Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

आरोपांच्या सावलीत

Samir Lande 16 Jan 2025 कहानियाँ समाजिक Samir lande आरोपांच्या सावलीत 9019 0 Marathi :: मराठी

[ शहर , शहर म्हंटल की प्रगती आणि चांगली लाईफ स्टाईल आपल्या चेहऱ्या समोर येते , पण प्रगतशील जीवना साठी किंव्हा चांगल्या लाईफ स्टाईल साठी आपल्यांच मन दुखून शहरात जाणे बरोबर आहे का ?
चला मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवते , आरोपांच्या सावलीत ]

Seen 1

[ प्रसंग गावातील आजोबा एका जुन्या घराच्या ओसरीवर बसले आहेत. हातातला काठीला टेकून ते स्वतःशी संवाद साधत आहेत.]

आजोबा (स्वतःशी बोलत):- कशे दिसा आड दिस गेले समजलेच नाही , ह्या एखलें पणाने ह्या चार भिंतींनी इतके चाटले मला चेहऱ्यावरील सुरकुत्या दुःख दिसुच देत नाही. 

( तेवढ्यात  शेजारील मुलगी आजोबांना जेवण घेऊन येते )

शेजारील मुलगी :- कुणाशी एखल्यात बोलताय बाबा 

आजोबा :- एखल म्हातारं कुणाशी बोलणार 

शेजारील मुलगी :- हो ते पण आहे .
बर मी काय म्हणते बाबा तुम्ही तुमच्या मुलांकडे का नाही जात रहायला 

आजोबा :- तुला सांभाळायचा कंटाळा आला काय ग 

शेजारील मुलगी :- तस नाही ओ बाबा,  पण मूल असताना अस एकट राहण्यात काय आर्थं 
आणि काही वाद झाला असेल तर आता किती दिवस होऊन गेले त्यांच्या मनात तुमच्या साठी जो काही राग असेल ते तेव्हाच विसरले असतील

आजोबा :- होय विसरलेत ना पण राग नाही , आपल्या वडिलांना विसरलेत , आपल्या घरचा रस्ता विसरलेत , जुन्या आठवणी विसरलेत .

शेजारील मुलगी :- बर ते असूद्या मी तुमच्या साठी जेवण घेऊन आले इथे बसणार की नेहमी प्रमाणे बाहेर झाडाच्या गार सावलीत 

आजोबा :- बाहेर झाडाखाली 

( शेजारील मुलगी व आजोबा बाहेर जातात )
___________________________________

Seen 2  [ शहरातील प्रसंग आजोबांचा मुलगा शुभम कामावर जाण्या साठी तयार होत आहे पण त्याला त्याची बॅग मिळत नाही ]

शुभम :- ( त्याच्या पत्नी ला आवाज देत ) 
सुनिता ,सुनिता बॅग कुढे आहे माझी 

सुनिता :- ( आतून बाहेर येत )
सगळ्या वस्तू हातातच दिल्या पाहिजे का , तुमच्या सारखं एकच काम आहे का मला  ( व आत निघून जाते )

(शुभम त्याच्या मुलीला आवाज देत)

शुभम :- पूनम ये पूनम 

पूनम :- ( कानातील हेडफोन काढत ) 
काय झालं ओरडायला 

शुभम :- बॅग कुधे आहे माझी 

पूनम :- (तिखट स्वरात ) मला काय माहीत बॅग माझी आहे का तुमची

शुभम :- बर असुदे शोधतो मी 
( व बॅग न शोधता बाहेर जायला लागतो . तेवढ्यात शुभम चां मुलगा अरुण  बाहेरून येतो व त्याचा धक्का शुभम ला लागतो ) 

शुभम :- ( अरुणचा धक्का लागतातच )
अरे ये... डोळे काय आड्याला लाऊन फिरतो का 

अरुण :- आ.... मला सांगता अन बॅग कुणाला मिळत नव्हती इतक्यात 

शुभम :- थोबाड नको चालू जास्ती,  जाऊन कामधंदा बघ काही , लग्नाचं वय झालय तरी रिकामा फिरू राहिला

