Samir Lande 09 Sep 2024 कविताएँ प्यार-महोब्बत Samir lande, समीर लांडे, नक्षत्रा 4400 0 Hindi :: हिंदी
कधी चंद्राकडे पाहतो, कधी पाहतो तिला ती म्हणे काय मिळणार लीहिण्या करिता माझ्यात तुला . फारसे काही नाही तुझे केस छान आहे , कित्तेकांचे हृदय हरपले असतील मला याची ही जान आहे . सखे कसे सांगू काजळ पांगत जाईल , तुझ्या डोळ्यांना पाहून मोर देखील लाजत जाईल . काळजाचे दुःख कसे मांडू सांग , नाकात नथूनी पाहून तुझ्या असे वाटते रात दिस फक्त तुला पाहू . हसवण्यात तुला मन माझं लागून जातो , मोती जणू शिंपल्यात तुझा दातांना पाहून जीव तुझ्यात राबून जातो . माझ्या कल्पनेत सारांश पक्षी देखील , तुझ्या मानेवर घाम बनवून वाहून जाईल तुझा होकार आणि मी जीवाशी जाईल . शिल्पकाराने जीव घालून बनवलेली दगडाची शीला , भाग्यवान तुझा कमरेला वेढा देणारी ती साडी आणि त्या साडीच्या मिरा . तुझा पायांना कधी पहिलच नाही , कारण चेहरा सोडून दुसरी कडे लक्ष राहिलेच नाही . कवी :- समीर लांडे