जातीय राजकारणी – माधव मुळे

जातीय राजकारणी – माधव मुळे

जातीच्या नावावर
दंगली इथ पेटतात
पक्षाचे झेंडे घेऊन
हिंदू मुस्लिम उठतात

जातीय राजकारण
राजकारणी करतात
माणसं मात्र हिंदू
मुस्लिमांची मरतात

कुठलातरी माथेफिरू भावना
भडकवण्याच काम करतो
आम्ही मात्र माणस असून
माणसांना उभं चिरतो

खिसे यांचे तेव्हाच
आपल्यामुळे भरले जातात
खोटी आश्वासने देऊन
जेव्हा राजकारणी निवडून येतात

वादाच बी राजकारण्यांनी
समाजात या पेरल
झाला जो कोणी आडवा
त्याला यांनी मारलं

त्यामूळे साधारण माणूस
भित्र्या दृष्टीने बघत आहे
राजकारणी मात्र दंगली
पेटवूनही जगत आहे

जातीविषयी उजेड का
यांच्या डोक्यात पडत नाही
हिंदू व मुस्लिम का
एकत्र येऊन लढत नाही

madhav muleमाधव मुळे

2+

Leave a Reply

Create AccountLog In Your Account