Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

हो हो हो फुलांनो

ज्योती महादुले 23 May 2023 गीत बाल-साहित्य 🏵️ 5573 0 Hindi :: हिंदी

हो हो हो फुलांनो, तुम्ही उमला असे
नाही कुणी जगात
हो हो हो फुलांनो तुम्ही बहरा असे
या अनोख्या विश्वात
हो हो हो फुलांनो....
तुमची नजर अशी तेज धार होवो
तुमच्या बुद्धीचा गंध आरपार होवो
हो हो हो चिमण्यांनो तुम्ही टिपा असे
ज्ञानाचे कण कण
हो हो हो फुलांनो.....
सारा आसमंत आहे तुमच्यासाठी सज्ज
तुमच्या माणुसकीचा बहरावा गुलकंद
या आकाशातले तुम्ही लुकलुकणारी तारे
ही आकाश गंगा आहे तुमच्यासाठी सज्ज
हो हो हो तारांनो तुम्ही चमका असे
कुणाची चमक नाही जगात
हो हो हो फुलांनो......
सावध राहा इथे स्वार्थी नजरेपासून
लोक कल्याणासाठी लढा द्यावा जमून
गर्व करु नका दिप स्तंभ बनून
अन्याय होता कुणावर नका
राहा गोधडीत लपून
हो हो हो दिपस्तंभानो 
तुम्ही प्रकाशित असे व्हा
सुर्याचा अस्त बनून 
हो हो हो फुलांनो.......

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

ये खुदा बता तूने क्या सितम कर दिया मेरे दिल को तूने किसी के बस मैं कर दिया वो रहा तो नहीं एक पल भी आकर टुकडें- टुकड़ें कर दिये ना विश्वा read more >>
Join Us: