Samir Lande 28 Aug 2024 आलेख समाजिक #लिंगभेदभाव #स्रीपुरुष #समीरलांडे #SamirLande 16470 0 Hindi :: हिंदी
Seen 1 (घरात बाबा , बहिण , आणि भावाचा संवाद , बाबांकडे पैसे कमी आसल्या कारणाने बाबा फक्त मुलाचे पुस्तके व कपडे आणतात . टिपः लक्षात घ्या आपण बाबांना चुकीचं ठरवत नाही.) बाबा : दादा घेरे तुझे कपडे आणि पुस्तके. तुला सांगितल होत ना? बहिण : आणि माझे मी पण सांगितले होते बाबा. भाऊ : (चिडवत) भांडे धू भांडे तुला कशाला पाहिजे वही पुस्तक तस पण तुला लग्न करून चुहुल मुलच बगायच आहे . बाबा : ( रागात ) काय रे... तुला कोण म्हणे मुलीला फक्त चूल मुल पहायच आसत . आणि ते देखील कुठे सोपे काम आहे . बहिण : ( रागात उभी राहून ) हो दादा घरातील कामे इतकी पण सोपी नाही जितकं तू समजतोय , आणि ते सर्व करून देखील श्री प्रत्येक शेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभी आहे . ( व निघून जाते ) बाबा : ( भावाला समजावत मऊ आवाजात ) अरे .. मला अजून धेनात आहे तुम्ही लहान असताना तुमची आई तुम्हाला कस सांभाळून घरातील कामे करत असे , धून , भांड , पाणी , हे सर्व करून दोन्ही वेळा स्वयंपाक करणे हे सगळ सोप नसत रे तूच बघ प्रत्येकाला साप्ताहिक सुट्टी मिळती पण तू बगितल आईला कधी सुट्टी घेतांना. ( भाऊक होऊन ) अरे तव्यावर भाकरी सोबत तिचे हात सुद्धा भाजत असतात , पण ती तिच्या लेकरांना म्हणत असते बाळ फुंकून खा गरम आहे सोप नसत रे एका श्री च जीवन दादा : हो बाबा माझं चुकल मला माफ करा , ह्या सर्व वह्या मी ताई सोबत वाटेल . Seen 2 ( डॉक्टर आणि एका आज्जी चा संवाद ) (आज्जी डॉक्टर समोर येऊन बसते व ) डॉक्टर : बोला आज्जी काय सेवा करू तुमची आज्जी : डॉक्टर साहेब आमच्या नात सूनबाई ने कालच आम्हाला खुशखबरी दिली डॉक्टर : वा... वा... वा... आज्जी तोंड गोड करा मग आमचं आता . आज्जी : तोंड तर गोड करूच ओ... पहिले माहित करायचं होत , वारसदार आहे की... डॉक्टर : ( आज्जी चे शब्द कापत) की काय, माफ करा आज्जी पण (गर्भलिंग निदान प्रतिबंध) या कायद्यानुसार गर्भलिंगनिवड गुन्हा आहे. सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी केला जाऊ नये म्हणून हा कायदा अस्तित्वात आला. आज्जी : घेऊन देऊन काही होत असेल तर बघा डॉक्टर : (रागात) काय घेऊन देऊन आज्जी तुम्हाला लाज वाटली पाहिजे एक श्री असून तुम्ही दुसऱ्या श्रीला जन्म घेऊ देत नाही विचार करा तुमच्या आज्जी चे पण असेच विचार असते तर तुम्ही आज इथे आसता का , तुमच्या व्याची कदर करत आहे नाही तर पोलिसात दिलं असतं तुम्हाला चालत्या व्हा इथून आज्जी : साहेब बागा काही होत असेल तर पाहिजे तर थोड काही जास्त घ्या ( डॉक्टर नर्स ला सांगत ) डॉक्टर : नर्स बाहेर हाकला ह्या म्हातारीला नर्स : (आज्जी मागे धावत ) ये म्हातारे पळ इथून पळ (आज्जी लुगडं सावरत पळत निघून जाते ) डॉक्टर : शिपाई काका बाहेर पाटी लावा , चप्पल सोबत डोक्यातील घान देखील बाहेर काढून या. Seen 3 (त्रासलेला एक मुलगा व 2 मुलींचा संवाद ) मुलगा : ( फोन वरती बोलत ) हो ना यार आपल तस काही आस्तित्वच नाहीं , जी बगितली ती सुविधा मुलींनाच आपल तर कुणी विचारच करत नाही ( दोन्ही मुली तिथे येऊन ) मुलगी 1 : दादा थोड बसण्या साठी जागा देतो का ? मुलगा :( रागात ) घे बस , सगळी कड तर तुमचं चाललय आता इथे पण नको बसू देऊ शेजारील मुलगी : ओ... ओ... भाऊ आसे काय बोलू राहिला मुलगा : काय बोलू राहिलो म्हणजे , मला जीव नाहीं का मी नको बसू का मुलगी 1 : अरे पण मी फक्त बसायला जागा मागितली त्यात एवढं ओरडायला काय झालं तुला मुलगा : हो बस ना मग तस पण आमचं मुलांचं कुढ काय राहिलय सर्व तर तुमचंच आहे मुलींचं शेजारील मुलगी : अरे काय तुमचं आमचं करू राहिला सरकारी जागेत उभ राहून मुलगा : काय सरकारी जागा , सरकारी आसो नाहीतर खाजगी सगळीकड तुमचंच तर कब्जा मुलगी 1 : अरे तुला नक्की काय बोललो आम्ही तू इतका का ओरडत आहे ( भाऊक रडक्या आवाजात ) मुलगा : नाही तुम्ही सांगा आमच्या साठी काय आहे , सरकारी योजना तुमच्या साठी , बस मध्ये आर्ध टीकेट तुम्हाला , वरून बसण्याची जागा रिकामी सोडा , चुकून जर कधी तुम्हाला धक्का लागला की सर्व काही डोक्यावर उचलून घेतात त्यात चार लोक आमचं मुलांचं ऐकून पण घेत नाही . ( शेजारील मुलगी मुलाला समजावत ) शेजारील मुलगी : बरोबर आहे दादा तुझ, पण तूच विचार कर ना ह्या सर्व गोष्टींची गरज पण आहे ना, नाहीतर कित्तीच मुली आशा पण आहे ज्यांना पैशाच्या आदचानी मुळे रोज शाळेत कॉलेज ला जायला जमत नाही मुलगा : मग काय मुलांना पैशाची आदचान येत नाही का मुलगी 1 : तस नाही रे पण कित्तेक घरांमध्ये मुलीपेक्षा मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं जातंय, कारण मुलगी काय मुलगी तर पर्क धन आहे ती लग्न करून निघून जाईल शेजारील मुलगी : आणि तुला तर माहीतच आहे जगात मुलीनं सोबत कसले कृत्य घडत आहे , मग आता तूच सांग सरकार ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आमच्या साठी काही करत आहे तर त्यात चुकी कोणाची समजायची मुलगा : मला नाही माहित यात चुकी कोणाची आहे पण , मुलगा आणि मुलगी ह्या दोगण मध्ये जो हा सवलतींचा फरक निर्माण करण्यात आला आहे ना हा मी नक्कीच बडलवण्याचा प्रयत्न करेल भविष्यात जे लाड मुलीचे केले जातील तेच मुलाचे करील जे शिक्षण मलाच करील तेच शिक्षण मुलीला सुद्धा करू देईल . लेखक : समीर लांडे (टिपः काल्पनिक )