सांग तु कधी भेटशील ग मला
वाट आता बघवत नाही
माझ्या या स्वप्नांच्या दुनियेत
तुझ्या विना कसच राहवत नाही
वाटते भेटावे लगेच येऊन तू मला
पण भेट काही होत नाही
असशील इथेच कुठे तरी
मग डोळ्यासमोर का दिसत नाही
तुझेच स्वप्न बघायचे म्हटलं
तर रात्रीला झोप का लागत नाही
रात्रभर फक्त तुझाच विचार करत असते
खरच तुझ्या शिवाय काहीही मला सुचत नाही
बस झाला ग हा खेळ आयुष्याचा
खरच वाट आता बघवत नाही
सांग कधी भेटशील येऊन मला
वाट आता बघवत नाही
वाट आता बघवत नाही……#नेहा खरात!!