चेहऱ्यातील साम्य – माधव मुळे

चेहऱ्यातील साम्य – माधव मुळे

सचिन नुकताच गावाकडून शहराकडे आला होता. गावाकडे दोन भाऊ व तिसरा सचिन, शेती थोडी असल्या कारणाने सचिनला कामासाठी शहरात यावं लागलं होत.सचिन काम बघत फिरत होता तेव्हा अचानक त्याला एके ठिकाणी मिस्तरिच्या हाताखाली हातमजूर पाहिजे अस बोलताना एक व्यक्ती दिसली सचिन त्या व्यक्तीकडे गेला व मला कामाची गरज आहे.मी खूप दुरून आलोय माझ्या पोटासाठी मला तुम्ही काम दया काम कुठलेही चालेल ते मी इमानदारीने करीन असे म्हणत सचिन त्या व्यक्ती समोर हात जोडू लागला.त्या व्यक्तीला सचिनचा भोळा चेहरा व डोळ्यांमधील घाबरटपणा आणि बोलण्याचं तथ्य आवडलं.त्याव्यक्तीने सचिनला रहाण्यासाठी भाड्याने खोली बघून दिली व उदया सकाळी या पत्यावर जा म्हणून सांगितलं सचिन खूप खुश होता.त्याला काम मिळाल्याचा भरपूर आनंद झाला होता सूर्य मावळला होता चोहीकडे अंधार झाला होता तेव्हा सचिनने सोबत आणलेल्या थैली मधून आपले सामान काढले व खोलीमधे व्यवस्थित रित्या लावले
आईने बांधून दिलेला डब्बा सचिनने काढला व त्यातील बाजरीची भाकरी व चटनी खाऊन सकाळी कामावर वेळेवर जायचे म्हणून लवकर झोपी गेला.दिवसभर काम बघत फिरल्यामुळे त्याला सकाळी लवकर जाग आली नाही.गप्प दिशी अचानक त्याने डोळे उघडले व घड्याळाकडे बघितले तर 7:00 वाजले होते .झटकन उठून त्याने अंघोळ केली व कामाला जाण्यासाठी निघाला त्याला घरची आठवण झाली.घरी असतो तर चहा पित असतो आता मात्र जवळ पैसे पण नाहीत सोबत आणलेले होते ते खोलीभाडे व मेस लावण्यात गेले,तो कामाच्या ठिकाणी पोहचला व तिथे मिस्तरीला भेटला कामाला सुरुवात झाली दिवसेंदिवस निघून जाऊ लागले त्याला त्याचा पगार खाण्यापिण्यात जात होता शिल्लक अस मांगे काहीच उरत नव्हतं तो हाताने स्वयंपाक बनवायला लागला त्यामुळे भाजीपाला आनायला तो भाजी मंडी मधे जाऊ लागला परिस्थितीने गरीब व पैसा शिल्लक नसल्यामुळे तो भाजीपाला घेते वेळी खूप किट किट करायचा तेथे एक कॉलेजची मुलगी त्याच्या शेजारीच खोली करून रहात होती.
त्याचा चिकट असा व्यवहार तिच्या लक्षात येत होता एकदा तो शर्ट घेण्यासाठी दुकानात गेला असता शर्ट घेताना सुध्दा तो तसच करत होता 500रुपयांचा शर्ट तो 300ला माघत होता दुकानदार नाही म्हणायचा तरी तो सारख तसच करत,दुकानदाराने त्याला हाकलून दिले हे त्या मुलीने बघितले व तो शर्ट विकत घेऊन दुकानाबाहेर आली आणि त्याला आवाज देत ती म्हणाली वोय कंजूष हा घे शर्ट त्याला काहीच कळत नव्हतं तो शर्ट बघून खुशपन होता व शेजारी राहणारी मुलगी बघून आश्चर्य चकित सुद्धा त्यावेळी त्या दोघांची चांगली ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं त्या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं हे शिवाणीच्या घरी माहित झालं तर घरच्यांनी तिच्याशी नात तोडून टाकलं दोघे थाटामाटात रहात होते आता शिवानीला अगदी हुबेहूब सचिन सारखी दिसणारी मुलगी झाली तेव्हा थोडयाच दिवसात शिवाणीची सवत तिथे आली शिवानीला तेव्हा कळलं कि सचिनचं अगोदर लग्न झालेलं असून त्याला एक मूलगापन आहे पण आता शिवानी काहीच करू शकत नव्हती आई वडिलांकडे कुठल्या तोंडाने जावं त्यापेक्षा जीवन सपूण घेऊ परत तिच्या मनात यायचं मी अस केलं तर या चिमुकलीच कस होईल मला या चिमुकली साठी जगावं लागेल तीच व सवतीच बनत नसल्याने सचिनने पहिली बायको आशा हिला गावाकडे पाठून दिले हळूहळू पाच वर्षाचा कालावधी लोटला सचिनला कॅन्सर या आजाराने घेरलं व त्याचा मृत्यू झाला ती आत्तापर्यंत कधी गावाकडे न आल्याकारणाने तिला गाव माहित नव्हते सचिनची बॉडी गावाकडे न्यावी लागणार मंग सचिनच्या मोबाईल मधून देराचा नंबर शोधून ठेपा काढत तिने त्याला गावाकडे नेलं सोबत तिची पाच वर्षाची मुलगी जी सचिन सारखी दिसायची पूर्ण गाव सचिनची मौत सोडून त्या मुलीकडेच बघत होते तिला तिचे नाव विचारत होते तिने नाव सांगितले सीमा सचिन डुकरे
हे एकूण पूर्ण गावात हळहळ माजली सचिनचे दुसरे लग्न झालेले होते अशी गावात चरच्या सुरु झाली तिच्या सासू सासऱ्यांनी तिला तेर्वी होईपर्यंत तिला गावात राहू दिले नंतर तिला गावातून हाकलून दिले त्यामुळे ती परत शहरात आली पोटासाठी काहीतरी काम बघू म्हणून एका ठिकाणी काम बघायला गेली कारण आता कमावून आणायला सचिनपण जिवंत नव्हता त्याच्यामुळे मुलीची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली ती जिथे काम बघायला जायची तेथे तिच्या कपाळावर टिकली नसल्या मुळे तिच्याकडे सगळेच वाईट नजरेनं बघायचे काम देतो पण तुला रात्री वेळ दयावा लागेल हीच भाषा लोक वापरत तिच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता ती दिवसभर काम करायची व रात्री तिचा मालक रात्रभर तीच्या शरीराचे लचके तोडत असे आता तिची मुलगी मोठी झाली होती मालकाला आता तिची भूक लागली होती तो एक दिवस सीमा ला छेड छाड करू लागला हे शिवानीने ते बघितले तिला ते सहन झाले नाही तिने किचन मधील मुसळी त्याच्या डोक्यात घातली डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागले मालक मेला तो जोराने ओरडल्याने शेजारी गोळा झालते त्यांनी पोलिसांना कळविले शिवानीला पकडून नेण्यात आले सीमा आई असून अनाथ झाली .ति सुद्धा पोटापाण्यासाठी काम बघू लागली…………….

Madhav muleमाधव मुळे

2+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account