आयुष्याच्या वाटेवर – माधव मुळे

आयुष्याच्या वाटेवर – माधव मुळे

 आयुष्याच्या वाटेवर
एकटाच चालत होतो
कुणि नव्हते सोबतीला
म्हणून स्वतःशीच बोलत होतो

लोक मला वेड समजून
आवाज द्यायला लागायचे
माझंच मला कळत नव्हतं
ते अस का वागायचे

प्रेम करायचो मी तर
काय पाप मी केलं
त्याला देखील लोकांनी
लफड्याच नाव दिल

त्यामूळे समाजाचा
विचार मी करत नाही
प्रेमाच बीज काही
आयुष्यात या पेरत नाही

चांगल्याला देखील नाव
वाईटाला पण ठेवतात
जसे साफ माश्यावाणी
पाण्यामध्ये पोहतात

जीवनाच्या वाटेवर
वळण घ्यायला विसरलो
विश्वास रुपी चिखलातून
अलगदपणे घसरलो

हृदयाला आठवनीच्या
वेदना खूप होत होत्या
जाणून बुजून त्या मला
भूतकाळाकडे नेत होत्या

दुःखाचा वर्षाव नेमका
माझ्यावर का होत होता
आयुष्याच्या वाटेवर
देव परीक्षा घेत होता

Madhav muleमाधव मुळे

0
comments
  • Very Nice Lines Bro.

    0

  • Leave a Reply

    Create Account    Log In Your Account