तिचं आयुष्य – विशाल परशुराम मुळे

तिचं आयुष्य – विशाल परशुराम मुळे

वाटते तिला कधीतरी
समजावेंन मी बाबाला,
बाबा नसतात समजूतदार
आयुष्य मानतात पैशाला ॥

नसतं कुणी तयार
तिच्या इच्छा विचारायला,
अश्रू येतात डोळ्यांतून
नसतं कुणी पुसायला ॥

शिकण्याची तीव्र इच्छा
उरी ती दाटून धरते,
आवडीच्या त्या पुस्तकांना
उराशी कवटाळते ॥

एका क्षणात ती
जिवंत असुनी मरते,
फांद्या फुटलेल्या स्वप्नांना
बेचिराख करते ॥

नावडत्या व्यक्तीसोबत तिला
आयुष्य जगायचे नसते,
आई-बाबांसमोर मात्र ती
अश्रू तिचे लपविते ॥

एका क्षणात ती
सारं काही गमावते,
भावना तिच्या मनातल्या
पायाखाली तुडविते ॥

आई-बाबांच्या इच्छेवर ती
सुखाचा तिरस्कार करते,
आयुष्यभर अश्रू लपवत
दुःखाला ती स्वीकारते ॥

कळत का नाही कुणाला
तिलाही इच्छा असते,
मुलगी आहे तरी
तिलाही मन असते ॥

हुंदके तिचे बघून
ठेच लागली मनाला,
म्हणून तिच्या आयुष्याचा
अभ्यास मी केला ॥

vishal muleविशाल परशुराम मुळे

Ravi Kumar

मैं रवि कुमार गुरुग्राम हरियाणा का निवासी हूँ | मैं श्रंगार रस का कवि हूँ | मैं साहित्य लाइव में संपादक के रूप में कार्य कर रहा हूँ |

Visit My Website
View All Articles

I agree to Privacy Policy of Sahity Live & Request to add my profile on Sahity Live.

0
comments
 • Heart touching bhai….

  0

 • Thanks my All Dear…!👆👆

  0

 • Thanks Dear

  0

 • Thank you Lovely

  0

 • Thanks Dear

  0

 • Leave a Reply

  Create Account  Log In Your Account