अरुण :- बिना लग्नाचं कुणाची बायको घेऊन फिरू 

पूनम :- तस पण तुला कोणी पोरगी देणार नाही दुसऱ्याची च घेऊन फिरावी लागेल

अरुण :- ( पूनम ला बाहेर काढत  ) हा चाल चाल निघ ,निघ इथून 

( व त्याच्या वडलांना रागवत )

अरुण :- तुम्ही मला नका सांगू मी काय केलं पाहिजे आणि काय नाय केलं पाहिजे तुमचाहून काही झालं का आत्तापर्यंत 

शुभम :- एक रुपया कमवायची आक्कल नाही , आणि तोंड कसा चालू राहील तुझ 

( तेवढ्यात सुनिता बाहेर येते )

सुनिता :- तुम्हाला तर टाईम झाला होता ना , आत्ता नाही का टाईम होत , हाड्याचा राग बोड्यावर काढायची सवय आहे तुमच्या खानदानीला 

शुभम :- ( बाहेर जात ) 
मग कशाला आसल्या खानदानीत लग्न करून आली

सुनिता :- ( मागणं)
 तेव्हा माहीत नव्हत ना तुमची खानदान आशी आहे म्हणून.

( अरुण ला आत घेऊन जात )
त्याच्या कड नको लक्ष देऊ पहिल्या पासून त्यांनी आसच
केलय चाल.
________________________________

Seen 3

[ शुभम त्याच्या जवळ चां मित्र मंगेश याच्या कडे मन मोकळ करण्या साठी जातो ]

मंगेश :- अरे शुभम कामावर दांडी मारली वाटतय आज 

शुभम :- ( मंगेश शेजारी बसताना ) 
दांडी कसली रे... मन नाही झालं आज कामावर जायचं 

मंगेश :- भाऊ आपण नोकरदार मानस आहोत , आपल मनाने चालत नाय , नक्कीच काहतरी झालय म्हणून नाय गेला तू कामावर

शुभम :- अरे तेच रे नेहमीच बायको एक परीची अन ते पोरं दोन पारीची आज मला म्हणतात की तुमच्याहून काय झालं तुम्ही मला शिकऊ राहिले 

( भाऊक स्वरात )

20 वर्षा पूर्वी बायकोच्या सांगण्या वरून वडलांन सोबत भांडण करून शहरात आलो , भेटल ते काम करून पोट भरलाय तू तर बगितलय सगळ ज्यांच्या साठी केलं आज तेच म्हणतात काय केलय आमच्या साठी

मंगेश :- शुभम मला ना तुझा साठी वाईट तर बिलकुल वाटू नही राहील , विचार कर 20 वर्षा पूर्वी तुझे वडीलही अशेच रडले असतील जेव्हा तू त्यांच्या सोबत भांडण करुन इकडे आला
तुझ्या बायको पोरान्हा कस समजवायच ते मला नाय माहीत पण ज्या वडलांना दुखून तू आला ना एकदा त्यान्हा भेऊन ये तू 

( तेवढ्यात तिथे प्रगती येते मंगेश आणि शुभम च बोलण ऐकून प्रगती)

प्रगती :- ते इतकं सोपं नाही , की ठरवलं आणि चला गावी , गावाहून शहरा कडे येताना घरचा उंभर्टा फक्त उंभर्टा असतो पण जेव्हा परतण्याची वेळ येते तेव्हा तोच उंभर्टा भिंती समान वाटतो 

