Notification

अपने लेख प्रकाशित करने के लिए यहाँ क्लिक करें!

प्राध्यापिका वर्षा आहिरे यांच्या हया स्वभावातुनाला गोष्ट नकीच शिकायतयला मिलली की आपल्याला जे नाही -विकास-सोनवणे

     प्रा.वर्षा आहिरे हया माझ्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातील भाषाविज्ञान हया विषयाच्या प्राध्यापिका होत्या.तसे पाहायला गेले तर प्राध्यापिका वर्षा आहिरे शेवाळे हया ग्रामीण भागात लहानाच्या मोठया झालेल्या.त्यामुळे त्यांचा आवडीचा विषय हा ग्रामीण साहित्य हा होता.कारण त्यांना ग्रामीण जीवणाचा अनुभव होता.म्हणुन त्यांची मनापासुन इच्छा होती की त्यांनी आम्हाला ग्रामीण साहित्य हा विषय शिकवावा.पण ग्रामीण साहित्य हा विषय प्राध्यापक केशव गावित यांच्याकडे दिला गेल्यामुळे त्या मला भाषाविज्ञान हा विषय शिकवायच्या.मला हा शब्द मी हयासाठी वापरला आहे कारण तेव्हा वर्गात मी एकटाच असायचो त्या मला एकटयालाच शिकवायच्या.पण प्राध्यापिका वर्षा आहिरे यांनी अजिबात कोणतीच तक्रार केली नाही की माझा आवडता विषय ग्रामीण साहित्य आहे अणि मला तोच हवा.उलट त्या म्हणायच्या कोणताही विषय हा शिकवायचाच आहे मग ग्रामीण साहित्य शिकवला काय किंवा भाषाविज्ञान शिकवला काय.सारखेच आहे.

प्राध्यापिका वर्षा आहिरे यांच्या हया स्वभावातुन मला गोष्ट नक्कीच शिकायला मिळाली की आपल्याला जे नाही मिळाले त्याचे दुख व्यक्त करत बसण्यापेक्षा जे काही मिळाले आहे त्यातच धन्यता मानावी,आनंदी राहावे,समाधान मानावे.अणि त्यातच झोकुन देऊन कष्ट घ्यावे.
अणि ज्या दिवसापासुन प्राध्यापिका वर्षा आहिरे यांनी मला शिकवायला सुरुवात केली.त्यादिवसापासुनच प्राध्यापिका वर्षा आहिरे यांनी ग्रंथालयातुन संदर्भ ग्रंथ मिळवुन वाचण सुरू केले.जेणेकरुन त्यांना मला नीट व्यवस्थित शिकवता यावे.अणि त्यांच्याकडुन मला जास्तीत ज्ञान प्राप्त व्हावे.यासाठी प्राध्यापिका वर्षा आहिरे यांनी पहिल्या दिवसापासुनच निरनिराळे संदर्भ ग्रंथ वाचणे सुरू करुन दिले.
असा स्वभाव आहे माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे यांचा एकदम कर्तव्यदक्ष,समजुतदार अणि शांत स्वभावाच्या,पण तितक्याच शिस्तप्रिय सुदधा.अणि मायाळुही.अणि जे नाही मिळाले त्याचे त्याचे दुख व्यक्त करत बसण्यापेक्षा जे काही मिळाले आहे त्यातच आनंद अणि समाधान मानणारया एकदम मोठया मनाच्या.
अणि प्राध्यापिका वर्षा आहिरे यांचे मुळ गाव हे कुकाणे आहे.जेथे माझी दाजी सावता मोरे अणि नाना मोरे हे वास्तव्यास आहेत.जे कुकाणे येथील फार प्रसिदध व्यक्ती आहेत.तसेच कुकाणे येथील लोंढे परिवार हे सुदधा माझे जवळचे नातलगच आहे.माझे संग्मेश्वरातील नातलग तिसगे यांच्याकडुन आमचे नाते लागते.
असो मी माझ्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळतो.प्राध्यापिका वर्षा आहिरे हया सध्या ओझर येथील रहिवासी आहे.त्या ओझर येथे आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्यास आहेत.त्यामुळे त्या मालेगाव येथे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात रोज बस ने ये-जा करतात.
