Barde Jyoti 27 Apr 2023 कविताएँ अन्य 5292 0 Marathi :: मराठी
वेगवेगळी फिरतात भुंगे, फुलांवरती घालतात पिंगे, सायंकाळचे ऊन कोवळे किलबिल किलबिल करती रानपाखरे झुळझुळ वाहती झरे मासे त्यात पोहती बरे सायंकाळचे ऊन कोवळे भिरभिरनारी फुलपाखरे अंगावरती रंगविले जाळे ठिपके त्यात खुपच काळे सायंकाळचे ऊन कोवळे अंगणात माझ्या पांढरी शुभ्र फुले खेळतात राणी गोंडस मुले भुलवतात त्यांना सुर्य किरणें रंग त्यात पिवळा मिसळे सायंकाळचे ऊन कोवळे खुंट्याला बांधुनी गुरे ढोरे घरी परतली अवखळ पोरे सोरे, रवी आभाळातही ढळे सर्व दिशांना काळोख पसरे सायंकाळचे ऊन कोवळे