मंगेश :- ते काहीही असो, पण मी म्हणेल तू एकदा वडिलांना भेटण्यासाठी गावी जा 

प्रगती :- हो माझं पण म्हणणं आहे की तू गावी जावं
पण काय करशील रे गावी जाऊन चार लोकांना देखावा करायला की बघा मी गावी आलो माझ्या वडलांसाठी 
खर म्हणतात लोक देव कधीच लांब बघत नाही ह्या जन्माचे पाप इथेच भोगावे लागतील , मी काय म्हणत नाही की तू गावी नको जाऊ , तू जा पण एवढं लक्ष्यात असुदे की गरज तुला आहे तुझा वडलांची , आज बायको पोरं दोन शब्द बोलले तर रडायला लागला विचार केलय का गेले 20 वर्ष तुझा वडलांचे डोळे कोणी पुसले असतील 

( एवढं ऐकून शुभम खाली मान घालून तिथून निघून जातो )

मंगेश :- जरा जास्तच एकवल तू त्याला . पण गरज होती खर तर ऐकवण्याची 

( प्रगती पाहून घेते शुभम गेला की नाही )

प्रगती :- ( शुभम ला गेलेलं पाहून )
दुसऱ्याला बर शहाणपणा शिकवता अन माझी मम्मी दोन दीसा साठी आली की कस नाक तोंड मोडतात 

मंगेश :- अय... दोन दिवसा साठी आली तर ठीक आहे 
पण तुझी आई दोन दोन महिने येऊन बसती 
अन् माझे आई वडील आले का कट कट करिती

प्रगती :- काय म्हंटला

मंगेश :- काय नाय माझ्या आई चुकल माझं
याच्या तर आला तर आला काडी लावून गेला
___________________________________

Seen 4 

[  शुभम च घर शुभम ची पत्नी सुनिता व शेजारील बाई  सानिका ह्या आपापल्या माणसाची टीका करत ]

सानिका :- काय सुनिता सकाळ सकाळी तुझ्या घरातून कीर्तनाचा आवाज येत होता

सुनिता :- काय सांगु आग् रोजचाच गोंधळ झालाय तो 
काय पाहून घरच्यांनी ह्याच्या सोबत लाऊन दिलं काय माहित . स्वतःहून काही करायचं च नाही त्याला मोलकरीण म्हणून ठेवलंय त्यांनी मला.

सानिका :- तुझं तरी बर आहे बाई हे आमचं तर नुसत आडव पडून हुकूम देतय, तस् काही डोंगर उल्थायला जातय रोज 

सुनिता :- त्याला लाज सुद्धा वाटत नाही आग, सकाळी खुशाल पोराव फिरल अन मला म्हणतय कशाला आमच्या खानदानीत लग्न करून आली , आस झालं अन तस झालं

सानिका :- होना म्हणजे लाज सुद्धा वाटत नाही , पोरं बरोबरीचे झाले कस काय त्यांच्या वर हात उचलायचा 

सुनिता :- आणि सकाळी उठून डब्बा करायला लावला आणि तसच गेलाय कुढ काय माहित हुंडगायला

सानिका :- जास्तच महाभारत झालय वाटतय

( तेवढ्यात तिथे शुभम येतो व गावी जाण्या साठी परततो)

सुनिता :- आता खायचं नाही का 

शुभम :-आलो गावी जाऊन 

( शुभम निघून जातो)

सानिका :- गावी कोण आहे 

सुनिता :- चालला असल त्याच्या बापाला भेटायला
_________________________

Seen 5  [ गावातील प्रसंग , शुभम त्याच्या वडिलांना भेटण्या साठी गावी येतो ] 

शुभम :- ( घराच्या बाहेर शेजारील मुली शी बोलताना )

शुभम :- ये बाळा ते आजोबा आहेत का घरात 

शेजारील मुलगी :-  तुम्ही कोण 

शुभम :- मी त्यांचा मुलगा आहे 

शेजारील मुलगी :- आज कस काय रस्ता चुकले 

शुभम :- काय 

शेजारील मुलगी :- काय नाही

( शेजारील मुलगी आत जाऊन आजोबांना ) 

शेजारील मुलगी :- ( हळू आवाजात)
आजोबा , आजोबा....

आजोबा :- काय झालं 

शेजारील मुलगी :- ते काका आलेत 

आजोबा :- कोण काका

शेजारील मुलगी :- तुमचा मुलगा 

आजोबा :- तो कशाला आलाय, त्याला सांग जिवंत आहे म्हातारं आजुन , तू थोडा लवकर आला , मेल्यावर ये

शुभम :- बाबा आहो आस काय बोलता , 

आजोबा :- कोण तू ओळखल नाही मी 

शुभम :- बाबा मला माझी चूक  मान्य आहे  आस 
अनोळखी व्यक्ती सारखं नका वागू  माझ्या सोबत


( शुभम त्याच्या वडलांच्या गळ्यात गळा घालून रडायला लागतो )

( बाबांचा ही शेवटी धीर सुटतो बाबा देखील स्वतःला आवरू शकले नाही व आपल्या मुलाला घट्ट मिठी मारून रडू लागले ) 

आजोबा :- ( रडत्या स्वरात  )
खूप वाट पहिली रे पोरा तुझी कुठे हरवला होता इतक्या दिवस तुला बापाची आठवण कशी आली नाही

शुभम :- ( देखील रडक्या स्वरात )
माफ करा मला बाबा , माफ करा खूप मोठी चूक झाली माझी 

आजोबा :- खूप कंटाळा आला रे ह्या जीवनाचा , आज तुला पाहिलं जगण्याचं कारण संपल, ह्या क्षणी देवाने श्वास थांबवला तरीही काही हरकत नाही 

( आजोबांना खोकला लागतो , व शुभम शेजारील मुलीला पाणी आणायला सांगतो , शेजारील मुलगी पाणी घेऊन येते  )

शुभम :- बाबा , पाणी  बाबा ,,

( तेवढ्यात आजोबांच्या हातातील काठी खली पडते , आपल्या वडलांच्या हातातील काठी खली पडताच शुभम चिरकायला लागतो )

( डोळ्यासमोर आजोबांना पडलेलं पाहून ,आणि शुभमला चिरताना पाहून शेजारील मुलगी बाहेर पळते , व  बाहेरून तिच्या काकू ला घेऊन येते )

काकू :- ( आतील प्रसंग पाहून ) 
ये बाई काय झालं म्हातार्‍याला आता नीट व्हत  

शुभम :- ( निशब्द फक्त तोंडातून रडण्याचा स्वर काढत )

( तेवढ्यात तिथे शेजारील मावशी येते )

मावशी :- काय ओ काकू येवढ्या पळत आल्या 
( व म्हाताऱ्याला पाहून )
ये बाई कस काय

काकू :- आव बाई काय माहीत , हा भेटायला म्हणून आला अन् काय केलं का काय म्हाताऱ्याला त्याच्याच जीवाला माहीत 

मावशी :- खरच भेटायला च आला होता का मारायला आला होता 

काकू :-  तेव्हा तर लय मोठ्या नकानी गेलं व्हत मग आता कशाला आला य 

मावशी :- ( शुभम ला )
काय रे ये काळतोंड्या काय केलं म्हाताऱ्याला 

काकू :- रडतोय बग कसा भाड्या

मावशी :- मला तर वाटतय यांनीच काही केलं असणार  आस एकामीच कोणाला काही होत नाही 

काकू :- हा मग यांनीच केलय 

मावशी :- काकू मी तर म्हणते घ्या बाहेर याला  
पहिले तोंड काळ करू आणि गाढवावर बसउन गाव भर फिरून आणि आणि मग थोबाड रंगून देऊ चपलेने 

( काकू आणि मावशी शुभम ला बाहेर ओढत असतात त्याच वेळी त्या ठिकाणी पोलीस येतात )

