ज्योती महादुले 23 May 2023 गीत बाल-साहित्य 🏵️ 5647 0 Hindi :: हिंदी
हो हो हो फुलांनो, तुम्ही उमला असे नाही कुणी जगात हो हो हो फुलांनो तुम्ही बहरा असे या अनोख्या विश्वात हो हो हो फुलांनो.... तुमची नजर अशी तेज धार होवो तुमच्या बुद्धीचा गंध आरपार होवो हो हो हो चिमण्यांनो तुम्ही टिपा असे ज्ञानाचे कण कण हो हो हो फुलांनो..... सारा आसमंत आहे तुमच्यासाठी सज्ज तुमच्या माणुसकीचा बहरावा गुलकंद या आकाशातले तुम्ही लुकलुकणारी तारे ही आकाश गंगा आहे तुमच्यासाठी सज्ज हो हो हो तारांनो तुम्ही चमका असे कुणाची चमक नाही जगात हो हो हो फुलांनो...... सावध राहा इथे स्वार्थी नजरेपासून लोक कल्याणासाठी लढा द्यावा जमून गर्व करु नका दिप स्तंभ बनून अन्याय होता कुणावर नका राहा गोधडीत लपून हो हो हो दिपस्तंभानो तुम्ही प्रकाशित असे व्हा सुर्याचा अस्त बनून हो हो हो फुलांनो.......