेहमी आजारी पडू लागली . उपचार करून करून तरी तिचा आजार काही बरा होत नव्हता . आणि एकेदिवशी तो काळा दिवस आलाच माझ्या आयुष्यात ज्याचा मी कधी विचार पण केला नव्हता . 29 जुलै 2015 रोजी आई मला नेहमीचीच सोडून गेली . अगदी 9 वर्षाच्या या मुलाला " आई " या शब्दाचा नीट अर्थ सुध्दा समजला नव्हता , अशा परिस्थितीत आईने एका लहान मुलाचा हात सोडून देणे म्हणजे त्या मुलासाठी खूप वाईट गोष्ट होती . सोबत असणे आणि आठवणीत जगणे यात खूप मोठा फरक असतो. 
            काही गोष्टी आयुष्याच्या...

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

लड़का: शुक्र है भगवान का इस दिन का तो मे कब से इंतजार कर रहा था। लड़की : तो अब मे जाऊ? लड़का : नही बिल्कुल नही। लड़की : क्या तुम मुझस read more >>
Join Us: