Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

हे एक नाटक आहे कि जे रियल परिस्थिती ला अनुसरून आणि त्यातून नवीन पिढीला काही तरी ज्ञान देउन जाईल

Barde Jyoti 08 May 2023 आलेख समाजिक बाल नाट्य म्हणुन सादर होऊ शकते 7251 0 Marathi :: मराठी

भाग पहिला- दोन सैनिक रक्षाबंधनाच्या दिवशी सीमा वर गप्पा मारताना
  (पहिला नाराज होऊन बसलेला तेवढ्यात दुसरा येतो) 
दुसरा=काय यार असा नाराज होऊन काय बसला 
पहिला=काही नाही असंच
दुसरा= तरी पण?वहीनीची आठवण झाली आहे वाटतं ;
पहिला= नाही ही रे तसे काही नाही
दुसरा=मग काय झालं ते तरी सांग 
पहिला=तुला माहीती आहे आज काय आहे ते
दुसरा=काय रे? मला नाही आठवत
पहिला=आज ना रक्षाबंधन आहे
दुसरा= अरे हो यार, मी तर विसरलोच
पहिला= हो ना मग मी याच मुळे नाराज आहे कि माझी ताई किती वाट पाहत असेल, नाही (काही मिनिटे नाराजीचे वातावरण ) 
दुसरा=सोड ना यार तसे पण आपण त्यांच्या साठीच तर सिमेवर आहोत ना, आपण सिमेवर राहुन आपल्या बहिनेच काय भारतातल्या सार्या बहिणींसाठीच लढतोय ना, तसा विचार केला तर भारतात किती मुली ,स्रिया आहेत कि ज्या आपल्या बहिणी आहेत मग आपण किती भाग्य शाली आहोत कि आपल्या साठी इतक्या बहिणी आहे
पहिला=हो यार मी तर हा विचार च केला नाही
भाग दुसरा - तीन चार टवाळखोर मुले रस्त्यावर उभे (तेवढ्यात तेथुन काही मुली जातात) 
पहिला मुलगा=ओय ते बघ ना समोर काय माल आहे बघ बघ
दुसरा मुलगा=आरे यार काय दिसतात राव मस्त
तिसरा मुलगा=त्यातली एक तुमची वहिनी बरका (सगळे मुलं हसतात) 
एक मुलगी=तुम्हाला काही आई बहिणी नाही का मुर्ख कुठले लाज पण नाही वाटत
दुसरी मुलगी=तुमच्या मुळं आमचं जगनं ही मुश्किल झालं आहे घाणेरडे कुठले  बहिण नाही का तुम्हाला 
चौथा मुलगा=अरे मेडम बहिणी आहेत पण तुमच्या सारख्या सुंदरी तर नाही ना 
(सर्व मुलं जोरदार हसतात) 
  तात्पर्य:-
            बघा ना विचार करायला पाहिजे नाही एकिकडे आपल्या साठी सिमावर लढतात त्यांच्या साठी रक्षाबंधनाला एक धागा बांधण्यासाठी मुलगी नाही आणि दुसरी कडे स्रियांची, मुलींची हेळसांड होते धागा बांधून घेण्यासाठी सैनिकांना एक मुलगी बघायला भेटत नाही आणि ज्यांना आहे तर ते असा फायदा घेतात लाजीरवाणी बाब आहे नाही.

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

किसी भी व्यक्ति को जिंदगी में खुशहाल रहना है तो अपनी नजरिया , विचार व्यव्हार को बदलना जरुरी है ! जैसे -धर्य , नजरिया ,सहनशीलता ,ईमानदारी read more >>
Join Us: