Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

एडस्- १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन

Samir Lande 22 Aug 2023 कहानियाँ समाजिक HIV एडस् , समीर लांडे, Samir Lande 20902 0 Marathi :: मराठी

1 एडस् (HIV)
Seen 1
 ब्रम्ह चारी मुलगा :-  (कटिंग करण्या साठी गेलेला असून पण कटिंग करत असलेला एक न्हाई जो एकच ब्लेड प्रतेकाला वापरत आहे)

Seen 2
नर्स  :- (फोन वरती बोलत चालत येती व ब्लड डोनेशन साठी आलेल्या व्यक्तींचे सँपल घेण्या साठी खुर्ची वर बसती व हाताने खुणवत)
चला लवकर

सर्व्हिस man :- (ब्लड डोनेशन साठी गेला आहे , पण नर्स फोन वरती बोलत असल्या कारणाने एकच सुई दोगा तिघांना use करते  )

Seen 3
ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर :- (रेड लाईट एरिया वरती जाण्याचं बोलत आहे)
ट्रक ड्रायव्हर :- खूप दिवस झाले, आपण बाहेर आहोत , काय म्हणतो आज बाजारावर थांबायचं का

क्लिनर :- बाजारावर थांबायचं, कशा साठी ?

ट्रक ड्रायव्हर :- ( भुवई उडवत मानेने खुंनवतो )

क्लिनर :- आ.... हा... , थांबू ना..

ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर :- ( रेड लाईट एरिया मधून तोंडाला रुमाल लावत बाहेर पडतात )

Seen 4
प्रेमी जोडपे :- (हॉटेल मध्ये बसलेले असून , वेटर एकाच coldring ग्लास मध्ये दोन tube टाकून आणतो)

मुलगी  :- एकाच ग्लास मध्ये

मुलगा  :- प्रेम वाढत ना 

मुलगी  :-(फुल देत)
 अच्छा , हे बग नेहमी तू आणतो ना , आज मी आणल तुझा साठी फुल

मुलगा , मुलगी :- ( फुल घेतांन्ही मुलाच्या हाताला काटा लागतो आणि मुलगी त्याच बोट तिच्या तोंडात पकडते )
____________________
Story

Seen 5 
सर्विस man :- ( रात्रीच्या वेळी घामागत होत विचार करत )
आस वाटतय उद्या hospital ला जाऊनच यावं.

सर्व्हिस man :- ( hospital च्या पायऱ्या दम काढत वरती चढत)

Seen 6
Hospital :- (काम वाली बाई सफाई करत आहे, व वार्ड बॉय खुर्ची वर बसलेला आहे) 

सर्व्हिस man :- (तिथं येऊन )
डॉक्टर आहेत का .

वार्ड बॉय :- हो आहेत ना , काही काम होत का ?

सर्व्हिस man :- नाही रिकामा होतो , मग म्हणटल जाऊन गप्पा मारू.

वार्ड बॉय :- काय काय 

सर्व्हिस man :- अरे आता hospital ला लोक कशा साठी येतात चेकप करण्या साठी च ना

वार्ड बॉय :- हो मग यांना , मी कुठे नाही म्हणतोय, जा आत आहेत डॉक्टर.

सर्व्हिस man :- सर

डॉक्टर :- सर नाही मॅडम, बसा ना, काय होतय

सर्व्हिस man :- मॅम काही हप्त्यान पासून बारीक बारीक ताप येतोय , 

डॉक्टर :- मानेला सूज पण दिसतीये  तुमच्या

सर्व्हिस man :- हो... आणि तोंडात  फोड पण झालेत बगाना, काही न करता शरिराला थकवा पण  होतोय

डॉक्टर :- काही खाल्ल असेल बाहेरच तुम्ही, माहिती नसलेलं फळं वैगेरे

सर्व्हिस man :- नाही आस तर काहीच खाल्ल नाही
आणि हे हात पण बघा

डॉक्टर :- बारीक पुरळ निघाली आहे, काही उधरल्या सारखं

सर्व्हिस man :- हो आणि घसा पण दुखतोय , कोरडा खोकला येतोय खूप

डॉक्टर :- ठीक आहे आत्ता मी काही गोळ्या देते, उद्या सकाळी पुन्हा या, ब्लड टेस्ट करून घेऊ आपण