पोलिस :- ( आत येत )
थांबा , हे काय चाललय 

काकू :- या या साहेब मीच तुम्हाला बोलावल 

पोलिस :- हो ते ठीक आहे पण त्या बाबांना काय झालं

काकू :- बाबा गेले 

पोलिस :- कस काय 

मावशी :- ह्यानेच मारल बाबांना

शुभम :- ( पोलिसांसमोर हात जोडून )
साहेब आईशप्पथ साहेब मी काहीच नाय केलं 

पोलिस :- एक मिनिट , विस्तारात सांगा

काकू :- मी सांगते साहेब , हा बाबांचा मुलगा आहे 20 वर्षा पूर्वी बाबांन सोबत भांडण करुन शहरात निघून गेला होता 
आणि आज अचानक कुठल्या मनस्थितीने आला कुणास ठाऊक 
( जड शब्दांच्या आघात घालत )
शेवटच्या क्षणी हाच होता बाबांन सोबत 

मावशी :- सकाळी बाबा चांगले होते , आला आणि काय झालं काय माहित बाबांना , मुलगी पळत आली तेव्हा आम्हाला समजल 

पोलिस :- म्हणजे तुम्ही देखील डोळ्याने पाहिले नाही , की बाबांन सोबत नक्की यानेच काही केलं की नाही .
पण 20 वर्षा नंतर आपला मुलगा परतला आणि त्याच दिवशी त्याच्या वडिलांचा मृत्यू होणे ही गोष्ट देखील पचने 
मुश्किल आहे .
सध्या शंकाच्या आधारे याला तुरुंगात टाकता येईल बाकी मेडिकल रिपोर्ट वर आहे सगळ

( व शुभम ला पोलिस घेऊन जातात )
_______________________________

Seen 6
 [ शुभम चा मित्र मंगेश याला शुभम बरोबर घडलेल्या  घटनेची माहिती फोन वरती कळते  ]

मंगेश :- ( कॉल वरती ) हॅलो कस काय कधी आस नी होऊ शकणार बर मी लगेच येतो

मंगेश :-( बायको प्रगतीला ) प्रगती ये प्रगती 

प्रगती :- काय 

मंगेश :- शुभम च्या घरी चाललो आहे, रात्री यायला उशीर होईल जेवण करून झोपून घे 

प्रगती :- छी छि छि लाज कशी नाही वाटत मित्र घरी नसताना त्याच्या घरी चालले 

मंगेश :- ये  पागल त्या शुभम ला पोलिसांनी पकडलं आहे त्याच्या बापाच्या हत्येच्या आरोपात  तेच सांगायचं आहे जाऊन शक्यतो मलाच जायला लगेच 

( मंगेश निघून जातो ) 
__________________________________

Seen 7  [ मंगेश, शुभम सोबत घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी शुभम च्या घरी येतो ]

मंगेश :- वहिनी ओ वहिनी

सुनिता :- कोण ओरडू राहिलाय काय ना सकाळ सकाळी येऊन ( मंगेश ला पाहून ) काओ भाऊजी 

मंगेश :- खबर लागली का नाही 

सुनिता :- कसली खबर

मंगेश :- शुभम ला आटक झाली वडलांच्या खुनाचा आरोप लागलंय 

सुनिता :- ( थोड्या वेळ थांबून भाऊक होऊन )
ते आसल काही करूच शकणार नाही 

मंगेश :- ते नंतर पाहू त्याने केलं का नाही पहिले जाऊन पाहू चला 

( मंगेश , सुनिता , अरुण , पूनम पोलिस स्टेशन ला निघतात )
_________________________________

Seen 8 [ मंगेश , सुनिता , अरुण व पूनम शुभम ला भेटन्या साठी पोलिस स्टेशन ला पोहचतात  ]

