ते शक्य नाही – माधव मुळे

ते शक्य नाही – माधव मुळे

तू मिळावी म्हणून माझ्यात
बदल नाही होणार
पहिल्यापासून असाच
मी असाच ग राहणार

वाईटांसोबत संगत माझी
पण कधी नजरेत नाही येणार
पहिल्यापासून असाच
मी असाच ग राहणार

माय बाप सोडून सांग
तुला कोण भिणार
पहिल्यापासून असाच
मी असाच गं राहणार

सुखात तू पण दुःखात
मला मित्र कामी येणार
पहिल्यापासून असाच
मी असाच गं राहणार

जोवर पैसा माझ्याजवळ
तू तोवर साथ देणार
माझ्यापेक्षा मिळाला चांगळातर
लगेच सोडून जाणार

पहिल्यापासून असाच
मी असाच गं राहणार
तू मिळावी म्हणून माझ्यात
बदल नाही होणार

Madhav muleमाधव मुळे

2+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account