सर्व्हिस man  :- ब्लड टेस्ट का

डॉक्टर :- तुम्ही जे सांगताय ते सर्व (HIV) ची लक्षणे दिसतात , आणि दुसरी काही ॲलर्जी असेल तर ती कळून जाईल.         oky चला

सर्व्हिस man :- (उठून निघून जातो)

Seen 7
 वार्ड बॉय आणि काम वाली बाई :- ( काम वाली बाई सफाई करत आहे, आणि  म्हणून वार्ड बॉय ला उठऊ राहिली , म्हणून वार्ड बॉय चिडलेला आहे)

ब्रह्म चारी :- (त्याची ब्लड टेस्ट ची फाईल घेऊन hospital ला येतो )

ब्रह्म चारी :- डॉक्टर 

वार्ड बॉय :- (ब्रह्म चारी चे शब्द कापत रागाने )
हो आत आहेत बग

डॉक्टर :- यना अमोल काय म्हणतो

ब्रह्म चारी :- ब्लड टेस्ट ची रिपोर्ट घेऊन आलो आहे माझ्या

डॉक्टर :- (फाईल घेत)
बघू काय आलय रिपोर्ट मध्ये,


रिपोर्ट मध्ये तर (HIV) बाधित दाखवलं आहे
एचआयव्ही म्हंजे काय माहित आहे ना

ब्रह्म चारी :-( घाबरत उभा राहून)
 हो मला माहीत आहे (HIV) म्हणजे काय पण मला कस काय होऊ शकतं ये... मी बाल ब्रह्म चारी आहे 

डॉक्टर :- ऐक ऐक सर्वात पहिले तू घाबरु नको खाली बस  पाणी घेतो का

ब्रह्म चारी :- (खाली बसत)
नाही पाणी नको

डॉक्टर :- हे बग (HIV) हा एकाच कारणाने नाही होत.
एचआयव्ही हा संक्रमित रक्त संक्रमणाने होऊ शकतो.

एचआयव्ही संक्रमित सुया आणि सिरिंजच्या वापराद्वारे प्रसारित केला जाऊ शकतो.

हा विषाणू प्रसूतीदरम्यान किंवा त्याआधी आणि स्तनपानादरम्यानही आईकडून बाळामध्ये पसरतो.

इतरांनी वापरलेल्या सुया शेअर केल्याने एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. एचआयव्ही प्रसारित करण्यासाठी थोड्या प्रमाणात रक्त पुरेसे आहे.

ब्रह्म चारी :- आत्ता मी काय केलं पाहिजे 

डॉक्टर :- तू सर्वात पहिले तर घाबरु नकोस, आणि
लक्षात घे की एचआयव्ही बाधित प्रत्येकाला एड्स होत नाही. मात्र, वेळीच उपचार, औषधोपचार आणि काळजी घेतल्याने ही संख्या बरीच कमी होत चालली आहे. परंतु एड्स ग्रस्त लोकांमध्ये, संसर्गामुळे मल्टीसिस्टम ऑर्गन फेल होतात बर...
म्हणून आजच फॉर्म भर आणि अडमित हो... काळजी करण्याची गरज नाहीये पण स्वतःची काळजी घ्या ठीक ये

ब्रह्म चारी :- (उठून जात) 
हो...

ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर  :- ( hospital मध्ये येतात)

ट्रक ड्रायव्हर :- डॉक्टर आहेत का 

वार्ड बॉय :- आहेत ना आत जा

Seen 8
 ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर :- (दोगे आत जात असताना , वार्ड बॉय क्लिनर ला थामबवतो )

