Samir Lande 28 Feb 2025 कविताएँ प्यार-महोब्बत #samirlande #समीरलांडे #चंद्राच्यासाक्षीने #मराठी #मराठीकविता 6510 0 Hindi :: हिंदी
घट्ट मिठीत बांधते हे चांदणे, चंद्रा घरी नांदते विना स्वप्नांचे, डोळे जणू दिसे वांझटे. चंद्राच्या स्पर्शात उजळते संध्या, तुझ्या आठवांची सावली लहरते मंद्या. स्वप्नांच्या वाटा धुकट, धूसर, डोळ्यात उमलते शांतसे अंतर. गूढ रात्रीच्या नीरव गाण्यात, हृदयात धडधडते अनाम तानात. गार वाऱ्याच्या मृदू झुळकीत, स्मरणांचे सूर घुमती संथ लयीत. आकाशाच्या विस्तीर्ण कुशीत, तुझी चाहूल येते पुन्हा विसावीत. शब्दावाचून सांगते ही निशा, सांजवेळची स्पंदने नवी दिशा. कवी : समीर लांडे Author:- Samir Lande