Swapnil bajaranag aher 30 Mar 2023 कविताएँ समाजिक #starboyswapnil#poems 74878 0 Hindi :: हिंदी
जिंकण्यास जग सारे...
जिंकण्यास जग सारे,
आपल्यांची साथ नाही..
सोडूनी परक्यांसारखे,
कसलीच बात नाही..!!
काळजाच्या संसारात,
केलास वार माझ्या..
असलो अबोल जरी मी,
लेखणीस धार माझ्या..!!
कपटी मुखाने मागून,
तुज बोलण्यास मुभा आहे..
खचलो ना मी तरीही,
धैर्याने मी पुन्हा उभा आहे..!!
थांबलो ना कधी ही,
ना आता थांबणार आहे..
जिद्दीने स्वबळावर,
फक्त ध्येय गाठणार आहे..!!
झेप असेलच गगनचुंबी,
तु बघ तमाशा लपून माझा...
ना येणार शरण कधीही,
शब्द म्हणजे हुकूम माझा...!!!
✍️Swapnil (star boy) aher (nashik)
Youtuber. sahitya.poemr Nik name star boy Swapnil Web. Www.starspndhan.com...