Notification

एक मैरीपुर्ण संवाद-विकास-सोनवणे

एक मैत्रीपुर्ण संवाद

काल मी रात्री नऊ वाजता रोजप्रमाणे कोणत्या विषयावर लेखन करावे हा विचार करत बसलो होतो.पण तेव्हाच मला एका अनोळखी मोबाईल नंबर वरुन फोन आला.तेव्हा माझा मोबाईल डु नाँट डिस्टर्ब मोडमध्ये होता.कारण मी लिहित असताना किंवा लिहिण्यासाठी विषयाचा विचार करत असताना मी इतर कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही.मग तो मोबाईलचा आवाज असो किंवा घरच्यांनी दिलेली हाक असो.कारण लिहिताना अचानक दुर्लक्ष झाल्याने माझी विषयाची तालबदधता चुकुन जाते म्हणुन मी लिहिताना इतर कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही.मग ते आईचे ओरडणे असो किंवा मोबाईलचा आवाज असो मी जोपर्यत लिहिणे पुर्ण होत नाही तोपर्यत इतर कोणत्याही गोष्टींकडे अजिबात लक्ष पण देत नाही.
अणि मग एका विषयावर लिहिण्याचा विचार करत असताना मला एका अनोळखी मोबाईल नंबर वरुन फोन आला आहे हे दिसले.मग मी लगेच त्या नंबरवर फोन लावुन विचारपुस केली की हा नंबर कोणाचा आहे?मला हया नंबरवरुन मिस काँल आला होता.मग जेव्हा मी विचारपुस केली की हा नंबर कोणाचा आहे?.तेव्हा मला कळले की तो मोबाईल नंबर आमच्या प्राध्यापिका मीनाक्षी पाटील यांचा होता.ज्या आम्हाला एम ए मराठी द्दितीय वर्षाच्या नेमलेल्या मध्ययुगीन साहित्य कृतींचा अभ्यास हया विषयाच्या प्राध्यापिका आहेत.तसे पाहायले गेले तर प्राध्यापिका मीनाक्षी पाटील यांच्याशी माझी हयाअगोदरही भेट झाली होती.पण तेव्हा आमचा काही एवढा खास परिचय झाला नव्हता.कारण तेव्हा माझी त्यांच्याशी काही एवढी ओळखही नव्हती व आमच्यात कधी संवादही झाला नाही.त्यांची अणि माझी पहिली भेट एम.ए द्दितीय वर्ष मराठीच्या वर्गात झाली होती.माझी वर्गमैत्रीण कल्याणी गांगुर्डे हिच्याशी त्यांचा सुसंवाद चालला असताना आमच्या मध्ये फक्त तोंड ओळख झाली होती.की मी एम ए प्रथम वर्ष मराठीच्या वर्गातीलच एक विदयार्थी आहे.
त्यापलीकडे आमची काही एवढी खास ओळख नव्हती.पण माझी वर्गमैत्रीण कल्याणी गांगुर्डे अणि प्राध्यापिका मीनाक्षी पाटील यांचे फार मैत्रीपुर्ण संबंध होते.अणि त्या दोघी मैत्रीणीप्रमाणेच एकमेकींशी गप्पा मारत बसायचे हे मी ही पाहिले होते.व अनुभवलेही होते.
असो माझ्या लेखाच्या मुळ विषयाकडे वळतो.मग प्राध्यापिका मीनाक्षी पाटील हया मला मी त्यांना फोन केल्यावर म्हणाल्या मी तुला फोन केला होता थोडयावेळापुर्वी तेव्हा तु उचलला का नाही?लिहित होता का? मी म्हणालो हो.मग मी म्हणालो मी लिहित असताना माझ्या लिहिण्यात काही व्यत्यय येऊ नये किंवा कोणी मित्राने फोन करुन माझे लक्ष लिहिण्यापासुन विचलित करु नये म्हणुन मी लिहिताना माझा मोबाईल डु नाँट डिस्टर्ब मोडमध्ये ठेवत असतो.
मला प्राध्यापिका मीनाक्षी पाटील यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीच्या अनुभवातुन असे वाटले होते की प्राध्यापिका मीनाक्षी पाटील हया स्वभावाने खुप कडक आहेत.म्हणुन मी त्यांचा फोन आल्यावर फक्त त्यांच्या बोलण्यावर हो ला हो करत होतो.कारण मनात भीती पण होती.आपल्याकडून काही चुकीचा शब्द निघून गेला तर त्याला उदधटपणा समजुन अजुन प्राध्यापिका मीनाक्षी पाटील हया माझ्यावर रागावतील.म्हणुन मी सगळे शब्द एकदम विचारपुर्वक अणि मोजुन मापुनच बोलत होतो.
