ज्योती महादुले 07 Aug 2023 गीत देश-प्रेम 🎸 8073 0 Marathi :: मराठी
अनेकता मध्ये ऐक्याचा मंत्र जरा दोहरवा गर्जा महाराष्ट्राचा गौरव आज गौरवा अभिमानाने फुलवू देशाचा मळा...।।धृ।। उंचावर फडकतो आहे शांतीचा हा प्रतीक विरांच्या बलिदानाने रंगला आहे नभीत शहिदांच्या स्मृतीला रंगवुया तीन रंगात अभिमानाने फुलवू देशाचा मळा...।।१।। देशाच्या विरानात लाल लहुनी सजते आहे धरती विसरा नको ती गुलामगिरी अन्याय सहुनी त्रस्त जनता होती स्वातंत्र्य संग्रामात आठवा आहुतीचा सडा अभिमानाने फुलवू देशाचा मळा....।।२।।