विसरतोय तुला – माधव दादाराव मुळे

विसरतोय तुला – माधव दादाराव मुळे

तू दिलाय दगा तरी
जगेल मी त्यांच्यासाठी
रात्रनं दिस राबलेत ते
फक्त ग माझ्यासाठी

तुझ माझ नात ग
आत्ताच गुंतलं
आई बाबांनी तर
मला जन्माला घातलं

मी त्यांचे उपकार
कसे ग विसरू
मोकळे जरी सोडले आपण
तरी गाई पासून दूर जातेका वासरू

मुक्या जीवाला कळते मंग
मला का नाही
जगात सर्व श्रेष्ठ असते
बाबा आणि आई

मुलींची तर मांगे
रांग माझ्या लागेल
जेव्हा मी आई
बाबासाठी जगेल

विसरतोय तुला तुझ्यात
विशेष अस काय गं
माझ्यासाठी सर्व काही
बाबा आणि माय गं

Mahadu muleमाधव दादाराव मुळे

4+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account