स्वप्न – माधव मुळे

स्वप्न – माधव मुळे

BMW कार असावी
त्यामध्ये तू बसावी
सतत तुझ्या चेहऱ्यावर
मला एक smile दिसावी

बोललोस जर रागाने काही
तर मंग तू रूसावी
परत माझ्या चेहऱ्याकडे
बघून तूच मंग मोकळी हसावी

तू माझ्या आई-वडिलांची
लेक बनूनी रहावं
रागावले जरी ते तर
तूच समजून घ्यावं

माझ्या हृदयाच्या महालाची
राणी तू बनावं
अन पुढं होऊन तूच मला
I Love U म्हणावं

बघ एकदा माझ्यासाठी
विचार तू करून
मंजूर असेल अटी तर
फक्त बघ माघ फिरून

Promise करतो तुला इथे
काही कमी पडणार नाही
या जन्मात काय तुला पुढच्या
सात जन्मात सोडणार नाही

आई-आणि पप्पा बघ
खूप आहे माझे शांत
तू समजून घेशील का
त्यांना हीच मनात आहे खंत

लेक बनून त्यांचा तू
सांभाळ ग करावा
छोटयाशा भांडणांमुळे
नको देजाऊ दुरावा

माधव मुळे

2+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account