वार्ड बॉय :- ये तू थांब रे , एकानेच आत जा

क्लिनर :- अरे पण मी उस्ताद सोबत आहे 

वार्ड बॉय :- ते काही नाही एका वेळी एकच जण जाणार

काम वाली बाई :- अरे जाऊदे त्याला पण 

क्लिनर :- उस्ताद , सांगा याला 

ट्रक ड्रायव्हर :- आहो एवद्या त्याला , डॉक्टर सांगा ना

डॉक्टर :- आदित्य येऊंदे त्याला पण 

वार्ड बॉय :- ( रागात ) चल

डॉक्टर :- काय थोड्या वेळ थांबता येत नाही का

क्लिनर  :- जिथं उस्ताद , तिथं मी

डॉक्टर :- बर.. बोला उस्ताद काय होतय


ट्रक ड्रायव्हर :- 4-5 महिने झालेत अशक्त पना वाढतोय
2-3 वेळा हॉस्पिटल ला पण जायचं झालय पण फरक काही जाणवत नाही 

क्लिनर :- हो आणि तबियत पण हालली आहे यांची , वजनात घट झाली आहे 
तापलेले असतात नेहमी डोक्याने पण आणि अंगाने पण

ट्रक ड्रायव्हर :- (रागाने क्लिनर कडे बगत)
तू शांत उभा राहशिल का


क्लिनर :- ( मान हलवत)
हो

ट्रक ड्रायव्हर :- एक महिन्यापासून सतत खोकला येतो ए.
आणि वारन वार त्वचेची खाज होतेय 
तोंडात आणि घशात सूज पण झालिये

क्लिनर :- हो आणि एक महिन्या पासून जेवणा नंतर सारखी गाडी थांबवावी लागती


डॉक्टर :- म्हणजे

क्लिनर :- (हाताने खुणवत)
म्हणजे 

डॉक्टर :- तुम्ही काम काय करता म्हणाले

क्लिनर :- आमच्या कामा विषय आजुन काही म्हणालोच नाही आम्ही

ट्रक ड्रायव्हर :- (क्लिनर कडे रागात पाहत)
मी ट्रक ड्रायव्हर आहे आणि हा माझा सोबत असतो


डॉक्टर :- हे बगा ही सर्व (HIV) ची लक्षणे आहेत
लाम पल्ल्याच्या ट्रक ड्रायव्हरांच्या काही चुकी मुळे 
ते एचआयव्ही ग्रस्त होतात

ट्रक ड्रायव्हर , क्लिनर :- (एकमेकांना बगत)

ट्रक ड्रायव्हर :- (HIV) म्हंजे

डॉक्टर :- (HIV) म्हंजे एडस्

क्लिनर :- एडस् म्हंजे 

डॉक्टर :- हे बघा एड्स हा एक अतिशय धोकादायक आजार आहे, ज्यावर आतापर्यंत कोणताही इलाज सापडलेला नाही. उपचाराशिवाय ते एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे कमकुवत करू शकते. हा रोग इम्युनो डेफिशियन्सीमुळे होतो. यामध्ये बहुतेक लोकांचे अवयव काम करणे बंद करतात आणि त्याला कोणत्याही आजाराचा अगदी लगेच संसर्ग होतो.

क्लिनर :- है इमिबदो देफिन्सी म्हंजे काय 

वार्ड बॉय :- (बाहेर जात काम वाली बाई ला लपून डॉक्टर आणि पेशन्ट च सव्वाद ऐकताना बागतो)

काम वाली बाई :- वार्ड बॉय ला पाहताच हातातील झाडू टाकून बाहेर चालत जाती)

वार्ड बॉय :- आहों ताई कुठे चालल्या 

काम वाली बाई :- ( एक ना दोन बस चालत राहते)

वार्ड बॉय :- ताई थांबा, ओ...  कुठे चालल्या, काही तर बोला ओ.. ताई , आओ काय झालं ओ ताई


डॉक्टर :- इमिबदो देफिंसी नाही इम्युनो डेफिशियन्सी

ट्रक ड्रायव्हर :- हो तेच त्याची जरा शब्दांची प्रॉब्लेम आहे

डॉक्टर :- या विषय सविस्तर माहिती तुम्हाला आदित्य देईल , आणि बाकी तुमचे दोगांचे पण ब्लड सँपल घेऊन टेस्ट साठी पाठून देऊ . 