मंगेश :- सर मी मंगेश आहे , आणि ही शुभम ची पत्नी आणि हे मुलगा मुलगी आहेत 

पोलिस :- ( तिखट स्वरात ) 
तोच शुभम का ज्याने त्याच्या बापाची हत्या केली 

मंगेश :- आस नका बोलू साहेब , तो तर त्याच्या वडलांना भेटायला आला होता, आस कधीच करू शकणार नाही 
उलट तो तर माझ्या सांगण्या वरून च त्याच्या वडिलांना भेटायला आला होता 

पोलिस :- तुझ्या सांगण्या वरून आला होता म्हणजे तू देखील बरोबरीचा साथीदार आहे ह्यात 

मंगेश :- नाही ओ साहेब 

पूनम :- ( रडक्या स्वरात, भाऊक होऊन ) 
सर आमचे बाबा कधीच काही चुकीचं काम करत नाही ओ 

अरुण :- ( भाऊक होऊन ) 
हो सर उलट ते आमच्या चुकान वरती आम्हाला चांगल शिकवतात 

सुनिता :- ( भाऊक होऊन रडक्या स्वरात)
भाऊजी एकदा भेटायचं विचारा ना त्यांहा 

मंगेश :- साहेब एकदा भेटू देता का 

पोलिस :- फक्त 20 मिनिट , गर्दी करू नका 
एक एक करून भेटा 

( शुभम गुधग्यात डोके घालून कैदखाण्यात बसला आहे )

मंगेश :- वहिनी पहिले तुम्ही जा 

सुनिता :- ते बोलतील का माझ्या सोबत 

मंगेश :- तुम्ही जा तर 

सुनिता :- ( शुभम जवळ जाऊन )
आहों मला माफ करा, मी खूप वाईट वागले ओ तुमच्याशी मी समजून सुद्धा घेतल नाही कधी , तुम्ही जे काही करता ते आमच्या साठी करता , सांगायला तर आम्ही तुमचे आहोत पण कधीच आपल्या सारखं वागलो नाही 
बोलायचं नसेल तर एकदा माझ्याकडे बघा तरी आस परक करू नका मला , तुम्ही काहीही केलेलं नाही हे मला माहीत आहे 
( शुभम सर्व काही ऐकत राहिला आपल्या बायकोचा बदललेला व्यवहार पाहून तो निशब्द झाला आणि गुडघ्यात डोकं घालून फक्त रडत राहिला )

( सुनिता परत जाते , व शुभम ची मुलगी पूनम त्याला भेटायला जाते ) 

पूनम :-( रडत ( प्रत्येक शब्दावर जोर देत )
बाबा तुम्ही कशाला इकडे आले , चला आपल्या घरी बाबा ओ... मम्मी , मंगेश काका आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय, काय ओ बाबा... आरून पण आलाय 
तुम्हाला आमचा राग आलाय का ?

( शुभम न बोलल्या मुळे पूनम रडत मंगेश आणि सुनिता कडे परतते )

मंगेश :- काय झालं दीदी 

पूनम :- (रडत)
पप्पा माझ्या सोबत नाही बोलले , ( व रडायला लागते ) 

अरुण :- मी नाही जाणार भेटायला , मी किती त्रास दिलाय पप्पांना ते माझ्या सोबत पण नाही बोलणार

मंगेश :- एकदा जाऊन तर बघ 

अरुण :- कुठल्या तोंडाने जाऊ , 
प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडी तोंड लागण, 
मुर्खा सारखं त्यांना उलट बोलण .
नेहमी चूक माझी आसून मी त्यान्हाच
चुकीचं ठरवत आलो 

मंगेश :- बर असुदे तू रडू नको तुला तुझी चुक समजली ना तेच खूप आहे , मी बागतो बोलून त्याच्याशी 
( मंगेश शुभम कडे जाऊन ) 
 शुभम काय रे माझ्या सोबत पण बोलणार नाही का अरे बायको पोरं भेटायला आले निदान त्यांच्या सोबत तरी बोलायचं तू , चाल बायको सोबत नको बोलू तू तुझी मुलगी आली तिच्या सोबत तर बोलायचं .
मी समजू शकतो रे, बायको पोरांचं अस अचानक बदललेला स्वभाव तुला चकित करत असेल .
भले तू गप्प दिसत आहे पण तुझा आत जे काही विचारांचं ,दुखांच प्रश्नाचं वादळ सुरु आहे ते कळत आहे मला.
घाबरु नकोस मी तुझा परिवार आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत , तू काहीही केलेलं नाही याची आम्हाला जाण आहे
( मंगेश निघून जातो ) 
_________________________________

Seen 9 
[ शेवट, शुभम ला त्याच्या चुका समजतात स्वतःला  दोषी समजत स्वतःशी संवाद साधतो ]

शुभम :- ( स्वतःशी बोलत )

काय दिवस आलेत... वीस वर्षांनी बापाला भेटायला गेलो, आणि त्याच्याच  हत्येचा खोटा आरोप माझ्यावर लागला. आयुष्यभर लोकांच्या आरोपांच्या सावलीत जगलो, पण असं काही होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझं जीवन म्हणजे जणू कुणाच्या खेळातील एक प्यादं झालंय. उद्धट बायको, बेशिस्त पोरं... जरी आज म्हणतात की आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे , पण तरीही मी  त्यांच्या साठी कायमचा खलनायकच राहणार. पण माझा कसूर काय? मी फक्त माझं कर्तव्य निभावलं... आणि आता या परिस्थितीतही मला एकटा झुंजायचंय. जगाच्या नजरेत अपराधी तर आहेच , 
पण माझ्या मनात अजूनही एक प्रश्न आहे खरंच गुन्हेगार कोण?
20 वर्षा पूर्वी बापाला एकटा सोडून गेलेला मी 
की वीस वर्षा नंतर वडिलांना भेटायला आलेलो मी
माझ्या गोष्टीचा शेवट कसा होईल हे मला माहीत नाही 

पण एक गोष्ट नक्की सांगेल आयुष्य वडलांच्या सावलीत घालवलं आसत 
तर आयुष्यभर आरोपांच्या सावलीत जगावं लागलं नसतं 
_______________________________

 अँकर कथेचा निष्कर्ष सांगत =

 [ कुटुंबातील चांगले संबंध टिकवणे आणि संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. वडलांशी झालेल्या भांडणामुळे परिस्थिती अधिक बिघडल्यावर . कधी कधी अहंकार आणि राग आपल्यावरच उलटतो, ज्यामुळे आपले आयुष्य आणि नातेसंबंध उद्ध्वस्त होऊ शकतात. या कथेत, मुळात कुटुंबातील एकमेकांवरचा विश्वास कमी झाला आणि त्याचा परिणाम सर्वांवर झाला.
कदाचीत ह्या कथेचा शेवट कुणालाच आवडणार नाही 
काहीही चूक न करता शुभम आज तुरुंगात आहे 
पण त्या वीस वर्षांचं काय जे त्याच्या वडिलांनी मुलगा असताना एका अनाथा सारखे काढले त्याच काय ?
तस बघायला गेलं तर त्याला त्याच्या ह्या चुकीची शिक्षा त्याच्या बायको पोरांच्या वागण्यातून भेटलीच .
मेडिकल रिपोर्ट आल्यावर निर्दोष बाहेर पडेलच 

पण शुभम आयुष्य भर वडलांच्या सावलीत राहिला असता
तर त्याला , आरोपांच्या सावलीत रहायला लागलं नसतं ]

लेखक :- समीर लांडे
           Samir Lande

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

लड़का: शुक्र है भगवान का इस दिन का तो मे कब से इंतजार कर रहा था। लड़की : तो अब मे जाऊ? लड़का : नही बिल्कुल नही। लड़की : क्या तुम मुझस read more >>
Join Us: