शाळा – माधव दादाराव मुळे

शाळा – माधव दादाराव मुळे

भरल कारे देवा
परत आमची शाळा
होईल का सगळेजण
परिपाठाला गोळा

लग्न झाले मुलींचे
काही मुल जॉब करतात
भेटावं वाटत सगळ्यांना
पण पैशापुढे हरतात

पूर्ण वर्ग उभा देवा
बघ एकदा राहील का
इंग्रजीच्या तासाला छड्या
समदे खाईल का

मुलीनं समोर जाऊन मुले
बाजू त्यांची मांडेल का
ती तुझी वहिनी म्हणून
एकमेकांशीच भांडेल का

जीवनभर आम्हाला कुठेपन मिरव
पाटीवर तुझ्या नशिब आमचं गिरव
पण फक्त एकदा देवा
शाळा आमची भरव

madhav muleमाधव दादाराव मुळे

3+
comments
  • Nice lines Mr.Madhav

    0

  • Leave a Reply

    Create Account    Log In Your Account