क्लिनर :-  माझे का मी ड्राईव्हर नाहीये मी क्लिनर आहे 

डॉक्टर  :- सांगत , संगतीचा परिणाम होत असतो माणसावर तुम्हीच म्हणता ना जिथे उस्ताद तिथे मी
काही जास्त होण्या आगोदर तुम्ही पण करून घ्या

डॉक्टर :- (वार्ड बॉय ला आवाज देते )
आदित्य


वार्ड बॉय :- (रागात)
चायला इथ ताई ऐकत नाही , तिकडे पेशंट ऐकत नाही
आणि ह्या डॉक्टरचं तर वाईलीच

डॉक्टर :- आदित्य 

वार्ड बॉय :- हो  आलो

वार्ड बॉय :- (आत जाऊन)
काय मॅडम 

डॉक्टर :-  कुठे गेला होता 

वार्ड बॉय :- आहों त्या कामा वल्या मावशी पळून गेल्या

डॉक्टर :- का 

वार्ड बॉय :- मलाकाय माहित

डॉक्टर :- बर असुदे, तू ह्या दोगान्हा (इम्युनो डेफिशियन्सी) विषय सविस्तर माहिती दे आणि दोघांचे पण ब्लड सँपल लॅब ला पाठून दे 

वार्ड बॉय :- होय चला माझा सोबत

वार्ड बॉय, ट्रक ड्रायव्हर, क्लिनर :- (बाहेर जाऊन)

ट्रक ड्रायव्हर :- डॉक्टरने येवढं काही सांगितलं पण आजारी होण्याचं कारण च नाही सांगितलं

वार्ड बॉय :- वार्ड बॉय :- कधी कधी  लांबच्या प्रवासाला मोकळ होण्या साठी स्पेशल बाजारावर गाडी थांबवता ना, तेच कारण आहे ह्या आजाराच

क्लिनर :- आहों त्याचा आणि आजाराचा काय संबंध

वार्ड बॉय :- ऐका ह्या आजाराच्या विषाणूचा प्रसार होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे असुरक्षित योनिमार्ग किंवा गुदद्वारासंबंधीचा लैंगिक संबंध.
रक्त, शुक्राणू , आईचे दूध, गर्भाभोवती असलेले अम्नीओटिक द्रव आणि मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असलेले सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड यासारख्या द्रवपदार्थांमुळे एचआयव्ही संसर्ग पसरत असल्याचे दिसून आले आहे.

क्लिनर :- आणि डॉक्टर जे इमिनिमी म्हंटले ते काय

वार्ड बॉय :-(इम्युनो डेफिशियन्सी) म्हणजे एड्स, एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक्षमतेतील कमतरता


वार्ड बॉय, ट्रक ड्रायव्हर, क्लिनर :- (lab कडे जातात)

काम वाली बाई :- (रोडणे घरी जात असताना)

शेजारील दादा :- ताई काओ आज लवकर घरी चालल्या hospital बंद आहे काय आज तुमचं 
आणि येवढं तोंडाला रुमाल लावत का चाललाय 


काम वाली बाई :- आरे काय सांगू दादा आज दवाखान्यात एकाच आजाराची दोन तीन लोकं येऊन गेलेत

शेजारील दादा :- मग काय झालं 

काम वाली बाई :- मला तर वाटतंय काहीतरी नक्कीच मोठा रोग झाल असणार त्यानला

शेजारील दादा :- हो का 


काम वाली बाई :- हो ना आणि आपण तिथं रहायचं म्हंजे आपल्याला पण नको व्हायला

शेजारील दादा :- म्हणुन तुम्ही घरी चालल्यात का 

काम वाली बाई :-हो मग आपल्या जीवाची काळजी घ्यायची का नाही आपण

शेजारील दादा :- मग काय तर काम काय आज आहे तर उद्या नाही , रोगाचं नाव काय आहे पण 


काम वाली बाई :- काय माहित बाबा (एचआयव्ही, एचआयव्ही) mhnat होते

हुशार मुलगा :- दादा अय दादा 

शेजारील दादा :-  ( रागात )
काय रे 

हुशार मुलगा :- एचआयव्ही म्हणजे काय 

काम वाली बाई :-आता आम्हाला काय माहित रे भाऊ आम्ही आडानी लोक तू शाळेत जातो तुला नाय माहीत का

हुशार मुलगा :- नाय माहीत माला

शेजारील दादा :- मग शाळेत कशाला जातो तू तुला येवढं माहीत नाही

हुशार मुलगा :- आम्हाला काय ते शिकवतात

काम वाली बाई :- जाऊदे आज गेला का त्या मस्तरिन बाई ला विचार 

शेजारील दादा :- आलो याला सोडून मी चला तुम्ही तोवर

काम वाली बाई :- हा... हा...

शेजारील दादा आणि हुशार मुलगा :- ( तेथून जातात)

हुशार मुलगा :- (शाळेत तोंडावर प्रश्न चिन्ह घेऊन बसला आहे)

शिक्षक   :- ( वर्गात येतात )
ये शांत बसा चला पुस्तक काढा तिसरा पाठ चालू होता आपला , आणि गृह पाठ केला का सर्वांनी 
नाही ना अरे ठोमण्यानो 11 वी ला आले आता तरी स्टडी कडे लक्ष द्या

हुशार मुलगा :- (वरती हात करत)
टीचर एक प्रश्न होता

शिक्षक   :- हा विचारणा 

हुशार मुलगा :- एचआयव्ही म्हंजे काय आसतय

शिक्षक   :- एचआयव्ही हा एक गुप्त रोग आहे

हुशार मुलगा :- गुप्त रोग 

शिक्षक   :- हा गुप्त रोग , १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन  साजरा केला जातो , त्या दिवशी आपल्या कॉलेज मध्ये काही डॉक्टर येतील तुम्हाला (HIV) विषय माहिती देण्या साठी ठीके...

शिक्षक :-  (फळा पुसत)
चला पुस्तक काढा..

शिक्षक , विद्यार्थी, डॉक्टर :- (काही दिवसांनी)


 शिक्षक :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World Aids Day ) साजरा केला जातो. म्हणून आज आपल्याला (एचआयव्ही) म्हणजेच एडस्  ह्या विषयावर मार्ग दर्शन करण्या साठी इथे आलेले आहेत डॉक्टर पूजा ताई आणि त्यांचे काही सहकारी
 तर जास्त वेळ न घालवता स्टेज पूजा पुजा ताइंकडे सोपवते

डॉक्टर :- (स्टेज वरती येऊन)
Good morning friends, 
एचआयव्ही एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World Aids Day ) साजरा केला जातो. एड्स हा एक अतिशय धोकादायक आजार आहे, ज्यावर आतापर्यंत कोणताही इलाज सापडलेला नाही. उपचाराशिवाय ते एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे कमकुवत करू शकते. हा रोग इम्युनो डेफिशियन्सीमुळे होतो.(इम्युनो डेफिशियन्सी) म्हणजे एड्स, एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक्षमतेतील कमतरता, यामध्ये बहुतेक लोकांचे अवयव काम करणे बंद करतात आणि त्याला कोणत्याही आजाराचा अगदी लगेच संसर्ग होतो. कृपया लक्षात घ्या की एचआयव्ही बाधित प्रत्येका एड्स होत नाही. मात्र, वेळीच उपचार, औषधोपचार आणि काळजी घेतल्याने ही संख्या बरीच कमी होत चालली आहे. परंतु एड्स ग्रस्त लोकांमध्ये, संसर्गामुळे मल्टीसिस्टम ऑर्गन फेल होतात.

याची काही लक्षणे आहेत
ताप, अत्यंत सर्धी, अतिरिक्त थकवा, घसा खवखणे , स्नायू वेदना, रात्र पळ वाट ,उतावळा, सुजलेल्या लिम्फ नोड्स, तोंडात फोड येणे

आणि कोणाला आस काही वाटल तर नक्कीच शेजारील सरकारी हॉस्पिटल मध्ये जाऊन आपली तपासणी करा

धन्यवाद..

Script writer :- समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

लड़का: शुक्र है भगवान का इस दिन का तो मे कब से इंतजार कर रहा था। लड़की : तो अब मे जाऊ? लड़का : नही बिल्कुल नही। लड़की : क्या तुम मुझस read more >>
Join Us: