पैसा कसा हा पैसा
व्यवहारासाठी लागतो हा पैसा
किती हा याग करशी माणसा पैशासाठी
जगण्यासाठी तर बस चार प्रेमाची माणसे
पैसा कसा हा पैसा
धावता-धावता पैशाच्या मागे
कसा काय विसरलास माणुसकी तू
पैशाची किंमत जाणता -जाणता
कसा काय विसरलास माणसाची किंमत .
पैसा कसा हा पैसा
दोन पैक काय मीळणार तुला
पुर्वजांच्या जमिनी विकायला निघाला
असली कसली रे लालच माणसा?
असली कसली रे नड माणसा?
पैसा कसा हा पैसा
लक्षात ठेव एक माणसा
आत्मीक सुखाला मुकशील तू
वीनाशकाळ लीहीणार तूझा शेवटी हाच
पैसा…