ज्योती महादुले 24 May 2023 कविताएँ अन्य 🏵️ 13589 0 Hindi :: हिंदी
थंडीच्या गारव्यात कोरवा पसरला वातावरण जलमय झाले गारठली माणसे इथली गारठली प्राणी ही इथली गारठली पाखरे इवली गारठली वॄक्षवल्ली सोयरी पण मन मात्र गाई नव तराने.....।।धृ।। हा गारवा चहूने,धुक्याची घालून शेरवानी व्हवे व्हवे से वाटते,हे मध भरे प्याले थंडीच्या गारव्यात कोरवा पसरला।।१।। हो..हो हो.. शहारली पाने दंव मोतीने ओल्या स्पर्शाने माती सुगंधीत झाले वाऱ्याच्या संगतीने मयुर नाचे पाखरे गारठून घरट्यात निजले मी मात्र एकमेव रानात इथे घुमू लागला यांचा आवाज कानात रे पाला पाचोळा सिमटू लागला हूरहूर लागली धरती ची रानवने माझे गीत मात्र इथे सुरांच्या साथीस गाऊ लागले नव तराने थंडीच्या गारव्यात कोरवा पसरला वातावरण जलमय झाले...।।२।।