Raju Devaji Barat 09 Jun 2023 कहानियाँ अन्य आई , दुःख , आयुष्य 13502 0 Marathi :: मराठी
काही गोष्टी आयुष्याच्या.. आयुष्य! आयुष्य या एका छोट्याश्या शब्दाने माझे भान हरवून ठेवले . अगदी लहान वयात खूप काही शिकवून गेलं . एका छोट्याश्या गावात एक छोटासा परिवार राहत होता . दोन पाल्य असलेल्या तिसरा मुलगा झाला तो मी ! 6 जून 2004 रोजी माझा जन्म झाला . अगदी गरीब घराण्यात . माझी एक मोठी बहीण आणि भाऊ होता . अगदी चिमुकल्या व कोवळ्या मनाला घरात काय चालू आहे काहीच कळेना . क्षण सुखाचे असो वा दुःखाचे असो माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचे . लहानपणी मातीत खेळायचो . मोठ्या बहीण - भावाला कसा त्रास द्यायचो माझे मलाच माहित . कधी कधी चिडून मारायचे सुद्धा पण रडलो की अश्रू पण त्यांनीच पुसले . आई कामाला जायची त्याच्यामुळे आख्खा दिवस राहायचो . लहानपणी मला सर्वात जास्त आवडायची ती म्हणजे माझी आजी . तिच्यासोबत वेड्यावाणी मस्ती करत कधी शाळेचा वय झाला समजलच नाही . तुम्हा आम्हाला माहितच आहे शाळेचे पहले दहा - पंधरा दिवस म्हणजे आयुष्यातले सर्वात वाईट दिवस . तो कंटाळवाणा अभ्यास , रोज शाळेत जाऊन आख्खा दिवस एकाच जागी बसून राहण्याची ती क्षमता ; मला काहीच जमत नव्हते . कधी कधी पळून पण जायचो . पण भावाच्याच शाळेत प्रवेश करून घेतल्यामुळे जास्त काळ हे टिकले नाही . हळूहळू शिक्षक सुध्दा माझ्याशी चांगल्या वागायला लागल्या . त्यांच्या म्हणण्यानुसार चांगला अभ्यास करू लागलो . माझ्या या गरीब घरात टीव्ही मोबाईल काहीच नव्हते . त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवस शाळेत , खेळ आणि पुस्तकांच्या धूंदितच जायचा . बहीण - भाऊ शिकलेले असल्यामुळे मला कसा अभ्यास करावा लागेल यासाठी खूपशी मदत मिळाली . रात्री अभ्यासाच्या नावाने पुस्तकात असल्याल्या काल्पनिक माणसांना दाढी मिशा व चश्मा लावण्याची मजाच काही वेगळी होती . अशा या मस्तीखोर दिवसांत सुध्दा परीक्षेत चांगल्या गुणाने पास झाल्याने शिक्षकांचा सुध्दा मी लाडका होत चालला होतो . आख्खा दिवस शाळेत मस्ती - धिंगाणा करून रात्री थकून आलेल्या आईच्या कुशीत झोपण्याची मजाच काही वेगळी होती . आईच्या कुशीत झोपणे म्हणजे शिंपल्यांच्या मध्ये चमकणाऱ्या हिऱ्यासारखेच वाटत होते . अशा या सुखाशिल जीवनात कधी वादळ येऊन घर कोसळले कुणास ठाऊक . रस्त्याच्या अपघातात झालेल्या जखमा - वेदना आता आईला सहन होत नव्हत्या . जवळ - जवळ एक - दोन महिने आई दवाखान्यात होती . आईच्या कुशीत झोपण्याची सवय निघून गेली होती . जणू माझ्या डोक्यावरची सावली निघुनच गेली होती . आई जरी दवाखान्यातून बरी होऊन आली असली तरी त्रास काही कमी झाला नव्हता . अपघातात आलेल्या जखामांमुळे आई नेहमी आजारी पडू लागली . उपचार करून करून तरी तिचा आजार काही बरा होत नव्हता . आणि एकेदिवशी तो काळा दिवस आलाच माझ्या आयुष्यात ज्याचा मी कधी विचार पण केला नव्हता . 29 जुलै 2015 रोजी आई मला नेहमीचीच सोडून गेली . अगदी 9 वर्षाच्या या मुलाला " आई " या शब्दाचा नीट अर्थ सुध्दा समजला नव्हता , अशा परिस्थितीत आईने एका लहान मुलाचा हात सोडून देणे म्हणजे त्या मुलासाठी खूप वाईट गोष्ट होती . सोबत असणे आणि आठवणीत जगणे यात खूप मोठा फरक असतो. काही गोष्टी आयुष्याच्या...