अणि एक गोष्ट प्राध्यापिका वर्षा आहिरे यांची मला खुप आवडते ती म्हणजे अशी की त्या नेहमी स्वतावर संयम बाळगुन राहतात त्या कधीच आपल्या समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल किंवा त्याचे मन दुखावेल असे कधीच बोलत नाहीत.प्राध्यापिका वर्षा आहिरे हया स्वभावाने खुप सहिष्णु सुदधा आहेत.त्या कधीच कोणाला वाईट वाटेल त्याचे मन दुखावेल अशा वागत नाहीत.किंवा बोलतही नाहीत.त्यांचा स्वतावर खुपच संयम आहे.त्यांचा स्वतावर इतका संयम आहे की त्यांचा संयमीपणा पाहुन मला कधीकधी असे वाटते की मागच्या जन्मी माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे हया एखादया संतच असतील.इतक्या त्या सहनशील स्वभावाच्या आहेत.
मी तुम्हाला माझेच उदाहरण घेऊन सांगतो की एकदा माझी वर्गात एका विदयार्थ्याशी खुप बाचाबाची झाली अणि मी त्याला प्राध्यापिका वर्षा आहिरे यांच्यासमोर खुप काही उदधटपणे बोललो पण प्राध्यापिका वर्षा आहिरे मला शब्दानेही काही बोलल्या नाही.किंवा मला रागावल्या नाही.एवढेच काय तर वर्गात काही मतभेद झाले तर रागारागातच प्राध्यापिका वर्षा आहिरे यांना मी संदेश पाठवायचो पण त्या कधीच मला रागावल्या नाही.उलट वर्गात कोणी विदयार्थी चुकुनही बेशिस्तपणे वागला किंवा त्यांच्याशी उदधटपणे वागला,बोलला तर त्या त्याला तिथेच खडसावुनही टाकायच्या.पण आत्तापर्यत मी कित्येकदा त्यांचे मन दुखावेल असे वागलो,वर्तन केले पण त्यांनी मला कधी शब्दानेही दुखावले नाही.इतक्या मायाळू आहे माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे.ज्यांनी नेहमी मला एकदम आपल्या मुलाप्रमाणेच समजुन घेतले.एक आई जशी आपल्या मुलाच्या सर्व चुकांकडे दुर्लक्ष करते व त्या ती पोटात घेते एकदम त्याचप्रमाणे त्यांनी माझ्या केलेल्या सर्व चुका,मुर्खपणाकडे दुर्लक्ष केले माझ्या सर्व चुका आपल्या पोटात घेतल्या.पण मला त्यांनी कधीच शब्दानेही दुखावले नाही.
अणि एकदा वर्गातील काही विदयार्थ्यांशी माझे वाद झाल्यावर मी सगळया विदयार्थ्यांपासुन वर्गात अलिप्त राहणे चालू केले होते.माझा माझा एकटा मागच्या बाकावर जाऊन बसायचो.कोणाशी बोलायचोही नाही.किंवा कोणत्याही उपक्रमात इतर विदयार्थ्यांसोबत सहभागी पण व्हायचो नाही.माझा माझा एकटाच वर्गात शांत बसुन राहायचो.किंवा काहीतरी लिहित बसायचो तेव्हा प्राध्यापिका वर्षा आहिरे मला आईच्या मायेने विचारपुस करायच्या की योगेश तु एवढा शांत शांत का राहतो आहेस?कोणासोबत बोलत पण नाही आधीसारखा?सगळया विदयार्थ्यांपासुन वर्गात अलिप्त राहणे चालू केले आहे तु सध्या.तसेच तु कोणत्याही उपक्रमात इतर विदयार्थ्यांसोबत सहभागी पण होत नाही आहे?काय झाले?अशा त्या माझी एकदम मायेने विचारपुस करायच्या.म्हणजे मी न काही बोलता त्या माझे मौनसुदधा वाचुन घ्यायच्या इतका त्यांनी माझ्या स्वभावाचा अभ्यास केला होता.म्हणजे आपला विदयार्थी काही न बोलताही त्या त्याच्या मनातले सर्व काही वाचुन घ्यायच्या इतकी त्यांची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण होती.याच्यावरुन कळुन येते की माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे किती कर्तव्यदक्ष अणि जागरुक शिक्षिका आहेत.