पण माझा प्राध्यापिका मीनाक्षी पाटील हयांच्या स्वभावा विषयीचा अंदाज हा पुर्ण चुकीचा ठरला.प्राध्यापिका मीनाक्षी पाटील हया मुळातच खुप आनंदी स्वभावाच्या,मनमिळाऊ,मोठया मनाच्या,कोणत्याही प्रकारचा गर्व नसलेल्या अणि कदरदान वृत्तीच्या,स्वभावाच्या निघाल्या.हे मला त्यांच्याशी माझा जो मोबाईलवर संवाद झाला त्यावरुन लक्षात आले.प्राध्यापिका मीनाक्षी पाटील यांनी सुरुवातीला माझ्याशी खुप मनमोकळया गप्पा मारल्या.मी कुठे राहतो?माझे वडील काय करतात?मला किती भाऊ आहेत?ते काय करतात?माझे गाव कोणते?आईचे माहेर कुठले? हे सर्व त्यांनी मला विचारले.
मग मी ही प्राध्यापिका मीनाक्षी पाटील यांना सांगितले की माझ्या आईचे माहेर संग्मेश्वरातील तिसगेवाडा हे आहे.माझी आई संग्मेश्वरातील प्रतिष्ठित नागरीक दगा तिसगे यांची भाची आहे.जे आता कालवश झालेले आहेत.अणि माझ्या वडिलांचे गाव दुगाव आहे(चांदवडच्या पुढचे). आहेत.आम्ही मुळचे दुगावचेच.अणि माझे वडील मालेगावातील डाक खात्यात हेड जमादार म्हणुन कार्यरत होते.अणि आता ते निवृत्त झाले आहेत.आम्ही.अणि मला एकुण दोन मोठे भाऊ आहेत.माझा एक मोठा भाऊ आँनलाईन कंपनीत कामाला आहे.त्याचे नाव निलेश आहे.अणि माझा दुसरा मोठा भाऊ याची स्वताची फँमिली ट्रँव्हल्स आहे.त्याचे नाव मंगेश आहे.अणि मी घरात सगळयात लहान आहे असे आम्ही एकुण तीन भाऊ.मला बहिण नाहीये.
मग प्राध्यापिका मीनाक्षी पाटील मला म्हणाल्या मस्करीत म्हणाल्या महात्मा फुलेंचा खुप मोठा भक्त आहे तु.मग मी स्मितहास्य करीत म्हणालो तसे काही नाही मी सगळयांना मानतो.फरक फक्त एवढाच आहे की मी महात्मा फुलेंना माझे आराध्य दैवत मानतो.बाबासाहेब आंबेडकरांना माझे प्रेरणास्थान मानतो.अणि शिवाजी महाराजांना माझा आदर्श मानतो.मग प्राध्यापिका मीनाक्षी पाटील मला म्हणाल्या हो मी पण शिवाजी महाराजांना अणि बाबासाहेब आंबेडकरांना मनापासुन मानते.पण मी महात्मा फुलेंना जास्त मानते.कारण मी त्यांचीच वंशावळ आहे.
मग प्राध्यापिका मीनाक्षी पाटील मला म्हणाल्या दुगावला माझे पण सोनवणे आडनावाचे एक नातलग आहेत.मग मी ही म्हणालो हो असतील.कारण दुगावला सर्व सोनवणेच आहेत.
मग नंतर प्राध्यापिका मीनाक्षी पाटील मला म्हणाल्या की तुझे लेख वाचले मी.खूप छान लिहितोस तु.पण पेनाने पेपरवर लिहिण्यात जो आनंद आहे तो मोबाईलवर लिहिण्यात मिळत नाही.अणि मोबाईल हा समजा एखादया वेळी पाण्यात पडला तर तुझी सगळी घेतलेली मेहनत पण वाया जाईल.म्हणुन तु जास्तीत जास्त पेपरवर लिहित जा.अणि तुझे सगळे लेख जपुन ठेवत जा.त्यांचा बँक अप ठेवत जा.
मग त्या आपल्या मुळ विषयाकडे वळाल्या अणि म्हणाल्या मी तुम्हाला मध्ययुगीन साहित्यकृतींचा अभ्यास हा विषय शिकवणार आहे.मी एक तारखेला तशी महाविदयालयात येणारच आहे.तेव्हा तु मला येऊन भेटुन जा मग आपण सविस्तर बोलू तुमच्या तासिकांविषयी.
असा झाला माझा मैत्रीपुर्ण संवाद प्राध्यापिका मीनाक्षी पाटील यांच्याशी.प्राध्यापिका मीनाक्षी पाटील हया माझ्याशी पुर्ण मैत्रीपुर्ण स्वरुपात बोलल्या.त्यांच्या बोलण्यात कुठेच कोणताही गर्व नव्हता की मी एक विदयार्थी आहे अणि त्या एक खुप मोठया प्राध्यापिका आहेत.त्या एकदम माझ्याशी मित्रत्वानेच बोलल्या.कोणताही संकोच न बाळगता.
असे प्राध्यापक जर प्रत्येक विदयार्थ्याला लाभले तर कधीच कोणता विदयार्थी आपल्या प्राध्यापकांशी मित्रत्वाचे संबंध ठेवायला संकोच बाळगणार नाही.अणि प्रत्येक प्राध्यापक अणि विदयार्थी हे एकमेकांशी मित्रत्वाने राहतील.एकमेकांचे चांगले मित्र बनुन राहतील.

Leave a Comment

Connect withJoin Us on WhatsApp