Samir Lande 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir Lande , ती, समीर लांडे, प्रेम, love 116528 0 Hindi :: हिंदी
कॉलेज चा पहिला दिवस
मन घाबरत होते डोके मात्र
वेगवेगळ्या विचाराने साचले होते
कॉलेज मध्ये पाय ठेवता क्षणी तिचा चेहरा दिसला
जीवनात पहिल्यांदा मन चोरी झाल्याच आनंद लुटला
नुकतीच कॉलेज ची सुरुवात होती
सोबत पावसाची सात होती
तिच्या एका हातात छत्री
एका हाताने कपडे सावरत होती
मात्र तिचे नाव काय ते माहीत नाही
म्हणून मित्रास ती, ती म्हनत दाखवत राहिलो
मित्र ही माझा खुळा, त्याने बगितलेच नाही
दुसऱ्या क्षणी ती नजरे पासून हरवली गेली तिचे नाव काय आता विचारू कुणास, ह्या विचारात पडलो
शेवटी ती, ती म्हणत राहिलो आणि कवितेचे शीर्षक ही ती म्हणूनच राहील
- समीर लांडे