अणि हे मला एका अजुन एका प्रसंगावरुन लक्षात आले की प्राध्यापिका वर्षा आहिरे हया किती जागरूक अणि कर्तव्यदक्ष आहेत.झाले असे की प्राध्यापिका वर्षा आहिरे यांना एकदा महाविदयालयात येण्यासाठी उशीर झाला कारण त्यादिवशी त्यांना वेळेवर बसच मिळाली नाही.त्या खुप वेळ तात्काळत बसल्या पण त्यांना बसच मिळाली नाही.अणि त्यांची महाविदयालयात साडे सात वाजता तासिका होती.मग त्यांनी विदयार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच त्यांचा वेळ वाया नये म्हणुन पहिली तासिका विनोद गोरवाडकर यांनी घ्यावी असा महाविदयालयात फोन लावुन दिला.अणि त्या कशाही करुन दुसरया तासिकेच्या वेळेपर्यत महाविदयालयात पोहचल्या अणि मग आम्हाला त्यांनी शिकवले.पण त्यांनी आमचा तास अणि वेळ अजिबात वाया जाऊ दिला नाही इतक्या आपल्या कर्तव्याशी,कामाशी प्रामाणिक आहेत माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे.एक अत्यंत प्रामाणिक अणि कर्तव्यदक्ष शिक्षिका.
अणि प्राध्यापिका वर्षा आहिरे यांना त्यादिवशी उशीर हयामुळे झाला होता की त्या ते रोज बसने महाविदयालयात यायच्या.पण त्यादिवशी त्यांना कोणतीच बस मिळाली नाही.अणि प्रायव्हेट गाडीने त्या कधीच महाविदयालयात येत नव्हत्या.कारण जगदुनिया आता खुपच खराब होत चालली आहे.एकटी स्त्री दिसली की तिची छेड काढणे,तिला त्रास देणे,तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार होतात अणि हे नेहमी आपल्याला वर्तमानपत्रात,टिव्हीवर बातम्यांमध्ये पाहायला मिळते.त्यामुळे हया बाबतीत प्राध्यापिका वर्षा आहिरे हया फार जागरूक होत्या.म्हणुन त्या प्रायव्हेट गाडीने कधीच ये-जा करायच्या नाही.भलेही मग थोडा उशीर झाला तरी चालेल.पण त्या कधीच प्रायव्हेट गाडीने महाविदयालयात यायच्या नाही.आपल्या तत्वांशी त्या अत्यंत ठाम होत्या.
यावरुन दिसुन येते की प्राध्यापिका वर्षा आहिरे हया किती जागरुक स्त्री आहेत.अणि हीच जागरुकता,सतर्कता सर्व स्त्रियांनी,मुलींनी जर आज दाखवली तर कधीच कोणा स्त्रीवर,मुलीवर विनयभंगाचे,बलात्काराचे प्रसंग ओढावणार नाही.
प्राध्यापिका वर्षा आहिरे यांच्या स्वभावाचे अजुन एक वैशिष्टय असे आहे की त्या समोरच्या व्यक्तीवर रागावुन किंवा बोलुन त्याला अजिबात दुखावती नाही पण त्याला योग्य ती अददल पण त्या घडवतातच.अणि तीच अददल त्यांनी मला पण घडवली जेव्हा मी वर्गात सगळयांशी खुपच उदधटपणे,उर्मट वागायला लागलो होतो.अणि त्यामुळे त्यांचे मन माझ्याबाबतीत खुप दुखावले,नाराज झाले होते तेव्हा त्यांनी माझ्याशी अबोला धरला होता.मी त्यांना व्हाँटस अँपवर पाठविलेले संदेश वाचुनही मला त्या कोणताच प्रतिसाद दयायच्या नाही.माझ्या वाचलेल्या संदेशांकडे त्या दुर्लक्ष करायच्या.
त्यांच्या मौनात पण खुप काही अर्थ दडलेले होते.जे मला समजुन येत होते.त्यांची माझ्याविषयीची नाराजी त्यांच्या मौनातुन मला अनुभवायला मिळत होती.त्यांच्या मौनातच त्याचे सारे अर्थ दडले होते.अणि त्याचाच मला खुप त्रासही होत होता.नेहमी योगेश योगेश करणारया माझ्या प्राध्यापिका
वर्षा आहिरे ज्यांचा मी वर्गात सगळयात लाडका विदयार्थी आहे.त्याच आज माझ्याशी दोन शब्द बोलायला तयार नव्हत्या.याचेच खुप वाईट वाटत होते माझ्या मनाला.
अणि माझा स्वभाव असा आहे मी माझ्या आयुष्यात सहजासहजी कोणालाच जागा देत नाही.माझे मित्रही मोजकेच बोटावर मोजण्याइतकेच मी ठेवतो.जे मला फक्त ओळखत नाही तर ते मला समजूनही घेतात.माझ्या आयुष्यात तीनच लोकांना मी महत्वाचे स्थान देतो एक म्हणजे माझे कुटुंबिय.दुसरे आहे माझे चार जिवलग मिञ अणि तिसरे माझे मराठी विभागाचे,म.स.गा महाविदयालयातील सर्व आदरणीय प्राध्यापक वर्ग कारण आज मी ज्या ज्ञानाच्या बळावर लेखन करतो आहे ती त्यांचीच देणगी आहे.म्हणुन मी माझ्या सर्व प्राध्यापकांचा मनापासुन आदर करतो अणि त्यांना मी माझ्या आयुष्याचाच एक महत्वाचा घटक मानतो.
अणि त्यातच प्राध्यापिका वर्षा आहिरे हया माझ्याशी अबोला धरुन बसल्या होत्या याचे मला खुप वाईट वाटत होते.दुसरे कोणी असते तर मला एवढा फरक पडलाही नसता अणि नाहीतरी मला सुरुवातीपासुनच एकटे राहायला खुप आवडते म्हणुन मी जास्त कोणात जात नाही किंवा कोणात जास्त मिसळत पण नाही.एकांतात बसुन लिहिणे किंवा काहीतरी वाचणे हाच माझ्या आयुष्याचा रोजचा दिनक्रम असतो.म्हणुन मला माझ्याजवळ कोणाच्या असल्याने नसल्याने काहीच फरक पडत नाही.कारण मला सुरूवातीपासुनच माझा एकटेपणा खुप आवडतो.अणि माझ्या हयाच एकटेपणावर माझे खुप प्रेम आहे.जो कोणी माझ्यापासुन हिरावुन घेतलेले मला आवडत नाही म्हणुन मी गर्दीच्या ठिकाणी जास्त थांबत पण नाही.अणि गर्दीपासुन मी चार फुट लांबच असतो.
पण दुसरे कोणी माझ्यावर रुसुन बसले असते तर मला काही फरकही पडला नसता पण माझ्या प्राध्यापिका(माझ्यागुरू)माझ्यावर नाराज आहेत त्या रुसुन बसल्या आहे याचेच मला खुप मनापासुन वाईट वाटत होते.अणि त्यांची नाराजी दुर करणे हे मी माझे परमकर्तव्य समजतो.म्हणुन मी माझे प्रयत्न सोडले नाही मी नेहमी अधुनमधुन त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतच होतो.अणि प्राध्यापिका वर्षा आहिरे यांना माझा इतका राग आला होता की त्यांनी माझा मोबाईल नंबर सुदधा त्यांच्या मोबाईलमधुन डिलीट करुन टाकला होता.अणि प्राध्यापिका वर्षा आहिरे यांनी माझा नंबर डिलीट केला आहे हे मला लगेच कळून पण गेले कारण मला मोबाईल,कंप्युटर साँपटवेअर,हँकिंग तसेच क्रँकिंगचे बरे ज्ञान असल्यामुळे हयागोष्टी मला चटकन कळून येतात की कोणी मला ब्लाँक केले किंवा कोणी माझा नंबर ब्लँक लिस्टला टाकला किंवा डिलीट केला आहे.कारण म.स.गा महाविदयालयात शिकण्यासाठी येण्याअगोदर हयाआधी मी डिप्लोमाला इन कंप्युटर टेक्नाँलाँजी मध्ये शिकत होतो.अणि तिथे माझा कंप्युटर सिक्युरीटी हा सगळयात आवडता विषय होता.ज्यात आम्हाला हँकिंग तसेच क्रँकिंग अशा सर्व सिक्युरीटी रिलेटेड कला त्या विषयात अभ्यासण्यासाठी होत्या.त्यामुळे त्याच्यातले बरयापैकी ज्ञान मला होते.
त्यामुळे मला हयागोष्टी लगेच कळुन जातात की कोणी मला ब्लाँक केले आहे,माझा नंबर डिलीट केला आहे किंवा माझा नंबर ब्लँक लिस्टला टाकला आहे इत्यादी.
पण यात प्राध्यापिका वर्षा आहिरे यांची पण काहीच चुक नव्हती.कारण ते दिवस असे होते की मी काय करु राहिलो याचे मलाच भान नव्हते.मी त्या दिवसांमध्ये माझ्या मनातील माझा सर्व राग माझ्या स्टेटसवर काढायचो.अणि त्याचीच नाराजी म्हणुन प्राध्यापिका वर्षा आहिरे यांनी माझा नंबर डिलीटच करुन टाकला.अणि ते दिवस असे होते की माझे मलाच कळत नव्हते मी काय करतो माझे मन खुप अशांत होते.त्यामुळे मी स्टेटसला वैयक्तिक भांडणाच्या रागारागात काहीही अँटिटयुड स्टेटस टाकायचो.अणि तेच स्टेटस माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे हया पाहुन घ्यायच्या अणि त्यांना माझा तोच राग आला की माझा सगळयात लाडका,गुणी,प्रामाणिक,शांत स्वभावाचा विदयार्थी असे रागीट तसेच अँटिटयुड स्टेटस का टाकतो आहे अणि त्याचीच नाराजी म्हणुन त्यांनी माझा नंबरच डिलीट करुन टाकला.अणि हे मला नंतरुन लक्षात आले माझे मन शांत झाल्यावर की अजाणपणे का होईना पण मी माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे यांना दुखावले आहे.
मग मला एकेदिवशी माझी चुक लक्षात आली की मी माझ्या वर्गातील चालत असलेल्या वैयक्तिक रागात,भांडणात
नकळत माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे यांचेच मन दुखावले आहे.मग मी एकेदिवशी वर्गात हयाआधी मी जे सगळयांशी उर्मटपणे वागलो त्याबददल मनापासुन प्राध्यापिका वर्षा आहिरे यांची माफी मागितली.अणि त्यात प्राध्यापिका सपणा सोनवणे यांनी मध्यस्थी केली म्हणुन प्राध्यापिका वर्षा आहिरे आता माझ्याशी अजुन पहिलेसारख्या चँटिंग नाही करती पण आता कमीत कमी इमोजी पाठवुन माझ्या पाठवलेल्या संदेशावर प्रतिसाद तरी देऊ राहिल्या.अशा आहे माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे वर्गात जेवढा मी त्यांचा लाडका विदयार्थी होतो तेवढीच कठोर अददल पण त्यांनी मला घडवली.ते ही मला शब्दानेही न दुखवता.त्यांनी मला माझ्या चुकीचीही जाणीव करुन दिली अणि वर्गात जे मी चुकुन वागलो त्याबददल त्यांनी मला चांगली अददल पण घडवली.
जी मी कधीच विसरु शकत नाही.
अणि अशी अददल एक आईच आपल्या मुलाला घडवु शकते ज्यात एक आई आपल्या मुलाला शब्दानेही दुखावत नाही अणि त्याला त्याच्या चुकीची योग्य त्या वेळी जाणीवही करुन देते.व त्याला त्याबाबतीत चांगली अददल पण घडवते.
अशा आहेत माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे स्वभावाने अत्यंत शांत,संयमी,तेवढयाच शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ अणि आईचे काळीज असलेल्या एक मायाळू शिक्षिका.ज्या आपल्या विदयार्थ्याचे जेवढे लाड,कौतुक करतात.तेवढीच कठोर अददल प्राध्यापिका वर्षा आहिरे तो चुकुन वागल्यावर त्याला घडवतातही.अणि त्यांचा आपल्या विदयार्थ्यावरचा राग त्या बोलुन व्यक्त नाही करत तर त्यांचा राग त्या आपल्या विदयार्थ्याशी अबोला पाळुन व्यक्त करतात.अणि त्यांचा हा अबोला खुपच भयानक आहे.जो मी स्वता अनुभवला आहे.
अशा आहे माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे समोरच्याला बोलुन दुखावत नाही पण त्याला चांगली अददल पण घडवतात.
सोप्या भाषेत सांगायला गेले तर माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे हया बोलुन नाही दाखवत.पण शांतीत क्रांती करतात.कितीही केले तरी शेवटी सावित्रीची लेक आहेत त्या.
अणि ते म्हणतात ना एक नारी सबपे भारी एकदम तसा प्रकार आहे हा आमच्या प्राध्यापिका वर्षा आहिरे यांचा.त्यांनी मला काहीही न बोलता मला चांगलीच अददल घडवली.जेणेकरून मी पुन्हा कधी कोणाशी उदधटपणे,उर्मटपणे वागणार नाही.किंवा बोलणार नाही.
म्हणुन असे म्हटले जाते की एका स्त्रीच्या मौनात पण खुप मोठी ताकद असते.अणि त्याच शक्तीची प्रचिती मला प्राध्यापिका वर्षा आहिरे यांनी करुन दिली.
खरच प्रत्येक विदयार्थ्याला अशी एकतरी गुरु भेटायलीच हवी.त्याला काहीही बोलुन न दुखावता त्याला चांगलीच अददल घडवणारी.जेणेकरुन तो पुन्हा कधी असा चुकुन वागणार नाही.

Leave a Reply

Join Us on WhatsApp