शेवटचे पाहून जा-महेश टेलेंज

शेवटचे पाहून जा-महेश टेलेंज

आयुष्यभर झुरत होतो मी तुझ्यासाठी,
का नाही फुटला गं पाझर तुझ्या मनात माझ्यासाठी…

आयुष्यभर अश्रू वाहात होतो
फक्त तुझ्यासाठी,
दोन थेंब तरी पडू दे तुझ्या डोळ्यांतून माझ्यासाठी…

काय नाही केलं ते सांग तुला भेटण्यासाठी,
आज पाच मिनिटे नाहीत तुझ्याकडे माझ्या प्रेतयात्रेत येण्यासाठी…

रात्र रात्रभर रडलो आहे गं मी तुला पाहण्यासाठी,
आज मला शेवटचे पाहून तुला एकदाही रडू का नाही आलं…

माझ्या जळणाऱ्या देहावर,
अश्रुंचे दोन थेंब गळुनी जा…

शेवटचे तरी एकदा माझ्या देहाला पाहुनी जा…
शेवटचे तरी एकदा माझ्या देहाला पाहुनी जा…

 

महेश टेलेंज

पुणे, महाराष्ट्र

0

Leave a Reply

Create AccountLog In Your Account